Friday, June 4, 2021

कोरोना महामारीच्या काळात ग्रँड मराठा फौंडेशन कडुन विदर्भाच्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाना व उपासमारीला तोंड देत असलेल्या आदीवासी कुटुंबाना मदतीचा आधार

कोरोना महामारीच्या काळात ग्रँड मराठा फौंडेशन कडुन विदर्भाच्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाना व उपासमारीला तोंड देत असलेल्या आदीवासी कुटुंबाना मदतीचा आधार 

दिनांक -५ जुन २०२१

पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात ग्रँड मराठा फौंडेशन शेतकरी विधवांच्या कुटुंबासाठी सतत मागील दहा वर्षांपासून मदत करीत असुन रोहित शेलटकर यांनी यापुर्वी या आत्महत्या  कुटुंबातील पहीली  ते दहावी (वयोगटातील) मुलांना पुस्तके वाटप करून तसेच या मुलांच्या शिक्षणाला कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही याची खात्री करुन घेण्यासाठी अतिरिक्त सहकार्य दिले आहे.  ग्रँड मराठा फाऊंडेशनचे संस्थापक श्री रोहित शेलटकर  यांनी मागीलवर्षी २०२० मध्ये लॉक डाऊन काळात पाच हजारावर कुटुंबाना एकही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब व आदिम आदिवासी कोलाम उपाशी राहणार नाही यासाठी महिनाभर पुरेल इतकी अन्न व किराणा किटचे वाटप केले आहे . 

यावर्षी २०२१ कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सुद्धा ग्रँड मराठा फौंडेशन पुढे सरसावली असुन आता पर्यंत हजारांवर कोरनाग्रस्तांना अन्नाच्या किटचे वाटप करण्यात आले असुन पाच  शेतकरी विधवांना त्यांच्या मुलींच्या रुग्णांकरिता आर्थिक मदत सुद्धा देण्यात आली आहे . हजारो कटुबांना ग्रँड मराठा फौंडेशन कडुन हजारो मास्कचे वाटप करण्यात आले असुन .अतिशय गरजू शेकडो कोरोनाची कंगन झालेल्या रुग्णांना रेमिडिफीवर तसेच काळी बुरशी झालेलया रुग्णांना अँफोसिलीन बी सुद्धा ऊपलब्ध करून देण्यात येत आहे . 


यावर्षी कोरोना संकटामध्ये थंडीची प्रचंड लाट आली असता जानेवारी २०२१ मध्ये  पाच हजार कुटुंबाना ब्लॅन्केटचे वाटप ग्रँड मराठा फौंडेशनने केले आहे तसेच मागील १२ वर्षांपासून  रोहित शेलटकर यानी शेकडो शेतकरी विधवांना तसेच त्यांचा पाल्याना मदत केली आहे व मागील एप्रिल पासून त्यांनी हजारो  कुटूंबांना मदतीचा हात समोर करून ग्रँड मराठा फॉउंडेशनने त्यांनी निर्माण केलेल्या पानिपत या सिनेमासारखं एक नवा दानशूरव कोरोना योद्धा खऱ्या अर्थाने होण्याचा विक्रम केला आहे 

ही रोगराई सर्व शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत आव्हानात्मक आहे आणि जीएमएफ त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना मूलभूत गरजा पुरवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. या विभागातील स्थानिक राजकीय पक्षांच्या पाठिंब्याने वितरण मोहीम राबविण्यात आली असून नागरिकांकडूनही त्यांना मोठा पाठिंबा मिळाला आहे. ग्रँड मराठा फाऊंडेशनच्या विश्वस्त श्रीमती माधवी शेलटकर विदर्भात  या कार्यक्रमाचे नेतृत्व करीत आहेत.

ग्रँड मराठा फाउंडेशन बद्दलः

ग्रँड मराठा फाउंडेशन, शेतकऱ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक सहाय्य पुरवते जे आधुनिक तंत्राच्या कार्यक्षम वितरणास योग्य किंमत देतात जेणेकरून स्वत: साठी उदरनिर्वाह चालविण्यामध्ये आणि शेतक debt्यांचे कर्ज व दारिद्र्याच्या या वर्तुळात मोडणारी शेतकर्‍यांना सक्षम बनविणे. विदर्भावर विशेष लक्ष केंद्रित करून, ग्रँड मराठा फाउंडेशन देखील शेतकरी मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी आणि शेती व ग्रामीण क्षेत्रात संलग्न उपक्रम सुरू करण्यासाठी आर्थिक मदत पुरवते ज्यामध्ये विधवा महिला आपले जीवन निर्वाह करू शकतील. त्यांनी शाळांमध्ये संगणकाच्या देणगीद्वारे ई-लर्निंगची ओळख आणि प्रोत्साहन दिले आहे. ग्रँड मराठा फाउंडेशनचे ध्येय आहे की शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना चांगल्या पद्धतीने जीवनमान मिळावे आणि कर्ज आणि दारिद्र्याच्या या दुष्ट वर्तुळाला तोडगावे. महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि नागपूर या भागात फाउंडेशन सक्रिय आहे आणि शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांचा सर्वांगीण विकास करीत आहेत. कार्यक्षेत्रातील अडचणी कमी करून आणि अधिक चांगले आयुष्य जगण्यास सक्षम बनवून शेतकरी भविष्यकाळात सज्ज  होईल यासाठी प्रयन्तशील आहे. 

================================================