Saturday, May 23, 2020

आधार उद्धवच्या मोहीमेला वाढता पाठींबा : मुंबईच्या रोहीत शेलाटकर यांच्या ग्रँड मराठा फॉऊंडेशन तर्फे ६०० कुटुंबाना आधार

 
आधार उद्धवच्या मोहीमेला वाढता पाठींबा : मुंबईच्या रोहीत  शेलाटकर यांच्या ग्रँड मराठा फॉऊंडेशन तर्फे ६०० कुटुंबाना  आधार 
 दिनांक- २३ मे २०२०
 
आदिवासी बहुल यवतमाळ जिल्ह्यातील झरी  केळापुर  घाटंजी राळेगाव  तालुक्यातील  १३ हजारावर गरजू कुटूंबियांना आभा प्रकल्पाच्या वतीने 'आधार उद्धवाचा' या संकल्पनेतून जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले असुन याला मोहीमेला सुरवातीला २००० फूड किट देणारे पारसी रेल्वे कर्मचारी खुशरु पोचा नंतर अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे नागरीक  सुरेश यांनी १५०० फूड किट दिल्यानंतर आता अनेक संस्था व्यापारी संघटना कर्मचारी संघटना आता समोर आले असुन मुंबईच्या कोकणात परत जाणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना आधार देणाऱ्या मागील १० वर्षापासुन विदर्भाच्या विधवांच्या कल्याणाचे प्रकल्प राबविणारे दानशुर इंग्लंडचे नागरीक रोहित  शेलाटकर यांनी आपल्या ग्रँड मराठा ट्रस्ट माध्यमाने मदतीचा समोर करून ६०० कुटुंबाना फूड किट देऊन आधार दिला आहे . यापुर्वी रोहित शेलाटकर  यांनी शेकडो शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाना आर्थिक मदत दिली आहे त्यांना शेतकरी विधवा संघटनेकडून विदर्भ शेतकरी मित्र हा पुरस्कार देऊन २०१० मध्ये सन्मानित करण्यात आले आहे . 
रोहित शेलाटकर यांनी पानीपत हा चित्रपट निर्माण करून संपूर्ण जगाला मराठ्यांचा इतिहास दाखविला आहे .त्यांनी दक्षिणेकडुन जस असलेल्या लाखो मजुरांना अन्न देणाऱ्या गुरुद्वारा व मदत केंद्रांना भरीव नादात दिली आहे . 
 राज्य सध्या चौथ्या लॉक डाऊन च्या टप्प्यात आले असून कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र परिश्रम घेतांना दिसत आहे. मागील दोन महिन्यांपासून लागू असलेल्या संचारबंदी मुळे छोटे व्यवसायिक तसेच रोजमजुरदार लोकांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. हाताला काम मिळत नसल्यामुळे पोटाची गरज भागवण्यासाठी कोणाची तरी मदत मिळणार काय....? याच आशेवर अनेकजण तग धरून आहे. केळापुर तालुक्यातील कोणताही रोजमजुर, गरजू कुटूंबियांची उपासमार होणार नाही यासाठी शेतकरी स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या 'आधार उद्धवाचा' या संकल्पनेतून  जवळपास १० हजार कुटूंबियांना जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले आहेत. आभा प्रकल्पाच्या संयोजिका स्मिता तिवारी, माजी नगरसेवक अंकित नैताम यांच्या विशेष नियोजनात मागील दोन महिन्यांपासून संपूर्ण पांढरकवडा शहर तसेच तालुक्यातील विविध पोडांवर राहत असलेल्या आदिवासी समाजातील गरजू कुटुंबीयांना घरपोच जाऊन जीवनावश्यक किटचे वाटप केले. याचा लाभ अंदाजे ५० हजार कुटुंबातील व्यक्तींना झाला असल्याची माहिती स्मिता तिवारी यांनी दिली. आभा प्रकल्पाच्या या समाजोपयोगी कार्यात माजी नगरसेवक अंकित नैताम, संतोष नैताम, नंदू जयस्वाल, भीमराव नैताम, मनोज चव्हाण, सुरेश तलमले, गोलू जयस्वाल, संतोष चामलवार, रामराव साळूंके, गणेश कोल्हे, सुधीर सुबूगडे, पिंटू मोरे, रवि कोरेवार, गणेश कांबळे, बाबू जैनेकर, बबलु धुर्वे, विशाल तुपट, पवन नैताम, सतिष सुबूगडे, सुजल गेडाम, आशू अंबादे, साहिल अंबादे, चंदन जैनेकर, शुभम नागपूरे, आशुतोष दोडेवार, प्रदिप कोसरे, अमन नांदेकर आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.

Friday, May 22, 2020

भाजपाचे महाविकास सरकार आधाडी विरोधी अपयश आंदोलन थोतांड - किशोर तिवारी

भाजपाचे महाविकास सरकार आधाडी विरोधी अपयश आंदोलन  थोतांड - किशोर तिवारी 
दिनांक -२२ मे २०२०
प्रेसनोट साठी या लिंकवर क्लीक करा 
======================
=====================
व्हिडिओ साठी या लिंकवर क्लीक करा 
====================
====================

अख्खा भारत व महाराष्ट्र कोरोना या महामारीशी लढत असतांना घरात लपलेले भाजपनेते एकदम केंद्राचे शून्य नियोजनामुळे आलेल्या आर्थिक संकटाचे खापर चक्कमहाराष्ट्र सरकारवर फोडून उध्दव ठाकरे मागील दोन महीने हातावर हात ठेऊन बसले असल्याचा आरोप करीत आज सुरु केलेले "महाराष्ट्र बचाव " आंदोलन व महाराष्ट्राचे नैरायग्रस्त विरोधी नेते यांनी केलेलं आरोप बिनबुडाचे "'जे  खोटे बोला दाबून बोला "या मोदींच्या  वाक्याचे पालन करणारा असुन या आणीबाणीच्या  परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी  उभे राहण्याचा राष्ट्रीय  सोडून केंद्राचे पॅकेज रोखण्याचे व कसेतरी भाजपचे सरकार  राज्यात  आणण्याचे षडयंत्र  असल्याचा आरोप शेतकरी व आदिवासी नेते किशोर तिवारी यांनी केला आहे .

भाजप हा नेहमीच भांडवलदारांचा पक्ष म्हणुन ओळख असणारा  जातीयवादी लोकांचा पक्ष आहे. शेतकरी गरीब आणि आदीवासी यांच्यावर पुतण्या मावशीचे प्रेम करणारा मुठभर दांभीक लोकांचा वादग्रस्त समुह असल्याचा अनुभव नेहमी सामान्य जनतेला येतो. मात्र काही वाट चुकलेले स्वार्थी आदीवासी दलीत व बहुजन समाजाचे पोटभरू नेते त्यांची चाकरी करण्यात  गुंतले असुन आपले नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ओरडून ओरडून खोटे बोलण्याच्या पद्धतीने ज्या मागण्या केंद्राच्या अधिकारात येतात. त्या मागण्या राज्य सरकारला असल्याचा टोमणा  किशोर तिवारी यांनी मारला आहे .
सध्या कोरोना आला असा ओरड करीत वातानुकूल शयनकक्षात मागील दोन महिन्यापासून भाजप नेते झोप काढत आहेत. घरामधील दारूचा खोका रिकामा झाला तर आढावा बैठकीचा दौरा काढुन बंद असलेले दारूचे वा बिअर बार उघडुन पोलिसांसमोर दारूचा खोका आपल्या वातानुकूल वाहनात टाकत आहेत. मात्र तरीही दारू कमी पडत असल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन ढासळले असल्यामुळे दररोज प्रेस नोट काढुन राज्य सरकारच्या केलेल्या कामाचे आपणच केल्याचे सोंग करीत आपली पाठ आपणच धोपटून घेत आहेत. तर ज्या अत्यंत गरजेच्या शेतकरी गरीब आदिवासी यांच्या केंद्राने पूर्ण करणाऱ्या मागण्या बेशरमेने राज्य सरकारकडे करीत आहेत. असा आरोप पुराव्यासह किशोर तिवारी यांनी केला आहे .
सर्वच राज्यात केंद्र सरकार आपल्या पणन संस्थेमार्फत कापुस तूर धान गहु हरभरा मक्का विकत घेते. मात्र यावर्षी सि सि आई व नाफेडने प्रचंड अडचणी व जाचक अति लादुन  खरेदी वारंवार बंद पाडली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः वारंवार हस्तक्षेप करून बंद पडलेल्या खरेद्या सुरु केल्या. मात्र यातही भाजप नेते आपल्या वातानुकूल कशात  बसुन मीच केले अशा प्रेस नोट काढत आहे सध्या दररोज खरेदीच्या गाड्यांची संख्या १०० ते २०० वर नेण्याचे आदेश मुख्यमंत्रयानी दिले आहेत. FAQ कापसाचा विषय केंद्राकडे तसेच तूर हरभरा मक्का केंद्र सरकार नाफेड मार्फत शेतकऱ्यांचा झळ करीत आहे. मात्र भाजप नेते दिल्ल्लीला न बोलता इकडे राज्य सरकारला सांगत आहे हा काय मूर्खपणा आहे असाही सवाल किशोर तिवारी केला आहे .
शेतीसाठी लागणारा पीककर्जाचा पुरवडा केंद्र सरकारची आरबीआई करते. यावर्षी अफलातुन कोरोनाचे संकट आले आहे. शेतकरी उपाशी मरत असताना भारत सरकारने रामदेवबाबा, निरव मोदी, चोकशी, माल्या यांचे हजारो कोटीचे कर्ज माफ केले. तसेच आपल्या पोसणाऱ्या बळीराजाचे करावे अशी मागणी हे भाजप दांभिक नेते का करीत नाहीत असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत .
मागील पाच वर्षात भाजपच्या याच नेत्यांनी सरकारमध्ये मंत्री असतांना आदिवास्यांना खावटी दिली नाही. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खावटी द्या असा आदेश देत असतांना शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारची खावटी आपणच आपल्या घरातुन देत असल्याचा दावा  करणे म्हणजे मानसिक विकारांचे लक्षण असल्याचा दावा किशोर तिवारी यांनी ठोकला आहे.
सध्या सर्व गरीबांना केंद्राने फक्त ५ किलो तांदूळ न देता तूर डाळ तेल साखर गहु चहा मीठ मिरची मसाले तिखट द्यावे त्याचबरोबर भाजप आपल्या मूठभर व्यापाऱ्यांना ४ लाख कोटीची सवलत दिली आहे. त्याच प्रमाणे देशातील शेतकऱ्यांना कमीत कमी  ४ लाख कोटीचे पॅकेज द्यावे यासाठी शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादीचे खासदार सोनिया गांधी शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात करीत आहेत. मात्र भाजप राज्यातील नितीन गडकरी प्रकाश जावडेकर पीयूष गोयल सह आशिष शेलारमामा देवेंद फडणवीस शकुनी मामा चूप का याचे उत्तर घरात लपलेले भाजपचे नेते प्रेस नोट काढून निश्चित देतील असा विश्वास किशोर तिवारी यांनी व्यक्त  केला आहे
=======================================================

Wednesday, May 6, 2020

कोरोना लॉकडाऊन मध्ये आदीवासी विभागाने आदिवास्यांना वाऱ्यावर -मुख्यमंत्री आदेशाला व माजी आदिवासी मंत्र्यांसह आमदारांच्या विनंतीला केराची टोपली -किशोर तिवारी 
दिनांक -६ मे २०२०
महाराष्ट्राचे कोरोना संकटातही माझ्या दुर्गम भागाच्या आदीवासी पाड्यावर व आदीम कोलाम नाईकवाडा आंध समाजाच्या पोडावर वस्तीवर मान्सुन पुर्वी खावटी व सर्व जीवनाव्यक सर्व वस्तु घरपोच द्या असे आदेश मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी दिल्यावर त्यांचं बरोबर माजी मंत्री शिवाजीराव मोघे प्रा वसंतराव पुरके  डॉ  अशोक उईके व आमदार डॉ संदीप धुर्वे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासींचे कोरोना लॉकडाऊन होत असलेले हाल रोजमजुरी नसल्यामुळे   सरकारने फक्त ५ किलो तांदुळ वाटत असल्यामुळे तसेच हजारो आदिवासी कुटुंबाना शिधावाटप पत्रिका नसल्यामुळे उपासमार होत असलेली टाळण्याची वारंवार केली विनंती आदीवासी सचिव आदिवासी आयुक्त यांनी चक्क  केराची टोपली झाल्याचा आदिवासी चळवळीचे कार्यकर्ते शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी याना  मारेगाव तालुक्यातील रोहपट पेंढरी झारी तालुक्यातील पांढरवानी दुभाटी  लांडगी केळापुर तालुक्यातही चीकलंदरा  जिरामीरा घोनसी भाडउमरी  बोथ पहापळ  राळेगाव तालुक्यातील देवधरी खैरगाव कासार घाटंजी तालुक्यातील लिंगापोड पारवा टिटवी  वासरी तरोडा चिकलवर्धा कोलाम पोडावर भेटी दिल्यावर  आला असून अन्न वाटपाच्या प्रचंड तक्रारी येत असून आदीवासी विकास विभागाचा एकही अधीकारी त्यांची चोकशी करण्यास आला नाही तसेच प्रशासनाचे अधिकारीही भेटीच्या वेळी दिसले असे आदिवास्यांनी सांगीतले . 
पांढरकवडा येथे आई ए एस अधिकारी प्रकल्प अधिकारी म्हणुन  नियुक्त करण्यात आला आहे मात्र आजारी असल्यामुळें त्यांनी स्वतःला कोरोटाईन घेतले असल्याने सारे रान मोकळे असुन आदिवासी सचिव साधा फोनही उचलण्यास तयार नसल्याची तक्रार आमदार संदीप धुर्वे यांनी केली असे या अहवालात भेटले आहे लांडगी कोलांम पोडसह अनेक ठिकाणी फुकटचा केंद्र सरकारचा तांदुळ मिळाला नसल्याची तक्रार किशोर तिवारी यांना कोलामांनी केली तर अनेक गावात फुकट तांदुळावर ५ ते ५० रुपये कोरोना फी घेण्यात आल्याची तक्रार देण्यात आली .अनेक कोलाम पोडावर या दरम्यान कोलामांचे मृत्यु झाले मात्र त्याची माहिती घेण्यास आरोग्य वा आदिवासी विभागाचा एकही अधिकारी आला नसल्याचे सांगितल्याचे किशोर तिवारी यांनी सांगीतले .निवडणुकीच्या समाजाचा ठेका घेणारे आजी माजी लोक प्रतिनिधी या संकट समयी आले कारण  भेटीचे व सनसनाटी दौऱ्याचे फोटो प्रेस नोट दाखविल्यावर एकही नेता आला नसल्याचे सांगितल्याचे किशोर तिवारी याना आदिवासी महिलांनी कॅमेऱ्यावर सांगीतले असे किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या  अहवालात भेटले आहे . 
मारेगाव तालुक्यातील पेंढरी येथील एक हजार वस्तीच्या कोलाम पोडावर किशोर तिवारी यांना महिलांनी फक्त तांदुळांनी जगायचे कसे असा सवाल केला भाजी तेल डाळ तिखट मीठ आदी वस्तु क्या घेणार असा सवाल केला किशोर तिवारी यांनी आदिवासी सचिव आदीवासी आयुक्त आदीवासी अति आयुक्त अमरावती प्रकल्प अधिकारी याना पेंढारी येथुन फोन केला एकानेही फोन उचलला नाही तेंव्हा जुनाच सोटा हाणणारा तिवारी असतातर मस्तवाल अधिकारी फोन उचले असते टोमणा एका बाईने किशोर तिवारी याना मारला त्यावेळी किशोर तिवारी यांनी आपला भैया प्रत्येक गावात पोडावर गरजु गरीबांना सर्व वस्तू असणारी किट वाटप करत असल्याची मोहन जाधव या भाजप नेत्याची विडिओ क्लिप दाखविली तेव्हा एकही पोडावर किट मिळाली असल्याची सांगण्यात आले तेव्हा नेत्यांनी खाऊन टाकले असेल असा निरोप एका कोलामाने यावेळी दिला एकीकडे आमच्या जेवणात मटकी आहे आम्ही डाळही देता भाजीत रसा असतो दहा हजार लोकांना टीपीन वाटतो अशी जाहिरात करणारे नेते या आदीवासी मतांवर येतात त्यांनाच विसरतात खोटे दावे करतात कां असा सवाल किशोर तिवारी यांनी यावेळी केला . 
================













Sunday, May 3, 2020

मले कोरोना झाला नव्हता माझा अंतिम संस्कार करा-मयत धर्मा माधव कुरवते याची यवतमाळच्या शवगृहातून समाजाला विनंती

मले  कोरोना झाला नव्हता माझा अंतिम संस्कार करा-मयत धर्मा माधव कुरवते याची यवतमाळच्या शवगृहातून समाजाला विनंती
दिनांक -४ मे २०२०
भारत सरकारच्या जात धर्म वस्ती पाहून कोरोनाची टेस्ट करणाऱ्या मिशनने पॉसिटीव्ह कोरोनाग्रस्त   जास्त
 दाखविल्यामुळे  रेडझोनमध्ये आलेल्या  यवतमाळ जिल्ह्यातील  केळापूर तालुक्यात ज्या ठिकाणी एकही कोरोनाची पॉसिटीव्ह केस नाही तेथील ताडउमरी  आदीवासी युवक धर्मा माधव कुरवते याची प्रकृती सध्या सरकारने आपली सरकारी दारूची दुकाने बंद केल्यामुळे अवैद्य विषारी दारूचा महापूर सध्या अबकारी व पोलीस विभागामार्फत आला आहे कारण  अबकारी व पोलीस विभागाला याशिवाय पैशे खाण्याचा कोणताही मार्ग शिल्लक राहीला नसल्यामुळे झुंझार येथे हीच अवैद्य दारू जास्त डोसल्यामुळे आजारी पडला त्याला पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात सहा दिवसापुर्वी आणण्यात आले मात्र आपल्या नेहमीच्या सवयी प्रमाणे त्याला यवतमाळच्या शासकीय कै व . ना . महाविद्यालयात रेफर करण्यात आले मात्र त्याच्यावर कोणताही इलाज न करता व त्याची पूवीचा दारू पिण्याचा इतिहास न बघता यवतमाळ येथे खाजगी बाहेर मोठे डॉक्टर ते या ठिकाणी फुकटचा पगार घेतात त्यांनी न पाहताच याचे सॅम्पल कोरोनासाठी घ्या व पाठवा ज्योत[ जोपर्यंत रीपोर्ट येत नाही तोपर्यंत विलगीकरणाचा वॉर्ड मध्ये कोरोना ग्रस्तांचा सोबत ठेवा असा आदेश दिला मात्र सर्व कोरोनाग्रस्तांमध्ये त्याचा एकाच दिवसात उपचाराविना मृत्यु झाला मात्र त्याचे शव जोपर्यंत रीपोर्ट येणार नाही तोपर्यन्त देता येणार नाही असा निरोप धर्माच्या बापाला देण्यात आला व शव बांधुन वेगळा ठेवण्यात आला व मग  प्रशासन व   सध्या गल्ली गल्लीत फिरत असलेले कोरोना योद्धा कामाला लागले .मयत धर्माचा कोरोना मिशनचा वादग्रस्त रीपोर्ट येण्यापुर्वी धर्मा व त्याचा बाप माधव मागील दहा दिवसात कोणा कोणा भेटले याचा शोध सुरु झाला व या सगळ्यांना नव्याने लाखो रुपये खर्च करून ४०० खाटाच्या खोल्यामध्ये ठेवण्याची तयारी सुरु झाली .  पांढरकवडा परिसरातले सगळे कोरोना योद्धा ज्यांना ज्यांना विलगीकरणामध्ये राहावयाचे त्यांना आपआपल्यापरीने  कोरोनाची भीती दाखविण्यात गुंतले या दरम्यान दररोज रीपोर्ट आला का माझ्या मुलाचा शव द्या अशी विनंती घेऊन माधव कुरवते यवतमाळला १५०० रुपये कर्ज काढून ऑटो लावून गेला मात्र त्याला सतत दोन दिवस गेला व रीपोर्ट आला नाही असे सांगुन परत पाठवून देण्यात आले . या दरम्यान पांढरकवडा येथे ४०० खाटाच्या व्यवस्थेत कमीत कमीत ४०० तरी आना असा व ठेवा असा आग्रह वजा दबाब वरून सुरु झाल्याने ४०० लोकांची जबरीने ओळख करून आपआपल्या बॅग भरून तयार राहण्याचा निरोप देण्यात आला मात्र मिशनचा कोरोना रीपोर्ट मयताचे एका धर्माच्या लोकांचे नसल्यामुळे निगेटिव्ह पाठविण्यात आला मात्र या दरम्यान पोटभरू कोरोनायोद्धांनी या ४०० लोकांना झोपु दिले नाही मग ज्या गावात सरकारी दारूची दुकाने बंद केल्यामुळे अवैद्य विषारी दारू धर्मा डोसली होती तिथल्या लोकांना तसेच त्याचा गावाच्या ताड उमरी येथील जनतेला पांढरकवड्याचा एका झोलाजाप आयुवेदिक डॉक्टरने मयत निगेटिव्ह असला तरी चार दिवस त्याचे शव  तेथे ठेवल्यामुळे पॉसिटीव्ह झाली असेल व गावात अंतिम संस्कार करणे घातक असल्याचा सल्ला दीला व लगेच ताडउमरी गावाकरण्यांनी पोलीस पाटील सरपंच यांच्या मार्फत कळविले की आम्ही आदीवासी धर्मा कुरवते   याचे शव गावात येऊ देणार नाही व तशी सूचना माधव कुरवते याना दिली मी पहिलेच दोन वेळा पैसे लाऊन यवतमाळला जाऊन आलो आता सरकारनेच काय ते करावे असे तहसीलदाराला सांगितले कोरोना योद्धा या तहसीलदाराने मेडीकल कॉलेजच्या डिनला तात्काळ कळविलें मात्र मला कोरोना झाला नव्हता मी अवैद्य विषारी दारू पिल्याने मेल्याचे आपल्या शवातून समाजाला सांगत होता आता तो मेडीकल कॉलेजच्या शवागृहात माझी हाक कोण ऐकते याची वाट पाहत आहे ,
असाच प्रकार एका हार्ट फेल होऊन मरण पावलेल्या जरंग येथे भाऊ व वागदा बंजारा तांड्यावर राहणाऱ्या मुंबईत हून आलेल्या युवकाच्या शवाला गावकऱ्यांनी नाकारलेमुळे शेवटी  पोलिसांनी  अंतिम संस्कार यवतमाळला केले व अख्या जगात हे प्रकरण गाजले तेंव्हा भारत सरकारने जागतिक  आरोग्य संघटनेचा म्हणजे

डब्ल्यूएचओचा हवाला देत  जो कोरोना बाधीत मानवाचा शव हेमोरॅजिक फिव्हर (जसे की इबोला, मार्बर्ग) आणि कॉलरा वगळता मृतदेह सामान्यत: संसर्गजन्य नसतो शवविच्छेदन करताना अयोग्यरित्या हाताळल्यान्यास सूचनांचे पालन केल्यास त्या शवामधून  कोरोना सारख्या साथीच्या इतर रोगाचा प्रसार होत नाही  म्हणून ज्यांना संसर्गजन्य रोगाने मृत्यू झाला आहे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जावेत,कारण जगात कोविड -१९ पासून मेलेल्या व्यक्तींच्या मृतदेहाच्या संसर्गामुळे एखाद्या व्यक्तीस लागण झाल्याचा पुरावा नाही.तसेच  शवगृहात स्थानांतरित होण्यापूर्वी शरीराचे निर्जंतुकीकरण करण्याची आवश्यकता नाही. कोविड -१९ पासून मरण पावलेल्या लोकांचे दफन किंवा अंत्यसंस्कार केले जाऊ शकतात.असे डब्ल्यूएचओने असेही नमूद केले आहे असा आदेश दिला असतांना कवडीची माहीती नसणाऱ्या फक्त पैसे खाण्यात गुंतलेल्या मेडीकल कॉलेजच्या दिन सांगा अशी ओरड धर्माची आत्मा करीत आहे मात्र आदीवासी सेवक आदीवासी मंत्री आमदार धर्माच्या आत्म्याचा आवाज ऐका अशी विनंती अख्या यवतमाळमध्ये लोकांना मागील चार दिवसापासून ऐकू येत आहे मात्र सर्व आदिवासी सेवक घरात कोरोटाईन झाल्यामुळे कसे ऐकणार कारण राजा आंधळा झाला आहे तर प्रशासनाने डोळ्याला पट्टी बांधली आहे कोणीही जास्त बोललं तर पोलीसवाले दंडे मारतील बरे



==========================================================================================================