Monday, August 24, 2020

रोहित शेलटकर यांच्या ग्रँड मराठा फौंडेशन कडुन आदीवासी व आत्महत्याग्रस्त पाच हजार कुटुंबाना खवटीचे वाटप

रोहित शेलटकर यांच्या ग्रँड मराठा फौंडेशन कडुन आदीवासी व आत्महत्याग्रस्त पाच हजार  कुटुंबाना  खवटीचे वाटप 

यवतमाळ २४   ऑगस्ट २०२० 

बॉलिवूड चित्रपट  निर्माते व ग्रँड मराठा फौंडेशनचे  संचालक  रोहित शेलटकर यांच्या स्वयंसेवी  महाराष्ट्रातील पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात आधार  उद्धवाचा या प्रकल्पाचा पाचवा टप्पा सुरु करण्यासाठी पाच हजार आदीवासी कर्जबाजारी शेतकरी     व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या  कुटुंबियांना जीवनावश्यक खाद्यपदार्थां व किरणांच्या किटचे वितरण रविवार २३ ऑगस्ट रोजी पांढरकवडा येथील इंदिरा नगरातील प्राथमिक शाळेत केले . यावेळी ग्रँड मराठा फौंडेशनचे अध्यक्षा माधवीताई शेलटकर आधार उद्धवाचा या प्रकल्पाच्या स्मिता तिवारी ,मुंबईच्या  व ठाणे आदिवासी भागात मागील चार महिन्यापासून कोरोना संकटात गरिबांना आदिवासींना खावटी व मदतीचे वाटप करणारे ग्रँड मराठा फौंडेशनचे संचालक राजेशभाऊ तावडे आदिवासी नेते अंकित नैताम प्रमुखपणे  उपस्थित होते . 

पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात ग्रँड मराठा फौंडेशन शेतकरी विधवांच्या कुटुंबासाठी सतत मागील दहा वर्षांपासून मदत करीत असुन रोहित शेलटकर यांनी यापुर्वी या आत्महत्या  कुटुंबातील पहीली  ते दहावी (वयोगटातील) मुलांना पुस्तके वाटप करून तसेच या मुलांच्या शिक्षणाला कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही याची खात्री करुन घेण्यासाठी अतिरिक्त सहकार्य दिले आहे. 

 ग्रँड मराठा फाऊंडेशनचे संस्थापक श्री रोहित शेलटकर  विशेष व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारें दिलेल्या संदेशात म्हटले आहे की कोरोना या "(साथीचा रोग) सर्व देशभर सर्वच आर्थिक  संकट आहे  आता पाचमहिन्यांनंतर शेतकरी कंगाल झाला आहे त्यांनाच कोरोना काळात सर्वात जास्त फटका बसला आहे आणि कमीत कमी खावटी देऊन जगाला अन्न  देणाऱ्या पोशिंद्याला  कमीतकमी जीवनावश्यक वस्तूंवर तो जगला पाहिजे म्हून आज ग्रँड मराठा समोर आली आहे  मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात त्यांचा  सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी सुविधा व शिक्षणाच्या माध्यमातून  जास्तीती मदत व  सुविधा मिळाव्या  आणि उन्नतीसाठी वचनबद्ध आहोत असेही त्यांनी सांगीतले . 

यापुर्वी रोहित शेलटकर यानी शेकडो शेतकरी विधवांना तसेच त्यांचा पाल्याना मदत केली आहे व मागील एप्रिल पासून त्यांनी हजारो  कुटूंबांना मदतीचा हात समोर करून ग्रँड मराठा फॉउंडेशनने त्यांनी निर्माण केलेल्या पानिपत या सिनेमासारखं एक नवा दानशूरव कोरोना योद्धा खऱ्या अर्थाने होण्याचा विक्रम केला आहे 

ही रोगराई सर्व शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत आव्हानात्मक आहे आणि जीएमएफ त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना मूलभूत गरजा पुरवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. या विभागातील स्थानिक राजकीय पक्षांच्या पाठिंब्याने वितरण मोहीम राबविण्यात आली असून नागरिकांकडूनही त्यांना मोठा पाठिंबा मिळाला आहे. ग्रँड मराठा फाऊंडेशनच्या विश्वस्त श्रीमती माधवी शेलटकर विदर्भात  या कार्यक्रमाचे नेतृत्व करीत आहेत.

ग्रँड मराठा फाउंडेशन बद्दलः

ग्रँड मराठा फाउंडेशन, शेतकऱ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक सहाय्य पुरवते जे आधुनिक तंत्राच्या कार्यक्षम वितरणास योग्य किंमत देतात जेणेकरून स्वत: साठी उदरनिर्वाह चालविण्यामध्ये आणि शेतक debt्यांचे कर्ज व दारिद्र्याच्या या वर्तुळात मोडणारी शेतकर्‍यांना सक्षम बनविणे. विदर्भावर विशेष लक्ष केंद्रित करून, ग्रँड मराठा फाउंडेशन देखील शेतकरी मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी आणि शेती व ग्रामीण क्षेत्रात संलग्न उपक्रम सुरू करण्यासाठी आर्थिक मदत पुरवते ज्यामध्ये विधवा महिला आपले जीवन निर्वाह करू शकतील. त्यांनी शाळांमध्ये संगणकाच्या देणगीद्वारे ई-लर्निंगची ओळख आणि प्रोत्साहन दिले आहे. ग्रँड मराठा फाउंडेशनचे ध्येय आहे की शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना चांगल्या पद्धतीने जीवनमान मिळावे आणि कर्ज आणि दारिद्र्याच्या या दुष्ट वर्तुळाला तोडगावे. महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि नागपूर या भागात फाउंडेशन सक्रिय आहे आणि शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांचा सर्वांगीण विकास करीत आहेत. कार्यक्षेत्रातील अडचणी कमी करून आणि अधिक चांगले आयुष्य जगण्यास सक्षम बनवून शेतकरी भविष्यकाळात सज्ज  होईल यासाठी प्रयन्तशील आहे.  

=================================================

Friday, August 21, 2020

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली वैद्यकीय महाविद्यालया कोरोना योध्दांच्या कामाची दखल -किशोर तिवारी यांनी वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन कोरोना योध्दांचा सत्कार केला

महाराष्ट्राच्या  मुख्यमंत्र्यांनी घेतली वैद्यकीय महाविद्यालया कोरोना योध्दांच्या कामाची दखल -किशोर तिवारी यांनी वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन कोरोना योध्दांचा सत्कार केला

दिनांक -२१ ऑगस्ट २०२० 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी कै वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयातील जी डॉक्टरांची ,आरोग्य सेविकांची ,सफाई कर्मचाऱ्यांनी मागील चार महीन्यात एकही दिवस रजा वा बदली न घेता आपलय प्राणांची पर्वा न करता सतत सेवा दिली व देत आहेत असे  सौ छाया गौरी -इन्चार्ज सिस्टर आयसोलेशन ,नरेंद्र ब्राह्मणे -सफाई कामगार  ऋषभ पवार- सफाई कामगार  रजनी चपारिया- सफाई कामगार डॉ.राजेश प्रताप सिंह (अधिष्ठाता) डॉ. रवींद्र राठोड (वैद्यकीय अधीक्षक) डॉ.शेखर घोडेस्वार -सहयोगी प्राध्यापक औषधशास्त्र विभाग डॉक्टर चंद्रशेखर धुर्वे-सहाय्यक प्राध्यापक औषध शास्त्र विभाग   डॉ. अरविंद कुडमेथे (वैद्यकीय अधिकारी, प्रमुख, अपघात विभाग) डॉ.चेतन जनबादे(निवासी वैद्यकीय अधिकारी) डॉ. अरयेशा शेख (साहयक प्राध्यापक )डॉ. विशाल धवणे(अपघात वैद्यकीय अधिकारी)  डॉ. गोविंद शिंदे (रेसिडेंट मेडिसीन विभाग) यांच्या ऐतिहासिक कामाची दखल घेत त्यांनी या कोरोना योध्दांच्या  अमूल्य योगदानामुळे शेकडो कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचले असुन किशोर तिवारी यांना प्रत्यक्ष भेटी देऊन षटकार करण्यास सांगितलें त्यानुसार किशोर तिवारी यांनी आपल्या पत्नी स्मिता तिवारी यांच्या सोबत वैद्यकीय महाविद्यालयात भेट देऊन कोरोना योध्दांचा सत्कार केला. हे  डॉक्टर तसेच कर्मचारी हे सतत कोरोना आयसोलेशन मध्ये कार्यरत आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता तसेच कायम त्याच ठिकाणी करीत असल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. 
यवतमाळच्या वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय मध्ये मागील 4 महिन्यापासून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची पूर्णवेळ सेवा करणाऱ्या डॉक्टरांच्या नर्सेस सफाई कामगार यांचा सत्कार महाराष्ट्राच्या सरकारकडून त्यांच्या  अहोरात्र सेवेची आभार मानत विनम्र अभिवादन करीत  सर्व डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचे ऋणी आहोत असल्याचा निरपो देण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्यामुळे सार्यांनी यावेळी समाधान   व्यक्त केले ..

यावेळी किशोर तिवारी यांनी या यवतमाळ जिल्ह्यातील कै वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयातील जी डॉक्टरांची ,आरोग्य सेविकांची ,सफाई कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीची चर्चा असुन ज्या कोरोना योध्दांच्या मी आज सत्कार केला त्यामध्ये माझे आदीवासी , अनुसुचित व भटक्या जमातीचे अत्यंत कठीण गरिबीची संघर्षाचा प्रवास करीत ही अभुतपूर्व देवाचे कांक्रीट आहेत मात्र मूठभर लोक त्यांच्या अडचणी न समजता उगाच आरोप करतात हे टाळले पाहीजेत असे आवर्जुन सांगीतले त्यावेळी कोरोनाचे भय व त्यामुळे कोरोनाग्रस्तांची मानसिक स्थिती पाहून सर्वानी संयम व विन्रमता न सोडण्याचा हे सुद्धा सांगीतले . 

कोरोना ही  महामारी सर्वांना नवीन आहे त्यातच याचे नियंत्रण नौकरशाही व पोलिसवाले करीत आहेत त्यामुळे आरोग्य सेवेत काम करणाऱ्या सर्वांना प्रचंड तणाव सहन करावा लागत आहे याला कमी बुद्धी व अल्प  शिकलेल्या  राजकारणी मंडळी कारणीभूत असल्यामुळे आपण आपला संयम व सेवेचा निर्धार सोडू नये असा सल्ला देत हाच आपला मुक्तीचा मार्ग असल्याचा निरोप किशोर तिवारी यांनी यावेळी दिला . 










Tuesday, August 18, 2020

"बॉलीवूडमध्ये शेकडो कलाकारांच्या हत्याकरून आत्महत्या दाखवून रफादफा करण्यात आल्याचा अभिनेता मुकेश खन्ना यांनी केलेल्या खळबळजनक दाव्याची मुंबई पोलिसांनी चौकशी करून सत्य बाहेर काढावे " - किशोर तिवारी यांची मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणी !!

"बॉलीवूडमध्ये शेकडो कलाकारांच्या हत्याकरून आत्महत्या दाखवून रफादफा करण्यात आल्याचा अभिनेता मुकेश खन्ना यांनी केलेल्या खळबळजनक दाव्याची मुंबई पोलिसांनी चौकशी करून सत्य बाहेर काढावे  " - किशोर तिवारी यांची मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणी !!

खोटे असल्यास सतत मीडिया ट्रायल चालवून न्यायालय, पोलिस व सरकारला बदनाम करु पाहणाऱ्या लोकांना  ताबडतोब अटक करून खटला दाखल करण्यात यावा !

दि. १८ ऑगस्ट २०२०

"मुंबई बॉलीवूड इंडस्ट्रीतील खुनांचे अनेक गुन्हे दडपले जातात आणि सुशांत सिंग राजपूत प्रकरणासारख्या आत्महत्येच्या घटनांमध्ये रुपांतर केले जाते " असा बेछूट दावा करीत टीव्ही, चित्रपट व  बॉलिवूड अभिनेता श्री. मुकेश खन्ना यांनी केलेला सनसनी खेज आरोप मुंबई पोलीसांच्या १५० वर्षाच्या ऐतिहासिक अभुतपुर्व लौकिक व गौरवप्राप्त प्रतिमेला काळीमा फासणारा असुन ही बाब खन्ना रिपब्लीक टिव्हीच्या मागील दोन महिन्यांपासून २४ तास सुरु असलेल्या मीडिया ट्रायल मध्ये करीत असुन या संपुर्ण कथित हत्यांची व त्यांच्या कथित कटांची पुर्ण माहिती चा दावा करणारे मुकेश खन्ना याना असेलच.  त्यांच्या  दाव्याचे पूर्ण समर्थन रिपब्लिक टीव्ही चालक मालक अर्णब गोस्वामी आणि भाजपचे  प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी केले  असल्याने 
माणुसकी व समाजाविरूद्ध अशा अत्यंत गंभीर गुन्ह्यांत दोषी असलेल्या कथित आरोपीना शिक्षा देण्यासाठी त्यांच्याकडून सत्यता वदवून घेण्यासाठी त्वरित कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी मुंबई पोलीसांना एका सविस्तर लेखी निवेदनात केली आहे . 

किशोर तिवारी हे मागील ३० वर्षांपासून शेतकरी व आदीवासी चळवळीत सक्रिय आहेत . त्यांनी व्यवस्थापन, कायदा आणि लोक प्रशासन या विषयात पदव्युत्तर पदवी आणि अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. त्यांनी मुकेश खन्ना यांच्या  गंभीर वक्तव्याची व त्यांनी केलेल्या खळबळजनक आरोपांची एका निवेदनात सविस्तर माहिती कडे  लक्ष वेधून मुंबई पोलिसांनी सखोल चौकशी करणारा कायदेशीर अर्ज दिला असुन त्याची प्रत  महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्रत्यक्ष भेटून सादर केली आहे . 

आपल्या निवेदनात घटनेचा सविस्तर तपशील देतांना त्यांनी म्हटले आहे की मी दि. १२ ऑगस्ट व १३ ऑगस्ट २०२० ला चालक मालक अर्णव गोस्वामी यांच्या रिपब्लिक भारत व रिपब्लिक टीव्ही वर खुल्या चर्चेसाठी आमंत्रित केल्यावर  गेलो होतो. दोन्ही चर्चेतील मुख्य विषय म्हणजे फिल्मस्टार सुशांतसिंग राजपूत(एसएसआर) आणि एका दिशा सालियन यांच्या अकाली मृत्यूच्या दुर्दैवी घटनेशी संबंधित होते. दोन्ही घटना मुंबई पोलिसांमार्फत संबंधित पोलिस स्टेशनच्या प्रभारी संबंधित पोलीस निरीक्षक यांचे मार्फत मुख्य न्यायिक / महानगर दंडाधिका ऱ्यांच्या  नियंत्रणाखाली चौकशीत आहेत. त्यातच  मुंबई पोलिसांच्या चौकशीचा तसेच बिहार पोलिसांच्या चौकशीचा मुद्दा माननीय सर्वोच्च न्यायालयात अधीन आहे, ही वास्तविक स्थिती सर्वांना ठाऊक असल्याने मी रिपब्लिक टी व्ही चर्चेमध्ये या मुख्य बाबीला उजाळा देणे निकडीचे आहे असे समजून, हा मुद्दा मी स्पष्ट केला. सुप्रीम कोर्टाच्या न्याय प्रविष्ट  खटल्याच्या निष्कर्षापूर्वी मीडियाने या खटल्याचा निर्वाळा देणे म्हणजे आपण माननीय सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवत नाही काय ? चौकशी सीबीआय किंवा मुंबई पोलिसां करावी , यावर निर्णय येत पर्यंत आपण थांबू शकत नाही काय ? न्यायालयीन कारवाईवर दबाव टाकण्यात केलेला हा प्रयत्न असून आणि चौकशी / कार्यवाही यावर प्रभाव पाडणे अशा माध्यमांच्या खटल्याद्वारे भारतातील फौजदारी कायदा प्रणालीत हस्तक्षेप करण्यासाठी किंवा त्याचा प्रभाव पाडण्यासाठी का केला जातो ? असा सवाल मी टीव्ही अँकर श्री अर्णब गोस्वामी, त्यांचे इतर समर्थक मुकेश खन्ना आणि डॉ. संबित पात्रा यांना करून न्यायपालिका, महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलिस आणि ठाकरे कुटुंबाची प्रतिमा डागाळण्यापासून रोखण्याचा मी प्रयत्न केला पण ते माझ्या विचारांकडे दुर्लक्ष करीत होते  आणि माझा आवाज दडपत होते . माझे मुद्दे समजून घेतल्यानंतरही , एंकर आणि त्याचे समर्थक रिपब्लिक टीव्ही आणि रिपब्लिक भारत या कार्यक्रमांतील माझ्या सारख्या भाग घेणाऱ्याचा जाणीव पूर्वक अपमानास्पद आणि बदनामी करण्याच्या प्रयत्नात होते . न्यायालयीन कामकाज / पोलिसांकडून चौकशी आणि अशा प्रकारे न्यायालयाचा अवमान करण्याचा प्रयत्न करीत होते. तसेच पोलिसांच्या चौकशीत हस्तक्षेप करणे व मीडिया ट्रायल चालवून समाजाचे व जनतेचे लक्ष चुकीच्या भ्रामक कपोलकल्पित विषयाकडे नेते होते.परंतु मी हे निदर्शनास आणून देत होतो की मीडिया ट्रायलमुळे न्यायालयाचा अवमान होत आहे / फौजदारी न्यायालयीन प्रणालीत हस्तक्षेप होतो आणि अशा प्रकारच्या मीडिया ट्रायल पोलिसांच्या चौकशी आणि न्यायालयीन कामकाजात व्यत्यय आणू नये किंवा हस्तक्षेप करू नये. जेव्हा विषय न्यायालयात अधीन असेल, त्यात असा व्यत्यय आणणे म्हणजे कोर्टाचा अवमान आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे परंतु त्यांनी माझे म्हणणे ऐकल्याशिवाय,  हेतूपूर्वक उल्लंघन करणे चालू ठेवले आणि कोर्ट कारवाईवर प्रभाव पाडण्यास आणि त्यात अडथळा आणण्याचा अजूनही प्रयत्न केला जात आहे. या कार्यक्रमादरम्यान, त्यांनी ठाकरे कुटुंबीयांबद्दल अत्यंत पूर्वग्रहित, विकृत, पक्षपाती , एक तर्फी आणि पूर्वनिर्धारित शैलीत, मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे यांना या प्रकरणातील "मुख्य आरोपी" म्हणून पदावर काढून टाकण्याची मागणी सुद्धा करीत होते. ते कोणत्या आधारावर असे जाहीरपणे विधान करतात हे कुणालाही समजण्यास वाव नाही.  वादविवादाच्या स्वर आणि स्वरूप पाहून मला जाणवले की संपूर्ण शैली आणि वादविवादाची पध्दत पूर्वनिर्धारित पद्धतीने खोटी, असत्य, कंटाळलेल्या कथा आणि पूर्वग्रहवादी मानसिकतेवर आधारित होती, जी मी माझ्या सामाजिक जीवनात यापूर्वी कधीही पाहिली नव्हती आणि अनुभवली नव्हती. 
मी २० वर्षांहून अधिक काळ टीव्ही चर्चेत भाग घेत आहे. परंतु असा पित पत्रकारितेचा राजरोस प्रकार  मी कधी ही जीवनात पाहिला नाही. 
उठ सुठ खळबळ उडवून आरोप करण्याचा या लोकांनी धंदा बनविला असल्याने, यावर म्हणूनच त्वरित कारवाई केली आहे आणि कायदेशीर नोटिस नोंदविली आहे, ज्याची एक प्रत मुंबई आणि  पोलिस आयुक्त  आणि गुप्तचर पोलिसांना सादर केली आहे. 

यावेळी उपरोक्त टी वी मीडिया ट्रायल मधे भाग घेणारा  मुकेश खन्ना ज्याने स्वत: ला लॉ ग्रॅज्युएट असल्याचा दावा करून खळबळ जनक आरोप केला की मुंबईच्या चित्रपट जगात शेकडो हत्या अशाच होत असतात, ज्या की आत्महत्या दाखवून दाबल्या जातात, असे विधान  अँकर श्री अर्नब गोस्वामी आणि डॉ. संबित पात्रा यांच्या समन्वयाने खुलेपणाने जाहीर केले. “मुंबई बॉलिवूड इंडस्ट्रीत खुनाच्या अनेक गुन्ह्यांना दडपले जाते आणि सुशांत सिंग राजपूत प्रकरणासारख्या आत्महत्येच्या घटनांमध्ये रुपांतर केल्या जातात,” असे वारंवार विधान करून एक गंभीर विषय समोर करून देशाला बुचकळ्यात टाकले आहे. चर्चेत सहभागी अ‍ॅड. उज्ज्वल निकम आणि अ‍ॅड. मर्चन्ट यांचे समोर  हे विधान केले आहे. लाखो लोकांनी टी वी वर हा खुला आरोप पाहिला v एकला आहे. म्हणूनच वाद ग्रस्त खळबळ जनक विधानांची व्हिडिओ क्लिप निवेदनासोबत सादर करून मागणी केली आहे की मुकेश खन्ना यांना पोलिसांनी साक्ष समन्स पाठवून बोलवावे आणि या प्रकरणी सत्य काय आहे ? कोणते खून कोणी केले ?  कोणत्या पोलिसांनी हे खूण आत्महत्या दाखवून लपविले ? याची संपूर्ण माहीती जगाला  कळणे गरजेचे आहे. हे कथित खून माहीत असूनही आज पर्यंत मुकेश खन्ना गप्प कां होते ? आज त्यांना अचानक जाग कशी काय आली ? चक्क आता मीडिया ट्रायल व विकृत शोष प्रत्रकारितेचे जनक अर्णब गोस्वामी आणि भाजपचे प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांना समोर ठेवून हे आरोप करत आहेत, त्यामुळे यात काय खरे व खोटे आहे ? , हे जगासमोर येणे गरजेचे आहे. जर त्यांचे आरोप बिनबुडाचे व षडयंत्र रचून केलेले असल्यास त्यांचेवर समाजात अशांतता व बदनामीसाठी माध्यमांचा वापर करीत असल्यामुळे फोजदारी व देशद्रोहाची कारवाई करावी . सोबतच वॉटरगेट शोधल्याचा आव आणणारे सुपारीबाज पत्रकार यांचेवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी किशोर तिवारी केली आहे . 

किशोर तिवारी यांनी आपल्या सविस्तर निवेदनात म्हटले आहे की हे आरोप जर चुकीचे असेल तर, माझी अशी मागणी आहे की खोटी व दिशाभूल करणारी भ्रामक माहिती दिली असल्याचे सिद्ध झाल्यास, सरकार आणि पोलिसांनी प्रत्येक व्यक्तीकडून ₹. १०० कोटी रुपयांच्या नुकसानीचा खटला भरणे आवश्यक आहे. जेणेकरून इतरांना धडा शिकविता येईल. कारण हा सर्व प्रकार म्हणजे चक्क बदनामी करण्याचा असून अशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणे विशेषत: फौजदारी षड्यंत्र रचून खऱ्याचे खोटे करण्यासाठी खोटी विधाने, पोलिस / फिर्यादी यंत्रणा भ्रमित करणे, खंडणीचे प्रकार करणे , बेकायदेशीर पुरावे तयार करणे पोलिस, सरकार, न्यायालये, टीव्ही चॅनेल्सवर खालच्या पातळीची प्रसिद्धीसाठी चुकीचे आणि दुर्दैवी नीच  हेतूने टीव्ही चॅनेल्सवर प्रसारित / खोटी, असत्य आणि दिशाभूल करणारी कहाणी प्रसारित करणे आणि प्रकाशित करणे यासह सुपारी घेवून  बदनामी चा प्रयत्न असल्यामुळे  मुकेश खन्ना यांचे विधान सखोल तपासून खरे खोटे काय ते जगासमोर पोलिसांनी आणावे जेणे करून ते चुकीचे असल्यास अफवा पसरवण्यासाठी आणि न्यायालय, सरकार आणि मुंबई पोलिसांची प्रतिमा कलंकित करण्याच्या हेतूने केलेला कलुशीत प्रकार म्हणून सत्य उघडीस आणावे व त्यांच्यावर गुन्हा दाखल करून खटला चालवावा, असे आवाहन किशोर तिवारी यांनी मुंबई पोलिसां ना केले आहे. 
सुपारी बाज पत्रकारिता चालवून असे बेछूट खळबळ जनक आरोप करण्याचे हे प्रकार असल्याने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, अश्या प्रवृत्तींना धडा शिकवण्यासाठी 
वेळ पडल्यास या  प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल असेही तिवारी यांनी घोषित केले आहे. 
===========================


सोबत किशोर तिवारी यांचे पोलिसांना सादर केलेले संपुर्ण सविस्तर इंग्रजी निवेदन देण्यात येत आहे 
=============================

Farm Activist -Kishore Tiwari can be contacted 
mobile number-
09422108846 and email- kishortiwari@gmail.com 

===============
TEXT QUOTE
=============


To,
The Commissioner of Police,
Mumbai City Police Commissionrate,
Mumbai
Kind Attention :
Shri. Param Bir Singh, IPS
Reg: In the matter of open public statement made by one Mr. Mukesh Khanna, a film/ bollywood actor in connayance & conspiracy with Mr. Arnab Goswami & Dr. Sambit Patra openly claiming that they have knowledge & information that "many crimes of murders in Mumbai bollywood industry are suppressed and turned into cases of suicides like Sushant Singh Rajput case"
Sub : Request to take congnizence of such open  statements made publically by Mr. Mukesh Khanna  in connonyance & conspiracy with said Mr. Arnab Goswami who claims to be Editor in Chief of TV Channel Republic TV & Dr. Sambit Patra, BJP Spokesperson and to summon them to reveal truth before Ld. Judicial Magistrate or if their statements are found to be false, book/ prosecute them for criminal mischief,criminal conspiracy,  spreading rumours, making delibarate misleading statements knowing it fully flase - untrue, fabricating -  planting false evidences to mislead police probe, criminal abatement, using false declaration as true, attempt for extortion & criminal defamation including airing of debate with defamatory statements in society and tarnishing the image of Judiciary, State Government & Mumbai Police with the Ill motives & intention to create confusion & communal hatered in the minds of public/ society at large.
Ref :
1) Open to Air Public debate programs aired on  media channels Republic TV and Republic Bharat  on 12/08/2020 and 13/08/2020 in which I was invited to join & express my views.
2) My notice of Prosecution for Criminal Defamation for insult, public humiliation, defamation, injury to prestige & image and Institution of  Civil Suit for damages for suppression of voice & infringement of fundamental rights guaranteed under Constitution of India.
Dear Mr. Singh, 
I am an activist and working as a Chairman of Govt of Maharashtra's Farmers Mission named Vasantrao Naik Sheti Swavalamban Mission (VNSSM) with the Rank & Status of Minister of State since August 2015.  I have been devoting my life for the cause of Farmers, Tribals & sufferers in rural parts of Maharashtra especially, Vidarbha & Marathwada regions.
I am law abiding citizen of this country being well qualified having engineering degree with post-graduation in management, law & public administration and always worship for Rule of Law.
I am writing this to you to point of one serious matter of  Interest & to seek your immidiate attention & intervention in the matter of sensational public statements made by one Mr. Mukesh Khanna, a TV film/Bollywood actor in connayance & conspiracy with Mr. Arnab Goswami & Dr. Sambit Patra claiming that they have full knowledge & information that "many crimes of murders in Mumbai bollywood industry are suppressed and turned into cases of suicides like Sushant Singh Rajput case" and therefore, I am constrained to approach you so as to take immediate action to extract truth from them to punish guilty accused involved in such most serious crimes against humanity & society.
Brief of Incidents:
1) On 12/08/2020 and 13/08/2020, I have been respectfully invited by one TV Channel - Republic TV for TV debates on E Media TV Channels - Republic TV and Republic Bharat respectively.
2) The main subjects in both the debates was pertaining to the unfortunate incident of untimely deaths of film star Sushant Singh Rajput (SSR) and one Disha Salian. Both the incidents are under inquiries by Mumbai Police through Police Station In-charges of respective police stations under the control of respective Ld.Judicial / Metropolitan Magistrates.
3) As I was aware that the issue of inquiry by the Mumbai Police as well as investigation by Bihar Police is subjudiced in Hon'ble Supreme Court of India, I thought it is prudent to highlight this prime aspect in the debate so that no controversy can surface at this stage, when the issue is before Hon’ble SC. So, in the first stage of debate itself, I made it clear & aware to all that I am neither representing any party nor any body and pointed out in both the debates that why this loud voiced Media Trial ahead of conclusion of Supreme Court Trial? Why don't we keep faith in Hon'ble Supreme Court ? Why can't we wait till SC decides on CBI or Mumbai Police probe ? Why this attempt at Contempt of Court and influence inquiry / proceedings is made by such media trial to interfere with or to influence the criminal law dispensing system in India ? I tried to resist TV Anchor Mr. Arnab Goswami , his other supporters Mukesh Khanna and Dr. Sambit Patra, from tarnishing the image of Judiciary, Maharashtra Government & Mumbai Police and Thackeray family, but they were neglecting my views & suppressing my voice. 
4) Having understood my points, the said Anchors & his supporters in programs of Republic TV and  Republic Bharat started, publically humiliated, insulted and defamed me ignoring the fact that the directions of the public debate on the subjudiced matter has caused direct interference & breach of court proceedings / inquiry by police and thus is an attempt of contempt of court as well as interference in inquiry by Police.
5)  But as I was pointing out the fact that the debates are causing contempt of court / interference in criminal justice dispension system and such media trials are in breach of settled principles not to influence or interfere with the Police inquiry and judicial proceedings of the courts when the matter is subjudiced. But they without listening to me, continued this willful disobedience and tried to influence & interfere with the proceedings thereof.
6) Once during the program, they had gone one step more to term Maharashtra Chief Minister Mr. Uddhav ji Thackeray as "prime accused" of the case, in a most prejudged, perversed, biased and predetermined style towards Thackeray family.
I really failed to understand on what basis they are making such open public statement ?
7) I could realize from the tone & tenor of the debates that the entire style & approach of debates was based upon false, untrue, concocted stories & prejudice mindset in a predetermined way, which I have never seen & experienced ever before in my Social life, though I am participating in TV debates for more than 20 years now. I, therefore, have taken immediate action and set in motion a legal notice recording all above, a copy of which is enclosed herewith for your kind perusal n information.
8) As I am very much pained , shocked & disturbed as One of the participant in the debate Mr. Mukesh Khanna who claimed himself as Law Graduate and is said to be a film/
Bollywood actor, made open bold public statement in connayance with anchor Mr. Arnab Goswami & Dr. Sambit Patra that they have full knowledge & information that
"many crimes of murders in Mumbai Bollywood industry are suppressed and turned into cases of suicides like Sushant Singh Rajput case", I am now approaching you as this open public statement is made in my personal presence in the debate along with co-participants Adv. Ujjawal Nikam & Adv. Merchant which was aired live on said TV Channel. I am submitting video clip of said debate and statements made there in, so as to demonstrate the gravity & seriousness of the case.
9) These open public statements by them are pertaining to very serious cognizable offences of "murders" during last few decades committed in bollywood industry & said to be turned into "suicides", it was a matter of very rude shock and therefore, as a law abiding citizen of this country, I thought it prudent & my lawful duty to bring this to your knowledge & information with the request to take immediate congnizence of such catogorial statements made publically by Mr. Mukesh Khanna in connivance with Mr. Arnab Goswami & Dr. Sambit Patra and to summon them to reveal truth in the interest of justice.
10) I demand that THEY MUST INFORM HOW MANY SUCH MURDERS-CONVERTED TO SUICIDE BY POLICE/ COURTS IN PAST 50 YEARS of which they claim to have knowledge. THE NAMES/ADDRESS OF ALL THE VICTIMS, DATES OF THEIR MURDER, DATEs ON WHICH IT WAS PROVED SUICIDE BY POLICE & COURT VERDICTs.
THIS CAN ENABLE POLICE TO REOPEN THESE CASES AND GIVE JUSTICE TO ALL SUCH PEOPLE.
THEY SHOULD ALSO PROVIDE DETAILS OF ALL SUCH MURDERS THEY HAVE WITNESSED, COMMITTED BY WHOM WHETHER MAFIA OR BOLLYWOOD ROGUES, Who WERE KILLED, WHETHER CONTRACT KILLING, WHO GAVE THE SUPARI, ETC.
THIS IS EXTREMELY VITAL SO THAT ALL PAST CASES OF ALLEGED MURDERS claimed to be  CONVERTED TO SUICIDEs CAN BE PROBED AND JUSTICE CAN BE GIVEN. THE MAHARASHTRA POLICE CAN SET An S.I.T. AS ITS TENTAES MAY BE SPREAD TO OTHER STATES AND COUTRIES.
IF MUKESH KHANN, Arnab Goswami & Dr. Sambit Patra are PROVED RIGHT They SHOULD GET  POLICE Rewards.
IF WRONG, they  SHOULD BE BOOKED/ Prosecuted under various provisions of IPC, especially for offences of Criminal Conspiracy, Abatement, false statements with intension to seek capital punishment for murder, creating flase story & evidence to mislead police / prosecution machinery, extortion, unlawful assembly and criminal attempt to cause delibarate crimes and criminal defamation including airing / publishing false, untrue and misleading stories & debate on TV Channels against the  POLICE, Government, COURTS, TARNISHING IMAGE OF All FOR CHEAP PUBLICITY and ill motives.
I also demand, if their version proves to be false & misleading, Govt & Police must institute suit for damages to the tune of Rs.100 Crores to be recovered from each for tarnishing image so as to teach lessons to others such elements who may be trying to defame & mislead.
If their statements are found to be true congnizible offences be booked & investigated but if it is false, then also book/ prosecute them for spreading rumours and tarnishing the image of Judiciary, Government & Mumbai police with the intention to create confusion & communal hatered in the minds of public/ society at large.
Specific Mention :
11) Being disciple of law, I strongly demand that such style & approach of making open catagorial statements of having full knowledge & information that "many crimes of murders in Mumbai bollywood industry are suppressed and turned into cases of suicides like Sushant Singh Rajput case", in nothing but a blot on image of the Judiciary and Policing Mechanism under it. This need to be taken very seriously and if one now openly saying that "many crimes of murders in Mumbai bollywood industry are suppressed and turned into cases of suicides like Sushant Singh Rajput case" must be called / summoned to reveal truth & to give factual information of this so called knowledge of such alleged incidents of "murders" claimed to be turned into the cases of "suicides" !!
12) Needless to point out that every citizen of India who claims having such sensational knowledge & information of such alleged incidents of "murders" claimed to be turned into the cases of "suicides", is duty bound by law of land to come forward and tell so called truth of commissioning of such crimes against humanity / society. If such statements are documented & brought to the knowledge & information of you as an officer of Police, it is your duty to call upon scu persons claiming to hv such exact knowledge/ information of such sensational murder cases particularly in bollywood industry for which entire nation has special concern, being much debated talk of the town !!
So I strongly feel that such open air public statement heard by entire nation on such TV Channel should not be taken lightly but need to be dealt with very seriously.
 
13) This is upmost needed so as to maintain public faith & confidence in rule of law so that alleged incidents of "murders" claimed to be turned in to the cases of "suicides", should not spoil image of Judiciary and Policing in Mumbai.
 
Hence this Representation.
Thanking you,
Yours faithfully,
 
Kishore Tiwari
Chairman, Vasantrao Naik Sheti Swavlamban Mission (VNSSM)
Government of Maharashtra
(Minister of State Rank)
Mbl : +919422108846
Copy to:
1) Shri. Anil Deshmukh,
Hon'ble Home Minister,
Government of Maharashtra,
Mantralaya,
Mumbai 400032.
2) The Director General of Police,
Maharashtra Police Head Quarter, Mumbai 400001.
Kind Attention :
Shri. Subodh Kumar Jaiswal, IPS
 
3) The Additional Chief Secretary,
Department of Homes,
Govt of Maharashtra,
Mantralaya,
Mumbai 400032.
With the request to take immediate action in the matter.
Details of other person involved in the incident :
1) Mr. Mukesh Khanna,
Film Actor,
Residence :
 3/Parijat,
95, Marine Drive,
Mumbai 400002.
Office at :  MK Films
(Film Production Company), Office No. 21, Juhu Ekta Building,
Juhu Vresova Link Road, Andheri West,
Mumbai 400053,
Maharashtra
2) Shri. Arnab Ranjan Goswami,
Editor in Chief, Republic TV, an English TV E Media Channel and Republic Bharat, a Hindi language TV E Media Channel
Purported to be owned by :
Republic Media Network
Under Corporate Entities:
M/s. SARG Media Holding Private Limited,
(CIN : U74999MH2016PTC284385)
having Registered office at
B-1701/1702,
Raheja Atlantis CHS,
Ganpatrao Kadam Marg,
Lower Parel Mumbai-400013.
And
M/s. ARG Outlier Media Private Limited,
(CIN: U74999MH2016PTC284365)
having it's Registered office at
NBW Building, Wadia International Centre,
Bombay Dyeing Compound,
PB Road, Worli,
Mumbai- 400025.
Both Entities Represented by its
Director Shri. Arnab Ranjan Goswami
DIN No. 07659213
Republic Media Network,
Wadia International Centre,
Kamala Mills Compound,
NBW Building, Bombay Dying, Pandurang Budhkar Marg,
Century Mills, ch Lower Parel,
Mumbai - 400025
3) Dr. Sambit Patra, Son of Shri.
Rabindra Nath Patra ,
Age: 47 yrs.
BJP Spokesperson,
BJP Head Quarter at Dindayal Marg,
New Delhi 110011
Residence Address:
1536 , Chandrawal Road, Ghanta Ghar, Malka Ganj,
Delhi 110007,
Also At :
HIG-348,
K-5 , Kalinga Vihar Bhubaneswar 751019
Name Enrolled as Voter in:
Timarpur (Orissa) Assembly Constituency ,
at Serial no 86
in Part no 137
Contact Number: 9999611442 , 9868411442
+=============
UNQUOTE
===================

Thursday, August 13, 2020

१ कोटी २५ लाख आदिवासी लोकसंख्येच्या १२ लाख कुटुंबांना सरसकट मदत रू. ४०००/- प्रती कुटुंब सरळ खात्यात जमा करण्याच्या पॅकेजचे किशोर तिवारी द्वारे स्वागत : मुख्यमंत्री उध्दव जी ठाकरे यांचे आभार !

 १ कोटी २५ लाख आदिवासी लोकसंख्येच्या १२ लाख कुटुंबांना सरसकट मदत रू. ४०००/- प्रती कुटुंब सरळ खात्यात जमा करण्याच्या पॅकेजचे किशोर तिवारी द्वारे स्वागत
मुख्यमंत्री उध्दव जी ठाकरे यांचे आभार !
दिनांक -१३ ऑगस्ट २०२०
कोविड महामारी च्या नावावर लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे हवालदिल झालेल्या लाखो आदिवासी व वनवासी पाड्यातील कुटुंबातील एक कोटी पंचवीस लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या अनुसूचित जमाती च्या लोकांना रोख अनुदान द्यावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आदिवासी व वनवासी चळवळीचे प्रणेते व राज्याच्या शेतकरी स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या प्रयत्नांना यश आले असून राज्यातील श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचे पहिले आर्थिक पॅकेज घोषित केले असून सर्व १२ लाख आदिवासी व वनवासी कुटुंबांना सरसकट रू. ४०००/- प्रती कुटुंब सरळ खात्यात जमा करण्याच्या पॅकेजचे स्वागत आदिवासी व वनवासी चळवळीचे प्रणेते व राज्याच्या शेतकरी स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील आदिवासी कुटुंबांना राज्य मंत्रिमंडळाने एक विशेष एकमुस्त अनुदान देण्याचा निर्णय काल मुख्यमंत्री उध्दव जी ठाकरे यांच्या नेतृत्वात घेतला. आदिवासी आणि वनवासी समुदायांसाठी भरीव अश्या रू.४३४ कोटी रुपयांचे उत्तेजन पॅकेज मंजूर करून प्रत्येक आदिवासी कुटुंब सरसकट पुनरुज्जीवन योजनेंतर्गत रू.४०००/-  रुपयांच्या निर्वाह अनुदानास पात्र ठरविण्यात आल्याने अनाठायी लॉक डाऊन मुळे त्रस्त झालेल्या आदिवासींना मोठा दिलासा मिळाला असल्याने किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आभार मानले आहे. 
अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) मनोजकुमार सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्च स्तरीय समिती या योजनेच्या अंमलबजावणीची देखरेख करेल.  पुढील महिन्यात रोख हस्तांतरणाची पहिली तुकडी करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. 
राज्यात आदिवासींची लोकसंख्या १ कोटी २५ लाख चे वर असून ती राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागात ११.९५ लाख कुटुंबांमध्ये वाटली गेली आहे. त्या सर्वांना सरसकट लाभ मिळणार असून लॉक डाऊन मुळे त्यांचे जे हाल झालेत त्यात आता सरकारच्या या एक मुस्त मदतीने लाभ होणार आहे.
आदिवासी विकास विभागाने वस्तू स्वरुपाची मदत प्रस्तावित केला होती, परंतु मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी थेट लाभ रोख हस्तांतरण करण्यास अनुकूलता दर्शविली, या कारणावरून वाटप लवकर आणि अधिक प्रभावी होवू शकले त्यांनी सांगितले.
आदिवासी व वनवासी चळवळीचे प्रणेते व राज्याच्या शेतकरी स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सतत केलेल्या मागणी वरून आदिवासी मदत व पुनरुज्जीवनाच्या उपाययोजना सुचविण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समितीने मे महिन्याच्या सुरूवातीला लॉकडाऊनचा परिणाम जाणून घेण्यासाठी असुरक्षित घटकांसाठी रोख बदल्यांची शिफारस केली होती.  लॉकडाऊनने ग्रासलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना थेट रोख हस्तांतरणाची योजना तयार केली गेली कारण वितरणासाठी वस्तू खरेदी केल्यास मदतीस उशीर होईल.  आदिवासी आणि वनवासी समुदाय दीर्घकाळ लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान सहन करीत असल्याचे तिवारी यांनी सतत सरकार समोर मांडले. लॉक डाऊन मुळे किरकोळ वन्य उपज यांचे संकलन व विक्री सुध्धा प्रभावित झाली असताना आदिवासी हवालदिल झाले असल्याने सरसकट सरळ आर्थिक पॅकेज घोषित करावे, अशी आग्रही भूमिका तिवारी यांनी सातत्याने पाठपुरावा करून मांडली. लॉक डाऊन मुळे कोणतेही बांधकाम कार्य न केल्यामुळे, दरवर्षी रोजीरोटीसाठी शहरांमध्ये स्थलांतर करणार्‍या कुटुंबांना लवकरात लवकर गावात परत जाणे भाग पडले आहे. यामुळे आदिवासींच्या  जीवनावर चिंता निर्माण झाली. आधीच महाराष्ट्रातील काही आदिवासी पट्ट्यांमध्ये कुपोषण, माता व बाल मृत्यूच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे आता या आर्थिक  पॅकेज ने आदिवासी व वनवासी समुदायाला दिलासा मिळाला आहे, त्यामुळे सरकारच्या नवीन योजनेचे स्वागत असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे. 
*******