Thursday, October 22, 2020

देवेंद्रग्रस्तांमध्ये मध्ये एकच नाथाभाऊ नाहीत अनाथांचा छळाच्या कथा अनंत-किशोर तिवारी यांची बोचरी टीका

देवेंद्रग्रस्तांमध्ये मध्ये एकच नाथाभाऊ नाहीत  अनाथांचा  छळाच्या कथा अनंत-किशोर तिवारी यांची बोचरी टीका 

दीनांक-२२ ऑक्टोबर २०२०

Add caption

खूप दिवसांपासून नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. राजीनामा दिल्यानंतर खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच आपण भाजप नेतृत्वावर नाराज नसून देवेंद्र फडणवीसांमुळं राजीनामा देत असल्याचं खडसेंनी सांगितलं. आपलं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला असल्याचं खडसे म्हणाले. मात्र देवेंद्रग्रस्तांमध्ये मध्ये एकच नाथाभाऊ नाहीत  अनाथांचा  छळाच्या अनंत कथा असुन आपणास मागील ५ वर्षाच्या सत्तेच्या काळात फारच जवळुन अनुभव आल्याची बोचरी माहीती सध्या शिवसेनावासी झालेले मुळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नाड असलेले शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी आज एका निवेदनाद्वारे दिली . 

देवेंद्र फडणवीस यांची १८ तास काम करण्याची पद्धत एकखांबी काम करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टाइल अंगिकारल्यामुळे  व अमित शाह सह मोदींची अभुतपुर्व चाटूगीरी करण्याच्या शैलीमुळें त्यांना  २०१४च्या निवडणुकीच्या काळातच राज्याचे भाजप अध्यक्ष नरेंद्र मोदी यांनी आपले महाराष्ट्राचे पंतप्रधान पदाचे दावेदार नितीन गडकरी त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून तयार केलेले एकनाथ खडसे विनोद तावडे चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवार प्रकाश मेहता माधव भंडारी अतुल भातखळकर यांच्या सारखे प्रमोद महाजन यांच्या तालिमीत वाढलेले कार्यकर्ते घरी बसविण्याची जबाबदारी दिली होती व त्यानंतर २०१४च्या मोदीलाटेत मुख्यमंत्र्याची गद्दी सुद्धा सर्व मुसद्दी नेते डावळून देण्यात आली त्याचवेळी साऱ्या फाईली अमित शाह पास केल्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी ओके ही अट टाकण्यात आली होती मात्र देवेंद्र फडणवीस मिळालेली संधी फक्त आपल्या चांडाळ चौकडी त्यामध्ये गिरीश महाजन डॉ संजय कुटे जयप्रकाश रावळ व संभाजी निलंगेकर यांचा समावेश होता तर परिणय फुके व डॉ रणजित पाटीलांच्या या चाकरांच्या मदतीने गाजविली त्यातच आशिष शेलार मामा व मंगलप्रभात लोढा यांनी सुद्धा मुंबईचा हिशोब पुरा केला यामुळे भाजपाची सर्वत्र संघटनात्मक दाणादाण होत असतांना आपण जवळुन पाहिल्याचा दावा किशोर तिवारी यांनी केला . 

सत्तेच्या शेवटच्या तीन वर्षात नौकरशाहीला खैरात वाटुन देवेंद्र सर्व स्पर्धकांना  गारद  केले दररोज  रात्रीला वर्षा बंगल्यावर आपल्या चांडाळ चौकडी त्यामध्ये गिरीश महाजन डॉ संजय कुटे जयप्रकाश रावळ व संभाजी निलंगेकर यांचा सोबत कुणाचा बंदोबस्त कसा करायचा याची योजना आखण्यात येत होती  तर परिणय फुके व डॉ रणजित पाटील यांनी फाईल क्लिअर करण्यासाठी जमवाजमव करीत अशी चर्चा फार जोरात चालत असे त्यामुळे संघानी दिलेले भाजपचे संघटन मंत्री हताश पाहिल्याचे किशोर तिवारी यांनी यावेळी म्हटले आहे . 

आपणास २०१२च्या डिसेंबरमध्ये भाजपा तत्कालीन अध्यक्ष  नितीन गडकरी यांनी भाजपासोबत  काम करण्याचे निमंत्रण दिले होते मात्र २०१४च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपणास भाजपामध्ये नाथापॅटर्नने केराची टोपली दाखविण्यात आल्यावर आपण विदर्भाचे भाजपाचे संघटनमंत्री   यांच्यामार्फत आपले पुढचा प्रवास कसा राहणार असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना निवडणुकीपुर्वी स्पष्ट चर्चा केल्यावर आपण विधान परीषद देतो असा शब्द दिली होता मात्र आपला सुद्धा नाथा केल्याचा आरोप यावेळी किशोर तिवारी यांनी केला . 

गरीबांचे व लाखो अनाथांचे नाथ यांनी जे म्हटले आहे की भाजप सरकारमध्ये माझ्या राजीनाम्याची मागणी कुणीही केली नव्हती. माझ्या चौकशीची कुणीही मागणी केली नव्हती. कुणीही राजीनामा मागितला नसताना मला राजीनामा द्यायला लावला. माझी तक्रार देवेंद्रजींवर आहे. माझ्यावर त्यांनी विनयभंगाचा खटला दाखल करायला लावला. हे मरणाहून मेल्यासारखं आहे. माझ्यासोबत अत्यंत खालच्या स्तराचं राजकारण केलं. माझा परिवाराला यामुळं मनस्ताप झाला. माझ्यावर पाळत ठेवली गेली. मंत्री असताना नऊ महिने पाळत ठेवली यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गंभीरते घेणे जरुरीचे झाले आहे आज देवेंद्र फडणवीस यांना आवरणे काळाची गरज झाली असल्याचे मत किशोर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केले 

========================================

किशोर तिवारी यांच्याशी संपर्क करण्यासाठी -०९४२२१०८८४६ 

Tuesday, October 20, 2020

Maharashtra Reports Crop losses in 1 Billion Hectors -Centre urged to release Rs.1 lakh crore Farm Package

Maharashtra Reports Crop losses in 1 Billion Hectors  -Centre urged to release  Rs.1 lakh crore Farm Package 

Dated -20 October 2020

Massive rain and flooding have reported more than 50 lives and historical crisis caused by this unprecedented climate change in all part of Maharashtra as out of all the 140 lakh hectares of crops in Maharashtra, about 120 lakh hectares of soybean, paddy, maize, cotton, sorghum, Turi and sugarcane have been completely destroyed due to cloudburst and incessant rains.  The crisis has caused a loss of at least Rs 150 lakh crore and has affected over 80 lakh farmers. 
Maharashtra's agricultural and rural economic system has collapsed due to the historical crisis caused by this unprecedented climate change.  Therefore, in a statement, Kishor Tiwari, President of the Maharashtra Farmers' Mission, has demanded that Prime Minister Narendra Modi visit Maharashtra and immediately give a special package of at least Rs 1 lakh crore to the farmers of Maharashtra. Corona has been rampant in Maharashtra since April.  Similarly, due to a sudden thoughtless lockdown by the central government, the state's income has come to zero and the state is in a huge financial crisis.
In such a situation, the central government was expected to provide a relief package, but the centre gave a pumpkin.  Kishor Tiwari also alleged that Maharashtra had given 90 per cent of the funds to the Prime Minister's Covid Care Fund but Modi had left same Maharashtra in the lurch.  If such an unprecedented future of 120 lakh hectares of crops had been destroyed in Bihar, Prime Minister Narendra Modi and Agriculture Minister Narendra Tomar would have made dozens of visits and announced aid packages.  This question has also been raised by Tiwari in his statement.  

When Finance Minister Nirmala Sitharaman announced a package of Rs 20 lakh crore, it was thought that the farmers would be given loan waivers like industry, but she left the farmers in the lurch.  State-owned banks have disbursed only 30 per cent of the target peak loans this year.  Therefore, in order to overcome this unprecedented agricultural crisis and to save the suicidal farmers of Maharashtra, he has demanded a complete waiver of agricultural loans and a package of the assistance of at least Rs 1 lakh crore. Tiwari has appealed to the Union Ministers Nitin Gadkari, Prakash Javdekar and Piyush Goyal to seek help.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

Monday, October 19, 2020

अख्ख्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर अस्मानी संकटाचा कळस - मुख्यमंत्री आले शेतकऱ्यांच्या बांधावर पण विमा व सरकारचे अधिकारी पंचनाम्याच्या करण्यास नदारद

अख्ख्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर अस्मानी संकटाचा कळस - मुख्यमंत्री आले  शेतकऱ्यांच्या बांधावर पण विमा व सरकारचे अधिकारी पंचनाम्याच्या करण्यास नदारद 

दिनांक १९ ऑक्टोबर २०२० 


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री परतीच्या रट्ट्या ढगफुगीच्या अभुतपुर्व पाऊसाने   अख्ख्या महाराष्ट्रातील १४० लाख हेक्टर वरील सर्व हातात आलेल्या पिकांपैकी सुमारे १२० लाख हेक्टरवरील सोयाबीन धान मक्का कापुस ज्वारी  तुरी ऊस बागायतीची पिके संपूर्ण नष्ट झाल्यांनतर आज शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले त्यापूर्वी सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री व आमदार शेतकऱ्यांच्या दारावर जाऊन विचारपुस करीत आहेत मात्र पीकविमा कंपन्यांचे अधिकारी पंचनामे तर सोडा शेतकऱ्यांचे फोनही  नसुन पंचनाम्याचे आदेश देऊनही एकही शेतात प्रशासकीय अधिकारी देशात नसल्याची तक्रार कै वसंतराव शेतकरी स्वालंबन मिशन अध्यक्ष किशोर तिवारी यांना यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील पर्वा परीसरात दिली .अनेक शेतकऱ्यांनी विमा कंपनी व पंचनामेवाले आता येत नाही असा निराशेचा भावनेतुन सर्व सोयाबीन काढून फेकून दिले असुन आता हरभऱ्याच्या पेरणीसाठी मशागत सुरु केली आहे मात्र हेच अधिकारी १५ दिवसानंतर येऊन तुम्हचे नुकसानच झाले नाही असे अहवाल भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली . 

नुकसान ८० टक्के मस्तवाल अधिकारी म्हणतात फक्त २५ टक्के पिकांचे नुकसान 

यावर्षीचे अवकाळी पावसामुळे आलेले  हे संकट कमीतकमी १५० लाख कोटीच्या नुकसानीचे असुन ८० लाखावर शेतकऱ्यांना याचा फटका बसला असुन या अभूतपूर्व वातावरण बदलामुळे आलेल्या ऐतिहासिक संकटामुळे महाराष्ट्राची कृषी व ग्रामिण आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे मात्र हे होत असलेले पिकांचे अभुतपुर्व नुकसान फक्त २५ टक्के पिकातच फटका देणारे असल्याचा पार्थमिक अहवाल कृषी व महसुल शेतकरी विरोधी अधिकारी सरकारला देत आहेत असा गंभीर आरोप शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केला आहे . आज भारताचे   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा दौरा तात्काळ करून कमीतकमी १ लाख कोटीचे विषेय पॅकेज महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना दयावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे  किशोर तिवारी यांनी केली आहे . 

शेतकऱ्यांवरील सर्व कर्ज माफ करा व पीकविमा सरसकट द्या 

कोरानामुळेजर  ग्रामीण अर्थव्यवस्था संपुष्टात आली आहे .सरकारी बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्जमाफी देऊनही नवीन पीककर्ज दिले नाही .अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांवरील सर्व कर्ज माफ करा व पीकविमा सरसकट देण्याची गरज आहे मात्र केंद्र सरकार महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर वक्रद्रुष्टि ठेवत असल्याने जर अशी अभूतपूर्व नभूतो न भविष्याती १२० लाख हेक्टरवरील पिकांची बरबादी  निवडणूक असलेल्या बिहारमध्ये  नष्ट झाली असती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी व कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी डझनावर दौरे करून मदतीचे पॅकेज घोषित केली असती मात्र आज महाराष्ट्रात निवडणूक नाही तसेच भाजपाचे सरकार सुद्धा नाही म्हणूनच केंद्राची आमच्यावर वक्रदृष्टी आहे का असा सवाल किशोर तिवारी यांनी आपल्या निवेदनात केला आहे . 

सध्या अप्रिलपासून महाराष्ट्रात कोरोनाचा कहर व केंद्राचा अचानक केलेला विचारहीन लॉकडाउनमुळे राज्याची आवक शून्य झाली असुन  राज्य प्रचंड आर्थिक संकटात आहे अशा परीस्ठीतीमध्ये केंद्र सरकार मदतीचे पॅकेज देणार अशी अपेक्षा होती मात्र केंद्राने भोपळा दिला . पंतप्रधान कोविड केअर निधीमध्ये महाराष्ट्राने ९० टक्के निधी दिला मात्र त्याच महाराष्ट्राला वरचेवर मोदींनी सोडले असा आरोपही किशोर तिवारी यांनी केला . 
ज्यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २० लाख कोटीच्या पॅकेजची फोडणी केली त्यात शेतकऱ्यांना उद्योगासारखी कर्जमाफी  देतील मात्र त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले वरून सरकारी बँकांनी यावर्षी फक्त लक्ष्याच्या ३० टक्के पीककर्ज वाटप केले असल्यामुळे आता या अवकाळी अभूतपूर्व कृषी संकटावर मत करण्यासाठी महाराष्ट्राच्या आत्महत्या करीत असलेल्या शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी संपुर्ण कृषीकर्ज माफी व कमीतकमी १ लाख कोटीचे मदतीचे पॅकेज द्यावे व महाराष्ट्राच्या विरोधीपक्ष नेते देवेद्न फडणवीस यामध्येही  न करता ही घोषणा करण्यासाठी नितीन गडकरी  जावडेकर पियुष गोयल या केंद्रीयमंत्र्याच्या मदतीने करून घ्यावी मात्र अशा गंभीर प्रश्न्नावर केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांना संकटाची तीव्रता  ठेवण्यासाठी टाळावे असे कळकळीचे आवाहन किशोर तिवारी यांनी यावेळी केले आहे 
=======================================================

Sunday, October 18, 2020

महाराष्ट्रात ८० टक्के उभी पिके परतीच्या पाऊसाने खल्लास -केंद्राने तात्काळ १ लाख कोटींचे मदतीचे पॅकेज द्यावे -किशोर तिवारी

 महाराष्ट्रात ८० टक्के उभी पिके परतीच्या पाऊसाने खल्लास -केंद्राने तात्काळ १ लाख कोटींचे मदतीचे पॅकेज द्यावे -किशोर तिवारी 
१८ ऑक्टोबर २०२०

परतीच्या रट्ट्या ढगफुगीच्या अभुतपुर्व पाऊसाने   अख्ख्या महाराष्ट्रातील १४० लाख हेक्टर वरील सर्व हातात आलेल्या पिकांपैकी सुमारे १२० लाख हेक्टरवरील सोयाबीन धान मक्का कापुस ज्वारी  तुरी ऊस बागायतीची पिके संपूर्ण नष्ट झाली असुन हे संकट कमीतकमी १५० लाख कोटीच्या नुकसानीचे असुन ८० लाखावर शेतकऱ्यांना याचा फटका बसला असुन या अभूतपूर्व वातावरण बदलामुळे आलेल्या ऐतिहासिक संकटामुळे महाराष्ट्राची कृषी व ग्रामिण आर्थिक व्यवस्था कोलमडली असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा दौरा तात्काळ कमीतकमी १ लाख कोटीचे विषेय पॅकेज महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना दयावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे महाराष्ट्राच्या शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे . 
जर अशी अभूतपूर्व नभूतो नभविष्याती १२० लाख हेक्टरवरील पिके निवडणूक असलेल्या बिहारमध्ये  नष्ट झाली असती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी व कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी डझनावर दौरे करून मदतीचे पॅकेज घोषित केली असती मात्र आज महाराष्ट्रात निवडणूक नाही तसेच भाजपाचे सरकार सुद्धा नाही म्हणूनच केंद्राची आमच्यावर वक्रदृष्टी आहे का असा सवाल किशोर तिवारी यांनी आपल्या निवेदनात केला आहे . 
सध्या अप्रिलपासून महाराष्ट्रात कोरोनाचा कहर व केंद्राचा अचानक केलेला विचारहीन लॉकडाउनमुळे राज्याची आवक शून्य झाली असुन  राज्य प्रचंड आर्थिक संकटात आहे अशा परीस्ठीतीमध्ये केंद्र सरकार मदतीचे पॅकेज देणार अशी अपेक्षा होती मात्र केंद्राने भोपळा दिला . पंतप्रधान कोविड केअर निधीमध्ये महाराष्ट्राने ९० टक्के निधी दिला मात्र त्याच महाराष्ट्राला वरचेवर मोदींनी सोडले असा आरोपही किशोर तिवारी यांनी केला . 
ज्यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २० लाख कोटीच्या पॅकेजची फोडणी केली त्यात शेतकऱ्यांना उद्योगासारखी कर्जमाफी  देतील मात्र त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले वरून सरकारी बँकांनी यावर्षी फक्त लक्ष्याच्या ३० टक्के पीककर्ज वाटप केले असल्यामुळे आता या अवकाळी अभूतपूर्व कृषी संकटावर मत करण्यासाठी महाराष्ट्राच्या आत्महत्या करीत असलेल्या शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी संपुर्ण कृषीकर्ज माफी व कमीतकमी १ लाख कोटीचे मदतीचे पॅकेज द्यावे व महाराष्ट्राच्या विरोधीपक्ष नेते देवेद्न फडणवीस यामध्येही  न करता ही घोषणा करण्यासाठी नितीन गडकरी  जावडेकर पियुष गोयल या केंद्रीयमंत्र्याच्या मदतीने करून घ्यावी मात्र अशा गंभीर प्रश्न्नावर केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांना संकटाची तीव्रता  ठेवण्यासाठी टाळावे असे कळकळीचे आवाहन किशोर तिवारी यांनी यावेळी केले आहे 
=======================================================