Sunday, October 30, 2022

महाराष्ट्रातुन मागील दोन महिन्यात २ लाख कोटीचे पाच प्रकल्प राज्याबाहेर जाण्यास पूर्णपणे भाजपा जबाबदार -शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी

महाराष्ट्रातुन मागील दोन महिन्यात २ लाख कोटीचे पाच प्रकल्प राज्याबाहेर जाण्यास पूर्णपणे भाजपा जबाबदार -शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी 
दिनांक ३० ऑक्टोबर २०२२
महाराष्ट्रातुन भाजपा प्रणीत मिंधे सरकार आल्यापासुन मागील दोन महिन्यात वेदान्त फॉक्सकॉन,बल्क ड्रग पार्क,मेडिकल इक्विपमेंट पार्क, मिहान नागपूर मध्ये येणारे दोन प्रकल्प 
टाटा-एअरबसचा ( Tata-Airbus ) व  फ्रान्सची बहुराष्ट्रीय विमान इंजन दुरुस्ती कंपनी सॅफ्रन ही  सारखे मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले आहेत याला भाजपाचे केंद्र सरकार व  भाजपा प्रणीत मिंधे सरकार संपूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते किशोर तिवारी (Shiv Sena Spokeperson kishor Tiwari) यांनी केला आहे.

हे प्रकल्प सुमारे २ लाख कोटीची गुंतवणूक तसेच कमीत कमी दशलक्ष सरळ रोजगाराच्या संधी देणारे असुन गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात होणारे मोठे प्रकल्प इतर राज्यात गेले आहेत याला मिंधे सरकार मधील लाचारी ,प्रत्येक स्तरावर सुरु असलेली वसुली  तसेच भाजपकडुन  पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचा आदेशच  कारणीभुत असुन महाराष्ट्राला कंगाल करण्याचा डाव भाजप रचला असुन आता महाराष्ट्राच्या मराठी अस्मितेच्या मशाली पेटवुन हा हल्ला परतवुन लावण्याची वेळ असुन लवकरच महाराष्ट्रातील प्रत्येक गाव -खेड्यातून जनांदोलन सुरु करण्याची घोषणा किशोर तिवारी 

सुरुवातीला वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकल्प गुजरातला गेला होता. त्यानंतर टाटा एअरबसचा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट (Tata Airbus Project) हा नागपूरमध्ये (Nagpur) होणारा प्रकल्प देखील गुजरातमधील वडोदऱ्याला गेला आहे. अशातच आता आणखी एक नागपूरमध्ये होणारा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर   गेला आहे. फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रन ही विमान इंजन दुरुस्ती देखभालचा प्रकल्प नागपूरच्या मिहानमध्ये टाकणार होती. मात्र, हा प्रकल्प आता महाराष्ट्राबाहेर  गेला आहे. जमीन मिळवण्यास दिरंगाई झाल्यामुळे  हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची माहिती मिळत आहे.पहिले  टाटा-एअरबसचा ( Tata-Airbus ) प्रकल्प हातून जाणे, हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे अपयश असून त्यांनी राजीनामा देण्याची गरज असल्याचे मत शिवसेनेचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. राज्यातील भाजप सरकारला महिनाभरातील हा दुसरा धक्का आहे. गेल्या महिन्यात वेदांत-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला ( GUJRAT ) पळविला गेला. आता २२ हजार कोटी रुपायंचा टाटा-एअरबस प्रकल्पही महाराष्ट्राच्या हातून निसटला आहे. या निर्णयातून भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचा प्रभाव स्पष्ट करते, असेही किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. २२ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा क्षेत्रात प्रस्तावित होता, याकडे तिवारी यांनी लक्ष वेधले आहे.

तिवारी म्हणाले की, मिहानमध्ये सुमारे २० लाख रोजगारांची निर्मिती होईल, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मागील २० वर्षांपासून करीत आहेत. मात्र, वास्तव एकदम वेगळे आहे. आता केंद्र सरकारच्या पुढाकाराने येत असलेला प्रकल्पही गुजरातमध्ये जाणे हे अत्यंत दुदैवी आहे. या अपयशाची जबाबदारी गडकरी-फडणवीस यांनी घ्यावी, असेही तिवारी म्हणाले.
गुजरातमध्ये भाजपला पराभव डोळ्यापुढे दिसत आहे. बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या दबावातून विदर्भात येणारे मोठे प्रकल्प गुजरातला पळविण्याचे काम अत्यंत अयोग्य आहे. विदर्भ हा भाजपचा गड आहे तर दुसरीकडे गडकरी आणि फडणवीस हे कोट्यवधींचे प्रकल्प विदर्भात आणल्याचे श्रेय घेत आहेत. यात विदर्भाची स्थिती सुदान, सोमालियासारखी होत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

----------------------------------------------------------------------------------------