Tuesday, May 4, 2021

लॉकडाउन काळात महाराष्ट्रात शेतकऱ्यांना पीककर्ज व सर्व निविष्ठा "दारपोच" पद्धतीने खरीप हंगामापूर्वी द्या- शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांचे पंतप्रधानांना मागणी पत्र

लॉकडाउन काळात महाराष्ट्रात शेतकऱ्यांना पीककर्ज व सर्व निविष्ठा "दारपोच" पद्धतीने  खरीप हंगामापूर्वी द्या- शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी  यांचे पंतप्रधानांना मागणी पत्र   

दिनांक ५ मे २०२१

सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप शिगेला पोहचला आहे . सध्या बहुतेक रूग्ण ग्रामीण भागातून येत असुन ,ग्रामीण भागात कोरोनाच्या नवीन विषाणूची लागण शेतीसाठी खरीप हंगामाची तयारी करीत असलेल्या व जिल्ह्याच्या वा लगतच्या शहरात वारंवार भेट देणार्‍या  शेतकऱ्यांच्यामुळे होत आहे अशा तक्रारी विदर्भ व मराठवाड्यात समोर आल्या आहेत त्यातच कोरडवाहू शेतकरी सध्या विविध संकटांनी घेरलेला असून, आर्थिक टंचाईची झळ सोसत आहे, त्यामुळे अशा शेतकऱ्याला मदतीचा विषेय पॅकेज  केंद्र सरकारने द्यावा अशा मागणी  करणारे पत्र  कै वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र  मोदी पाठविले आहे . 

आपल्या मागणी पत्रात किशोर तिवारी यांनी एकीकडे केंद्र सरकारने उद्योग समूहाला कोरोना संकटात सुमारे २० लाख कोटीचे पॅकेज दिले आहेत व आणखी पॅकेज देण्याची तयारी होत असुन या लॉकडाउनमध्ये सर्वात जास्त नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे कारण त्यांना लॉकडाउनमध्ये शेतकऱ्यांनी अन्नधान्य व भाजीपाला मिळेल त्या भावात विकले आहे त्यामुळे बहुतेक सर्व शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत अशा आणीबाणीच्या बिकट परिस्थितीमध्ये अडचणीत सापडलेल्या सर्व थकीत कर्ज असणाऱ्या  शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी सर्व बँकांनी ३० मे  पूर्वी  १००टक्के पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश आर बी आई वा नाबार्ड मार्फत  दार पोच देण्याची व्यवस्था करावी त्याच प्रमाणे सर्व राज्य सरकारांनी आपल्या कृषी महसूल व ग्रामीण विकास खात्याच्या कर्मचारी वर्गा मार्फत प्रत्येक शेतकऱ्याला  शेतबांधावरच बी-बियाणे, रासायनिक खते, तणनाशके, कीटकनाशके उपलब्ध करुन द्यावीत त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकारला मदत होईल तसेच  रुग्ण व मृत्यूचा दर झपाट्याने कमी होईल 

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी गेल्या महिनाभरापासून सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात  कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजार बंद आहेत. शेतकऱ्यांची  नवीन कर्ज प्रकरणे अजूनपर्यंत चालू झालेली नाहीत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. असे असताना, शेतीच्या किस्तकाडीकरिता दररोज येणारा खर्च व शेतमजूराची मजूरी त्यांनी आजपर्यंत कशीतरी भागवली आहे. आता खरीप सुरू व्हायला फक्त २५ दिवसाचा अवधी राहीला असून, शेतकरी या हंगामाच्या तयारीला लागला आहे. या कठीन परिस्थितीत शेतकऱ्यांना पीककर्ज व  त्यांच्या इच्छेनुसार बी-बियाणे, खते, औषधे गावागावात उपलब्ध करुन दिली तर, शेतकऱ्यांच्या वेळेची व पैशाची सुध्दा बचत होईल आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस आला तर, पेरणी सुद्धा वेळेवर होऊ शकेल. या करीता आपण कृषी विभागामार्फत गावा-गावातील शेतकऱ्यांची बी-बियाणे व रासायनिक खतांची मागणी नोंदवून, त्यानुसार वाटप केले तर, शेतकऱ्यांना ती मोठी मदत होईल, असे मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे. 

गेल्या वर्षी कोरोनामुळे सुद्धा  केवळ ३० टक्के शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीककर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. परंतु यावर्षी १०० टक्के शेतकऱ्यांना खरीपासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्याची  मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे  केंद्र सरकारने निधी व  प्रशासना तर्फे शेतकऱ्यांच्या याद्या, तसेच सातबारा व आठ अ कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे आदेश दयावे अशी मागणी किशोर तिवारी केली आहे . ==========================================================


No comments:

Post a Comment