महाराष्ट्रात अतिवृष्टीचा कहर :८० लाख हेक्टर मधील उभे सर्वच पिके बुडाली :अस्मानी व सुलतानी संकटामुळे ५० लाख शेतकरी प्रचंड अडचणीत :केंद्र सरकार पुर्णपणे उदासीन :शेतकरी मिशनचे अध्यक्ष यांचे पंतप्रधान व मुख्यमंत्र्याना साकडे
दिनांक २७ सप्टेंबर २०२१
विदर्भ ,मराठवाड्यात,खान्देश व उत्तर महाराष्ट्रात नापिकीचे हे दुसरे वर्ष असुन मागील वर्षीसुद्धा सोयाबीन अशाच प्रकारे हातात येऊन बुडाले होते .पीकविमा काढलेल्या ७० टक्के शेतकऱ्यांना चुकीचे अहवाल सादर करून पिकविम्यापासून वंचित ठेवण्यात आले होते तर सरकारने नुकसान भरपाईच्या तोंडाला पाने पुसली असुन कोरोना महामारीच्या संकटाचे नाव समोर करून प्रशासन महाराष्ट्राच्या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास मोकळे सोडले आहे असा गंभीर आरोप शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी या पत्रात लावला आहे .
मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्राच्या ५० लाख शेतकऱ्यांवर अस्मानी व सुलतानी संकट
पंतप्रधान पीक विमा योजनेचे सनदी अधिकाऱ्यांनी बहूराष्ट्रीय पीक विमा कंपन्यांची दलाली करून तीनतेरा वाजविले आहे . महाराष्ट्राच्या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात लाखो शेतकरी पीकविमा मिळावा यासाठी वारंवार आंदोलन करीत आहेत मात्र नाकर्ते कृषी अधिकारी व मस्तवाल पीक विमा कंपन्या एक पैशाची मदत देण्यास तयार नाहीत . एकही आमदार वा खासदार या प्रश्न्नावर रस्तावर येण्यास तयार नाही अशा असहाय परिस्थिती शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत . महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरील संकट संपूर्णपणे सुलतानी असुन याला मोदी सरकारचे चुकीचे कृषी धोरणच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप किशोर तिवारी यांनी सहप्रमाण निवेदनात दिला आहे .
महाराष्ट्रातील साखरसोडुन सर्वच नगदी पिकांचे बाजार भाव व्यापाऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी आणले
सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सरासरी १० हजार प्रति क्विं . विकला जात असलेला सोयाबीन नापिकी होत असतांना ५ हजाराच्या घरात व्यापाऱ्यांनी आणला तर मुंगाचें भाव चक्क हमी भावापेक्षा कमी झाले आहेत हीच परिस्थिती कापसाच्या पिकांची प्रचन्ड नापिकी झाल्यानंतरही होत आहे .जागतिक स्तरावर कृत्रिम पणे बाजार पाडल्या जात आहे व भारताचे शेतकरी प्रेमी थोतांड केंद्र सरकार बघ्याच्या भूमिकेत आहे .राज्य सरकार सुद्धा दोन्ही कृषी कर्जमाफीची पोर्टल बंद करून शेतकऱ्यांना केंद्राच्या चुकीच्या धोरणाचे मुडदे पाडण्यास मोकळे सोडले आहे असा गंभीर आरोपच किशोर तिवारी यांनी आपल्या निवेदनात केला आहे .
नाकर्ते सरकार कृषी संकटामुळे शेतकरी आत्महत्या सत्र रोखण्यास उदासीन
महाराष्ट्रात राज्यात सगळीकडे प्रचन्ड पाऊसाने संपूर्ण नासाडी झाल्यांनतर आता पुढील दोन दिवस सर्वत्र वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान सर्व जिल्ह्यामध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यानेनद्यांना पूर आले आहेतत्या ओसांडून वाहत आहे. परिणामी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे . सप्टेंबर मध्यानंतर मान्सून प्रामुख्याने माघारी फिरत असतो मात्र यावर्षी सप्टेंबर अखेर उजाडणार असल्याने राज्यात चांगला पाऊस बघायला मिळू शकतो. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची हजेरी लागत आहे मात्र शेतकऱ्यांना पुतण्या मावशीचे प्रेम करणारे राजकीय नेते व भ्रष्ट मस्तवाल अधिकारी शेताकडे येण्यास तयार नाहीत त्यातच गेल्या चोवीस तासांत ढगफुटीसदृष्य पाऊस झालाय. या पावसामुळे अनेक ठिकाणचे छोटे, मोठे पाझर तलाव तुडूंब भरुन वाहतायत तर मोठ्या धरणाचे सर्वच दरवाजे उघडल्यामुळे लाभक्षेत्रातील संपुर्ण शेतीच खरडुन निघाली आहे सतत दुसऱ्यावर्षी होणाऱ्या अतिवृष्टीमुळे सर्वच धरणात अतिवेगाने पाण्याची आवक सुरू झाली, अतिपावसामुळे आधीच शेतीचे नुकसान झाले असताना धरणातून पाणी सोडल्याने लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली मात्र यावेळी पीकविमा कंपनीचा फोनसुद्धा लागत नसुन कृषी महसूल ग्रामीण विकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी कुठेच दिसत नसुन फक्त प्रसिद्धी माध्यमेच कृषी संकटाची माहीती देत आहेत कारण सर्वच शेतकरी सर्वच निवडणुकीमध्ये शेतकरी म्हणुन मतदान करीत नसुन तो आपल्या जाती धर्माच्या व मंदिराच्या मुद्द्यावर मतदान करतो हे राजकीय नेत्यांनी हरल्याने कोणीही शेतकऱ्यांच्या नापिकीवर रस्त्यावर येत नसुन आता देवानेच शेतकऱ्यांना या मोदी सरकारच्या यातनेपासुन मुक्त करावे असे साकडे किशोर तिवारी यांनी देवाला टाकले आहे .
=================================================================
No comments:
Post a Comment