Saturday, October 4, 2025

भाजपाच्या गरबा-दांडिया कार्यक्रमात आदीवासी अंकुश तोडासे यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर तीन तास नाचणाऱ्या भाजप नेत्यांवर अट्रोसिटी लावा

भाजपाच्या गरबा-दांडिया कार्यक्रमात आदीवासी अंकुश  तोडासे यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर तीन तास  नाचणाऱ्या भाजप नेत्यांवर अट्रोसिटी लावा - अंकुश  तोडासे यांच्या निराधार कुटुंबाला किशोर तिवारी यांचा मदतीचा हात 

दिनांक ४ ऑक्टोबर २०२५

३० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ८.०० वाजता पांढरकवडा तालुका क्रीडा संकुल (स्टेडियम) येथे कोणतीही शासकीय परवानगी न घेता बेकायदेशीररित्या भाजप लोकनेते अण्णासाहेब पारवेकर व अमेरिका रिटर्न आमदार राजूभाऊ तोडसाम यांच्या प्रेरणेने  गरबा-दांडिया कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान विजेच्या शॉर्टसर्किटमुळे अंकुश विठ्ठल तोडासे (वय ३०, रा. चांद्रशेखर वार्ड, पांढरकवडा) या तरुणाचा मृत्यू झाला होता त्या राजगोंड असलेल्या व आमदार राजूभाऊ तोडसाम यांचे मावस बंधु असलेल्या अंकुश घरी ४ ऑक्टोबर पर्यंत आबकरी कर सरकारला न देता ज्या लाखो कुटूंबाचा घरचा करता मारणारे दारू माफिया यांच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये कोट्यवधी रुपयांच्या बाजार लाऊन सत्ता काबीज करण्यावर डोळा ठेऊन लाखो रुपये खर्च करून भाजपाने आयोजित परवानगीशिवाय आयोजित गरबा-दांडिया कार्यक्रमात एकाही पदाधिकारी आमदार मालक यांनी भेट न दिल्यामुळे शेवटी आदीवासी जनतेसाठी काम करणारे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी आदीवासी नेते अंकित नैताम यांच्या सोबत घरी भेट देऊन अंकुश तोडासे यांच्या विधवा पत्नी पौर्णिमा दोन लावली मुले पियुष व अवर यांचे सांत्वन करून दोन महिन्याचे किराणा ,आर्थिक मदत व दोन्ही  मुलांची शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे . 

"माझा पती रात्री ८ वाजता मरण पावला तरी माझे दीर आदीवासी रत्न आमदार राजू तोडसाम आपल्या पत्नी सोबत एक एक करून नाचत होते व ११ वाजे पर्यंत सर्व लोकलाज सोडुन हा नंगानाज चालू ठेवला व त्यानंतर अंत्योष्टी पुर्वी ११ लाख रुपये नुकसान भरपाई विदर्भाचे ठोक दारू विक्रेते १ ऑक्टोबरला सकाळी देणार असे आश्वासन दिले होते मात्र आज पर्यंत कार्यक्रमाचे आयोजक संकल्पना देणारे मित्र मंडळ यांनी एक दमडीही दिली नसल्याचे दुःख मला आहे " अशी माहीती पौर्णीमा तोडासे यांनी किशोर तिवारी याना दिली . 

१ कोटी रुपये नुकसान भरपाई व पौर्णिमा तोडासे याना सरकारी नोकरी द्या - अंकित नैताम 

अंकुश तोडासे यांच्या मृत्यूला मा. जिल्हाधिकारी ,यवतमाळ जिल्हा,मा. पोलीस अधीक्षक ,यवतमाळ जिल्हा,मा. कार्यकारी अभियंता महावितरण, पांढरकवडा,मा. जिल्हा क्रीडा अधिकारी,क्रीडा विभाग, यवतमाळ यांचे नाकर्तेपणामुळे परवानगीशिवाय आयोजित गरबा-दांडिया कार्यक्रमात विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू झाला असुन जबाबदार आयोजकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे  निवेदन आज आदिवासी नेते अंकित नैताम यांनी केली आहे . 


आपल्या निवेदनात अंकित नैताम यांनी 
१ कोटी रुपये नुकसान भरपाई व पौर्णिमा तोडासे याना सरकारी नोकरी द्या असे म्हटले आहे की सदर कार्यक्रमासाठी आयोजकांनी ना पोलीस प्रशासनाची परवानगी घेतली, ना महावितरण विभागाकडून विद्युत जोडणीस मान्यता घेतली, तसेच क्रीडा विभागाची औपचारिक परवानगीही घेण्यात आलेली नव्हती. यामुळे हा कार्यक्रम पूर्णतः बेकायदेशीर होता हे स्पष्ट झाले आहे.या घटनेत आयोजकांचा गंभीर निष्काळजीपणा व बेजबाबदारपणा दिसून येतो. स्थानिक आमदार व त्याचे सहकारी मित्रमंडळ यामध्ये आयोजक असल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्तेचा गैरवापर करून आदिवासी युवकाचा बळी गेला असून हे प्रकरण गंभीर आहे.

अंकित नैताम यांच्या मागण्या :

1. जबाबदार आयोजक, कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर  गुन्हा दाखल करण्यात यावा.
2. सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात यावी.
3. या कार्यक्रमास आवश्यक असलेली परवानगी प्रमाणपत्रे (पोलीस विभाग, महावितरण, क्रीडा विभाग, अग्निशमन विभाग, नगरपरिषद/नगरपालिका) आयोजकांनी घेतली नव्हती. त्यामुळे अधिकृत नोंदी तपासून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
4. दांडिया/गरबा कार्यक्रमाकरिता वापरलेले साऊंड सिस्टिम, जनरेटर, बॅनर बोर्ड, टेबल डेकोरेशन, इलेक्ट्रिकल साहित्य व अन्य सर्व सामग्री तात्काळ जप्त करण्यात यावी.
5. अशा बेकायदेशीर कार्यक्रमांना आळा घालण्यासाठी पुढील काळात कठोर निर्देश देऊन परवानगीशिवाय कार्यक्रम घेणाऱ्यांवर मोक्का कायद्यान्वये (MCOCA) गुन्हा दाखल करावा.
6. मृतकाच्या कुटुंबियांना शासनाने तातडीने आर्थिक मदत व नोकरीची हमी द्यावी.

परवानगीशिवाय आयोजित कार्यक्रमात निष्पाप तरुणाचा जीव जाणे ही गंभीर व बेकायदेशीर घटना आहे. त्यामुळे दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करून मृतकाच्या कुटुंबास न्याय मिळावा,
जबाबदारांवर गुन्हा दाखल करा
या संपूर्ण घटनेमुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत असून, चळवळीचे नेते किशोर तिवारी यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची व जबाबदार आयोजक, कंत्राटदार तसेच संबंधित शासकीय विभागीय अधिकाऱ्यांवर अन्याय्य मृत्यूला कारणीभूत ठरल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.मृतकाचा भाऊ रामकृष्ण तोडासे (वय ३८) यांनी पोलिसांना जबाब दिला असून, करंट लागल्याने अंकुशच्या हाताला काळपटपणा आला होता. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.“परवानगीशिवाय सुरू असलेल्या कार्यक्रमाला जबाबदार कोण?” असा प्रश्न किशोर तिवारी यांनी उपस्थित केला आहे.
=========================================

Wednesday, October 1, 2025

महाराष्ट्रात अभुतपुर्व ओला दुष्काळ पडला असतांना महायुतीच्या दांडिया उत्सवात आदिवासी तरुणाचा मृत्यू – भ्रष्ट गृह मंत्रालय झोपलेले किशोर तिवारी यांचा आरोप

महाराष्ट्रात अभुतपुर्व ओला दुष्काळ पडला असतांना महायुतीच्या दांडिया उत्सवात आदिवासी तरुणाचा  मृत्यू – भ्रष्ट गृह मंत्रालय झोपलेले किशोर तिवारी यांचा आरोप 

दिनांक -१ ऑक्टोबर २०२५ 
एकीकडे महाराष्ट्रात ८० लाख हेक्टर मध्ये उभे पीक बुडाली असतांना व दररोज ८ ते १० ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतांना भाजप व शिंदेचे मंत्री ,आमदार व पदाधिकारी दुबईतुन हजारो कोटींचा क्रिकेट सत्ता खेळणारे व त्याच बरोबर आबकरी कर सरकारला न देता ज्या लाखो कुटूंबाचा घरचा करता मारणारे दारू माफिया यांच्या पैशाने लोकांच्या धार्मीक भावनांचा फायदा घेऊन बी ग्रेड सिनेमाच्या अश्शील नृत्य करणाऱ्या व त्यावर सर्रास दारूच्या नशेत 
नवरात्रोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावावर जी नंगानाज सध्या सुरु आहे त्यामध्ये आता गरीब आदिवासी तरुण मरत असल्याच्या घटना घडत असुन मात्र गृह मंत्रालयाचे अधिकारी कर्मचारी आमदारांच्या दडपणात मांडवली करून हा तमाशा असाच सुरु ठेवत आहेत याचा निषेध मागील ४० वर्षापासुन अहोरात्र शेतकऱ्यांसाठी भांडणारे चवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी केला असुन दुबईतुन हजारो कोटींचा क्रिकेट सत्ता खेळणारे व त्याच बरोबर आबकरी कर सरकारला न देता ज्या लाखो कुटूंबाचा घरचा करता मारणारे दारू माफिया यांना मोका मध्ये अटक करण्याची मागणी केली आहे . 
नवरात्रोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान झालेल्या एका भीषण अपघातात आदिवासी तरुणाचा करंट लागून मृत्यू झाल्याने शहरात शोककळा पसरली आहे. ही घटना ३० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजता पांढरकवडा शहरात तालुका क्रीडा संकुल (स्टेडियम) येथे घडली.मृत तरुणाचे नाव अंकुश विठ्ठल तोडासे (वय ३०, रा. चांद्रशेखर वार्ड, पांढरकवडा) असे आहे. तो इलेक्ट्रिक वायरमन म्हणून काम करीत होता. उत्सवातील डेकोरेशनच्या कंत्राटदाराकडे तो वायरिंग व फिटिंगचे काम पाहत होता. जनरेटरमधून येणारे कनेक्शन कट करताना त्याला जोराचा करंट लागला. नागरिकांनी तातडीने सरकारी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
परवानगीशिवाय आयोजित कार्यक्रम?
या गरबा-दांडिया कार्यक्रमाचे आयोजन आबकरी कर सरकारला न देता ज्या लाखो कुटूंबाचा घरचा करता मारणारे दारू माफिया यांच्या मालकांनी  व भाजप आमदार यांनी  निर्माण केलेल्या  मित्र परिवार यांनी केले होते. तालुका क्रीडा संकुलन स्टेडियमवर हा कार्यक्रम चालू होता. परंतु आश्चर्य म्हणजे  या कार्यक्रमाला ना तालुका क्रीडा विभागाकडून, ना पोलीस प्रशासनाकडून, ना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नव्हती,यामुळे हा कार्यक्रम बेकायदेशीर पद्धतीने आयोजित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीसुद्धा परवानगीशिवाय मोठा सांस्कृतिक सोहळा शहरात सुरु राहणे हे थेट प्रशासनाच्या दुर्लक्षाचे व निष्काळजीपणाचे द्योतक आहे.
जबाबदारांवर गुन्हा दाखल करा
या संपूर्ण घटनेमुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत असून, चळवळीचे नेते किशोर तिवारी यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची व जबाबदार आयोजक, कंत्राटदार तसेच संबंधित शासकीय विभागीय अधिकाऱ्यांवर अन्याय्य मृत्यूला कारणीभूत ठरल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.मृतकाचा भाऊ रामकृष्ण तोडासे (वय ३८) यांनी पोलिसांना जबाब दिला असून, करंट लागल्याने अंकुशच्या हाताला काळपटपणा आला होता. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.“परवानगीशिवाय सुरू असलेल्या कार्यक्रमाला जबाबदार कोण?” असा प्रश्न किशोर तिवारी यांनी उपस्थित केला आहे.
=========================================