महाराष्ट्रात अभुतपुर्व ओला दुष्काळ पडला असतांना महायुतीच्या दांडिया उत्सवात आदिवासी तरुणाचा मृत्यू – भ्रष्ट गृह मंत्रालय झोपलेले किशोर तिवारी यांचा आरोप
दिनांक -१ ऑक्टोबर २०२५
एकीकडे महाराष्ट्रात ८० लाख हेक्टर मध्ये उभे पीक बुडाली असतांना व दररोज ८ ते १० ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतांना भाजप व शिंदेचे मंत्री ,आमदार व पदाधिकारी दुबईतुन हजारो कोटींचा क्रिकेट सत्ता खेळणारे व त्याच बरोबर आबकरी कर सरकारला न देता ज्या लाखो कुटूंबाचा घरचा करता मारणारे दारू माफिया यांच्या पैशाने लोकांच्या धार्मीक भावनांचा फायदा घेऊन बी ग्रेड सिनेमाच्या अश्शील नृत्य करणाऱ्या व त्यावर सर्रास दारूच्या नशेत नवरात्रोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावावर जी नंगानाज सध्या सुरु आहे त्यामध्ये आता गरीब आदिवासी तरुण मरत असल्याच्या घटना घडत असुन मात्र गृह मंत्रालयाचे अधिकारी कर्मचारी आमदारांच्या दडपणात मांडवली करून हा तमाशा असाच सुरु ठेवत आहेत याचा निषेध मागील ४० वर्षापासुन अहोरात्र शेतकऱ्यांसाठी भांडणारे चवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी केला असुन दुबईतुन हजारो कोटींचा क्रिकेट सत्ता खेळणारे व त्याच बरोबर आबकरी कर सरकारला न देता ज्या लाखो कुटूंबाचा घरचा करता मारणारे दारू माफिया यांना मोका मध्ये अटक करण्याची मागणी केली आहे .
नवरात्रोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान झालेल्या एका भीषण अपघातात आदिवासी तरुणाचा करंट लागून मृत्यू झाल्याने शहरात शोककळा पसरली आहे. ही घटना ३० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजता पांढरकवडा शहरात तालुका क्रीडा संकुल (स्टेडियम) येथे घडली.मृत तरुणाचे नाव अंकुश विठ्ठल तोडासे (वय ३०, रा. चांद्रशेखर वार्ड, पांढरकवडा) असे आहे. तो इलेक्ट्रिक वायरमन म्हणून काम करीत होता. उत्सवातील डेकोरेशनच्या कंत्राटदाराकडे तो वायरिंग व फिटिंगचे काम पाहत होता. जनरेटरमधून येणारे कनेक्शन कट करताना त्याला जोराचा करंट लागला. नागरिकांनी तातडीने सरकारी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
परवानगीशिवाय आयोजित कार्यक्रम?
या गरबा-दांडिया कार्यक्रमाचे आयोजन आबकरी कर सरकारला न देता ज्या लाखो कुटूंबाचा घरचा करता मारणारे दारू माफिया यांच्या मालकांनी व भाजप आमदार यांनी निर्माण केलेल्या मित्र परिवार यांनी केले होते. तालुका क्रीडा संकुलन स्टेडियमवर हा कार्यक्रम चालू होता. परंतु आश्चर्य म्हणजे या कार्यक्रमाला ना तालुका क्रीडा विभागाकडून, ना पोलीस प्रशासनाकडून, ना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नव्हती,यामुळे हा कार्यक्रम बेकायदेशीर पद्धतीने आयोजित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीसुद्धा परवानगीशिवाय मोठा सांस्कृतिक सोहळा शहरात सुरु राहणे हे थेट प्रशासनाच्या दुर्लक्षाचे व निष्काळजीपणाचे द्योतक आहे.
जबाबदारांवर गुन्हा दाखल करा
या संपूर्ण घटनेमुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत असून, चळवळीचे नेते किशोर तिवारी यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची व जबाबदार आयोजक, कंत्राटदार तसेच संबंधित शासकीय विभागीय अधिकाऱ्यांवर अन्याय्य मृत्यूला कारणीभूत ठरल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.मृतकाचा भाऊ रामकृष्ण तोडासे (वय ३८) यांनी पोलिसांना जबाब दिला असून, करंट लागल्याने अंकुशच्या हाताला काळपटपणा आला होता. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.“परवानगीशिवाय सुरू असलेल्या कार्यक्रमाला जबाबदार कोण?” असा प्रश्न किशोर तिवारी यांनी उपस्थित केला आहे.
=========================================
No comments:
Post a Comment