Thursday, November 5, 2020

शेतकरी मिशन चे अध्यक्ष किशोर तिवारी यांची महाराष्ट्राचे राज्यपाल मा.श्री.भगतसिंह कोश्यारी सोबत भेट व वार्ता

प्रेस नोट निवेदन*

शेतकरी मिशन चे अध्यक्ष किशोर तिवारी यांची महाराष्ट्राचे राज्यपाल मा.श्री.भगतसिंह कोश्यारी सोबत भेट व वार्ता 

विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर / पांढरकवडा, झरीजामनी व मारेगाव आदिवासी ग्रामीण भागांना प्रत्यक्ष भेट देण्याची विनंत*

मुंबई. दि. ५ नोव्हेंबर, २०



विदर्भ जनआंदोलन समितीच्या माध्यमातून विदर्भातील आदिवासीं व ग्रामीण जन जीवनात विगत तीन दशकां पासून काम करीत असलेले शेतकरी मिशन चे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज राजभवन मुम्बई येथे महाराष्ट्राचे राज्यपाल मा.श्री.भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेवून त्यांचे सोबत वार्ता केली. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी व आदिवासीं चे प्रश्न आणि ६० वर्षांत निर्माण झालेल्या प्रचंड अनुशेषचा मुद्दा किशोर तिवारी यांनी  उपस्थित करून एक सविस्तर सादरीकरण मा. राज्यपाल महोदयां समोर मांडण्यात आले.*

ऑगस्ट २०१५ पासून, महाराष्ट्र शासनाने स्थापित केलेल्या वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन (व्हीएनएसएसएम) चे राज्यमंत्री दर्जाचे अध्यक्ष म्हणून किशोर तिवारी यांना विशेष जबाबदारी दिली आहे. 

विदर्भ आणि संपुर्ण मराठवाडा विभागातील १४ जिल्ह्यातील नैराश्य आणि आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विविध समस्यांवर उपाययोजनांचे पुनरावलोकन व देखरेख ठेवण्याचे विशेष अभियान शेतकरी मिशन च्या माध्यमातून सतत सुरू आहे.
मा. राज्यपाल मोहदयानी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर / पांढरकवडा, झरी जामनी आणि मारेगाव ग्रामीण भागात वैयक्तिक भेटीच्या कार्यक्रमासाठी वेळ  ठरवण्याची विनंती किशोर तिवारी यांनी केली.

मा. राज्यपाल भेटीच्या कार्यक्रमाचा उद्देश आणि हेतू


राज्यपाल भेटीच्या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे गरीब आदिवासी आणि ग्रामीण भागाची हलाखीची स्थिती आणि हवालदिल जीवनशैली पाहणे आणि त्यावर भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद  ३७१(२) नुसार मा.राज्यपाल महोदयांना असलेल्या विशेष अधिकारात उपाय योजना आखण्यात यावी.
कारण राज्याच्या विदर्भ आणि मराठवाडा विभागातील मागासलेल्या भागातील सम समान संधी आणि  खर्चासाठी समान रकमेचे वाटप निश्चित करण्यासाठी राज्यपालांनी विशेष अधिकार प्राप्त असून त्याचा वापर करणे आता जिकरीचे क्रमप्राप्त असल्याचे तिवारी यांनी विशद केले. संपूर्ण राज्याच्या आवश्यकतांच्या अधीन असलेल्या तंत्रज्ञान शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण आणि राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या सेवांमध्ये रोजगारासाठी पुरेशा संधी उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्याचा घटना प्रदत्त अधिकार राज्यपाल महोदयांना असून या भागांत राज्यपालांची भेट गरीब आदिवासी, शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांच्या नैतिकतेला चालना देईल आणि अवसादाने होणार्‍या दुर्दैवी घटना कमी होतील.
म्हणूनच, आपल्या सोयीनुसार या भागांना भेट देण्यासाठी वेळ द्यावा यासाठी नम्रपणे प्रार्थना तिवारी यानी केली आहे.

************

संपर्क सूत्र : 
किशोर तिवारी
अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा)
कै. वसंतराव नाईक शेती स्वाभिमान मिशन (व्हीएनएसएसएम),
 महाराष्ट्र सरकार,

भ्रमण ध्वनी :  9422108846
 
ई-मेल: kishortiwari@gmail.com

🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment