देवेंद्रग्रस्तांमध्ये मध्ये एकच नाथाभाऊ नाहीत अनाथांचा छळाच्या कथा अनंत-किशोर तिवारी यांची बोचरी टीका
दीनांक-२२ ऑक्टोबर २०२०
Add caption |
खूप दिवसांपासून नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. राजीनामा दिल्यानंतर खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच आपण भाजप नेतृत्वावर नाराज नसून देवेंद्र फडणवीसांमुळं राजीनामा देत असल्याचं खडसेंनी सांगितलं. आपलं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला असल्याचं खडसे म्हणाले. मात्र देवेंद्रग्रस्तांमध्ये मध्ये एकच नाथाभाऊ नाहीत अनाथांचा छळाच्या अनंत कथा असुन आपणास मागील ५ वर्षाच्या सत्तेच्या काळात फारच जवळुन अनुभव आल्याची बोचरी माहीती सध्या शिवसेनावासी झालेले मुळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नाड असलेले शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी आज एका निवेदनाद्वारे दिली .
देवेंद्र फडणवीस यांची १८ तास काम करण्याची पद्धत एकखांबी काम करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टाइल अंगिकारल्यामुळे व अमित शाह सह मोदींची अभुतपुर्व चाटूगीरी करण्याच्या शैलीमुळें त्यांना २०१४च्या निवडणुकीच्या काळातच राज्याचे भाजप अध्यक्ष नरेंद्र मोदी यांनी आपले महाराष्ट्राचे पंतप्रधान पदाचे दावेदार नितीन गडकरी त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून तयार केलेले एकनाथ खडसे विनोद तावडे चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवार प्रकाश मेहता माधव भंडारी अतुल भातखळकर यांच्या सारखे प्रमोद महाजन यांच्या तालिमीत वाढलेले कार्यकर्ते घरी बसविण्याची जबाबदारी दिली होती व त्यानंतर २०१४च्या मोदीलाटेत मुख्यमंत्र्याची गद्दी सुद्धा सर्व मुसद्दी नेते डावळून देण्यात आली त्याचवेळी साऱ्या फाईली अमित शाह पास केल्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी ओके ही अट टाकण्यात आली होती मात्र देवेंद्र फडणवीस मिळालेली संधी फक्त आपल्या चांडाळ चौकडी त्यामध्ये गिरीश महाजन डॉ संजय कुटे जयप्रकाश रावळ व संभाजी निलंगेकर यांचा समावेश होता तर परिणय फुके व डॉ रणजित पाटीलांच्या या चाकरांच्या मदतीने गाजविली त्यातच आशिष शेलार मामा व मंगलप्रभात लोढा यांनी सुद्धा मुंबईचा हिशोब पुरा केला यामुळे भाजपाची सर्वत्र संघटनात्मक दाणादाण होत असतांना आपण जवळुन पाहिल्याचा दावा किशोर तिवारी यांनी केला .
सत्तेच्या शेवटच्या तीन वर्षात नौकरशाहीला खैरात वाटुन देवेंद्र सर्व स्पर्धकांना गारद केले दररोज रात्रीला वर्षा बंगल्यावर आपल्या चांडाळ चौकडी त्यामध्ये गिरीश महाजन डॉ संजय कुटे जयप्रकाश रावळ व संभाजी निलंगेकर यांचा सोबत कुणाचा बंदोबस्त कसा करायचा याची योजना आखण्यात येत होती तर परिणय फुके व डॉ रणजित पाटील यांनी फाईल क्लिअर करण्यासाठी जमवाजमव करीत अशी चर्चा फार जोरात चालत असे त्यामुळे संघानी दिलेले भाजपचे संघटन मंत्री हताश पाहिल्याचे किशोर तिवारी यांनी यावेळी म्हटले आहे .
आपणास २०१२च्या डिसेंबरमध्ये भाजपा तत्कालीन अध्यक्ष नितीन गडकरी यांनी भाजपासोबत काम करण्याचे निमंत्रण दिले होते मात्र २०१४च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपणास भाजपामध्ये नाथापॅटर्नने केराची टोपली दाखविण्यात आल्यावर आपण विदर्भाचे भाजपाचे संघटनमंत्री यांच्यामार्फत आपले पुढचा प्रवास कसा राहणार असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना निवडणुकीपुर्वी स्पष्ट चर्चा केल्यावर आपण विधान परीषद देतो असा शब्द दिली होता मात्र आपला सुद्धा नाथा केल्याचा आरोप यावेळी किशोर तिवारी यांनी केला .
गरीबांचे व लाखो अनाथांचे नाथ यांनी जे म्हटले आहे की भाजप सरकारमध्ये माझ्या राजीनाम्याची मागणी कुणीही केली नव्हती. माझ्या चौकशीची कुणीही मागणी केली नव्हती. कुणीही राजीनामा मागितला नसताना मला राजीनामा द्यायला लावला. माझी तक्रार देवेंद्रजींवर आहे. माझ्यावर त्यांनी विनयभंगाचा खटला दाखल करायला लावला. हे मरणाहून मेल्यासारखं आहे. माझ्यासोबत अत्यंत खालच्या स्तराचं राजकारण केलं. माझा परिवाराला यामुळं मनस्ताप झाला. माझ्यावर पाळत ठेवली गेली. मंत्री असताना नऊ महिने पाळत ठेवली यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गंभीरते घेणे जरुरीचे झाले आहे आज देवेंद्र फडणवीस यांना आवरणे काळाची गरज झाली असल्याचे मत किशोर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केले
========================================
किशोर तिवारी यांच्याशी संपर्क करण्यासाठी -०९४२२१०८८४६
No comments:
Post a Comment