मोदी काकाचे ऐकून अडाणी मामांना महाराष्ट्र विकू नका -शिवसेना नेते किशोर तिवारी यांची देवाभाऊंना आर्त हाक
केन्द्रातील मोदी काकांनी महाराष्ट्र प्रदेश अडाणी मामांना विकण्याचा घाट रचला आहे. मोदी काकांचे ऐकून देवाभाऊ तुम्ही महाराष्ट्र अडाणी मामांना विकू नका अशी आर्त हाक शिवसेनेचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी देवाभाऊंना दिली आहे. देवाभाऊ उद्या दिनांक 5 डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे, त्याअनुषंगाने महाराष्ट्र वाचविण्यासाठी किशोर तिवारी यांनी विनंती केली आहे.
महाराष्ट्रात अडीच वर्षाच्या महायुतीच्या कार्यकाळात शेतक-यांच्या आत्महत्या मोठया प्रमाणात वाढल्या. युवकांच्या हाताला काम नसल्याने बेरोजगारांची फौज तयार झाली. गावापासून तर मुंबई पर्यंन्त मोठया प्रमाणात भ्रष्टाचार वाढला. ग्रामीन भागात आरोग्य, शिक्षण सेवा विस्कळीत झाली आहे. सुविधे अभावी विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व समस्या देवाभाऊंनी सोडवाव्या अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे. विदर्भात राहणा-या देवाभाऊंची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदी निवड झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन करीत आता विदर्भ राज्य वेगळे करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन किशोर तिवारी यांनी केले आहे. ऊर्जा विभागात सुरू असलेली खुली लूट बंद करावी, वन विभाग, कृषी विभाग, सिंचन विभाग, महिला कल्याण, कामगार कल्याण, आदिवासीं विकास यामध्ये राजरोस सुरू असलेली खुली लूट रोखण्याचे आवाहन सुध्दा पत्रकाव्दारे करण्यात आले आहे. वसुधैव कुटूंबकम ऐवजी गूजूदेव कुटुंबम प्रमाणे काम करणा-या भाजपाने आपली ही निती सोडावी. महाराष्ट्रात काम करतांना मराठी माणूस सुखी कसा होईल हे आपण बघावे. त्यातच विदर्भाचा माणूस म्हणून मुख्यमंत्री या नात्याने जरा विदर्भावर कृपा करून, आपली गमावलेली पत पुन्हा प्राप्त करा, असा चिमटा सुध्दा सरते शेवटी किशोर तिवारी यांनी देवाभाऊंना काढला. मंत्री मंडळात समाविष्ट करतांना कॅरेक्टर लेस, मुलींचे लैगीक शोषण करणारे, गुन्हेगार प्रवृत्तीचे, रेती तस्कर, माफीयांना टाळण्याचा सल्ला सुध्दा किशोर तिवारी यांनी दिला आहे.
गौण खनीज मोफत करा
राज्यात रेती माफीया मोठया प्रमाणात वाढले आहे. आता हे माफीया पैशाच्या जोरावर अधिका-यांना सुध्दा मारहाण करीत असल्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे हा माफीया राज बंद करण्यासाठी तसेच गरीबांना फायदा होण्यासाठी वाळू, मुरुम, गीट्टी मोफत करण्याची मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment