Tuesday, December 24, 2024

या दशकात निर्माण झालेल्या "पोटभरू व सत्ताभोगी" राजकीय जमातीने लोकहिताच्या सार्वजनिक जीवनाचा निचतेचा स्तर गाठला -किशोर तिवारी

या दशकात निर्माण झालेल्या "पोटभरू व सत्ताभोगी" राजकीय जमातीने लोकहिताच्या सार्वजनिक जीवनाचा निचतेचा स्तर गाठला -किशोर तिवारी 

दिनांक -२३/१२/२०२४

सध्या लोकसभा निवडणुक २०२४ च्या जनादेशाची भाजपाविरोधीहवा बघुनमहाविकास आघाडीच्या कोणत्याही घटक पक्षाची कास धरा व येणारी सत्ता भोगण्यासाठी आपली  राजकीय विचारसरणी सोडुन पक्षांतर केलेल्या मंडळींचा विधान सभेच्या निवडणुकीत झालेल्या अभुतपुर्व पराभवामुळे भ्रम निरास झाला आहे . या संधीसाधू लोकनेत्यांचे नागपूरच्या आधिवेशनात भेटीची एक लाटच जनतेनी पाहिली व लाचार राजकीय नेते व सनातनी दलाल यांचा  सत्तेची कास कशीतरी पुन्हा पकडावी यासाठी झालेली लाजिरवाणी धडपड पाहल्यावर या दशकातील "पोटभरू व सत्ताभोगी " राजकीय  जमातीने लोकहितासाठी सार्वजनिक जीवनाचा जो स्वीकार केला त्याच्या आपल्या राजकीय दुकानदारी जिवंत ठेवण्यासाठी कसा प्रकारें निचतेचा स्तर गाठला आहे याचा अनुभव मागील दशकात जनतेनी पाहीला अशी खंत सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी व्यक्त केली . 

२०१४ च्या निवडणुकीत भाजपाने सुरु केलेला राजकीय विरोधकांचा विचारांचा बलात्काराचा २०२४ पर्यंत कळस गाठला 

देशात काँग्रेसने सतत सत्तेत राहल्यामुळे "पोटभरू व सत्ताभोगी " राजकीय भ्रष्ट नेत्याची एक जमात या देशात निर्माण झाली आहे व त्यांनी बहुतेक सर्वच पक्षावर कब्जा मिळविला आहे या समाजद्रोही नीतिभ्रष्ट  जमातीने  भ्रष्टाचाराने व  सत्तेचा दुरुपयोग करून साऱ्या  संसाधनांवर ताबा मिळविला असुन,लुटारू  सनदी अधिकारी यांचा भागीदारीने त्यांनी सर्व वसुलीचे अवैध धंदे,दारूची दुकाने,मोफत जमिनी लाटणे,सरकारी अनुदानाच्या शाळा महाविद्यालये,सरकारी कंपन्यांचा पुरवडा,गॅस वितरण,सरकारी पुरवडा,सरकारी कंत्राटके ,सरकारी लूट करून आपली दुकाने थाटली असुन या लुटीमध्ये २०१४ पूर्वी मात्र विरोधी पक्ष नेते सार्वजनिक जीवनात या लाभापासून काँग्रेसने शेकडो किलोमीटर सुरू ठेवल्याने राष्ट्राचे लचके तोडण्यात सक्रीय नव्हते ,हि वस्तुस्थिती किशोर तिवारी यांनी यावेळी मांडली 

मात्र ज्याप्रकारे २०१४च्या राष्ट्रीय निवडणुकीत देशाच्या गद्दीवर  गुजराती लुटारूंची नवी टीम देश लुटीसाठी आरूढ केल्यावर या सनातनी "पोटभरू व सत्ताभोगी " राजकीय काँग्रेस विचारसरणीच्या जमातीमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती व आता आपली काँग्रेस ने करून ठेवलेली लुटीची सोय व दुकानदारी बंद होणार अशी भीती व्यक्त करीत होते मात्र ऑगस्ट २०१४च्या सुरवातीलाच नव्याने केंद्रात सत्तेत आलेल्या तानशाह मंडळीने भाजपची दारे या चोरांना उघडी करीत आपल्या सरकारी लूटीला आम्ही आहे तशीच सुरु ठेवणार मात्र आमच्या देश विकण्याचा एकसुत्री कार्यक्रमावर मौन ठेवावे अशी अट ठेवत प्रवेश देणे सुरु केले व भारतामध्ये सरकार लोकविरोधी निर्णयावर बोलणारा संघर्ष करणारा विपक्ष कमजोर होण्याची प्रक्रीया सुरु झाली व आज संधिसाधु लाचार पोटभरु आयाराम गयाराम नासलेल्या राजकीय  मंडळींची जमात निर्माण करण्यात नैतिकतेच्या राष्ट्र निर्माणाच्या गप्पा संस्काराचा जगातील ठेका घेतलेल्या या पाखंडी राज्यकर्त्यांना यश आले आहे याला संघ परिवाराची लाचारी महत्वाची आहे यावर संघ परिवारात चिंतन करण्याची मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे .   

भाजपने २०१९ ते २०२४ मध्ये राजकीय अवपतनाचा नवीन इतिहास घडविला 

साऱ्या भारतात राजकीय संस्कृती व राजकारणाचा स्तर जपण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भाजपने २०१४ बहुराष्ट्रीय कंपन्यांशी व प्रत्येक कंत्राट यामध्ये भाजप नेत्यांनी सर्व पक्षामधील "पोटभरू व सत्ताभोगी " राजकीय जमातीला सोबत घेऊन देश लुटीचा नीतिभक्षक तांडव सुरु केला व आज कोण कोणाच्या सोबत आहे हे सांगणे कठीण झाले आहे,प्रत्येक नेता व कार्यकर्ता लोकनिधीची लुटीचा अधिकारी बनण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्यास तयार आहे.सर्व नेत्यांना व कार्यकर्त्यांना पद  पाहिजेत त्यासाठी ती मंडळी विष्टा खाण्यास तत्पर आहे ,राजकीय ऱ्हासाला नीतिमत्ता व नैतिकतेचा तसेच सनातन धर्म संस्कृतीसाठी देशात सामाजिक सदभाव  व  सलोखा नष्ट करणाऱ्या  संघाने घेतलेल्या बघ्याच्या भूमिकेचा जबाबदारी प्रमुख आहे असा गंभीर आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे ,

महाराष्ट्राच्या राजकारणात घाण निर्माण करण्याचे शिल्पकार अमित शाह व देवेंद्र फडणवीस 

महाराष्ट्रात राजकीय विचारसरणी व तत्वे जपण्याची परंपरा होती मात्र ईडी सीबीआय निवडणूक आयोग न्यायालय यांचा बेकायदेशीर अनियंत्रित बेलगाम वापर करून गुंडगिरीच्या भरोशावर राजकीय साम्राज्य निर्माण केलेल्या नेत्यांना  राजसत्ता व संसाधन लुटी मध्ये सहभागी करीत भाजपाने एक नवीन अनैतिकतेचा व चारित्र्यहीनतेचा नवा कळस गाठला याला अमित शाहव त्यांचे हस्तक देवेंद्र फडणवीस व आशिष शेलार या सारख्या नीतिभ्रष्ट नेतेच जबाबदार आहेत  व हा कार्यक्रम आज या स्तरावर पोहचला आहे की सडक्या पक्षीय राजकारणाची हवा न लागलेल्या व एका रात्रीमध्ये कोट्याधीश होण्याचे लक्ष नसणाऱ्या युवा नेतृत्वाने  जर मोठे जनआंदोलन उभे केले  नाहीतर हि राष्ट्रीय लूट अविरत सुरु राहणार आहे पण महाराष्ट्र हि संताची भूमी आहे या ठिकाणी  "पोटभरू व सत्ताभोगी " राजकीय नेते यांचा नायनाट करण्यासाठी लोक जागरण मोहीम जशी  दक्षिण पुर्व आशियात सुरु झाली आहे भारतात सुद्धा युवा पिढी हातात घेणार व या देशद्रोही सतत सत्तेत राहल्यामुळे "पोटभरू व सत्ताभोगी " झालेल्या  राजकीय जमातीला नष्ट करतील ,असा विश्वास किशोर तिवारी व्यक्त केला आहे 

=========================================================================

No comments:

Post a Comment