Thursday, August 21, 2025

कापूस ,सोयाबीन ,तूर उत्पादक महाराष्ट्राच्या ९० लाख शेतकऱ्यांना सरकारच्या आयात धोरणामुळे होणाऱ्या गंभीर परिणाम विरुद्ध किशोर तिवारी यांची २२ ऑगस्टला शेतकरी संवाद यात्रा 

दिनांक -२१ ऑगस्ट २०२५


भारत सरकारने कापसाच्या आयातीवरील शुल्क  अमेरिकेचे अध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली १५ टक्क्यावरून शून्य केले असुन तसेच भारतात मुजाम्बिक वरून अनियंत्रित तुरीची आयात सुरु केल्यामुळे तसेच अनियंत्रित पाम तसेच सोयाबीनचे अति  स्वस्त तेल कोणतीही आयातीची मर्यादा न ठेवता परवानगी दिल्यामुळे कापूस ,सोयाबीन ,तूर उत्पादक महाराष्ट्राच्या ९० लाख शेतकऱ्यांना सुमारे ५० हजार कोटींचा तोटा सहन करावा लागेल व ऑक्टोबर नंतर शेतकऱ्यांचे सध्या विदर्भ व मराठवाड्यात सुरु असलेले आत्महत्यासत्र खान्देश उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात पसरेल असा गंभीर इशारा शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी दिला आहे . सध्या आयाती निर्याती धोरण ,पत पुरवडा धोरण ,पीक विमा धोरण ,सरकारचे सरळ अनुदान विरोधी धोरण ,चीन कडुन कृषी खतांचा ,कीटक नाशकांचा पुरवडा ,बियाणे , कृषी माल प्रक्रिया विरुद्ध धोरण यामुळे शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न ज्याचा संबंध लागवड खर्च कमी करणे ,स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी नुसार हमीभाव न देणे यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थ व्यवस्थेवर आलेले अभूतपूर्व संकटावर शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी येत्या २२ ऑगस्टला शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी,अंकित नैताम, मोरेश्वर वातिले ,प्रेमभाऊ चव्हाण,सुनील राऊत ,रुपेश भाऊ क्यातमवार ,शिवारेड्डी पाटील ,अभय कट्टेवार ,मोहन ममीद्वार ,अजय राजूरकर ,निखिल मेश्राम ,माणिक पेंदोर , शंकरराव अंधारे ,शेतकरी विधवा संघटनेच्या अपर्णा मालीकर, मोनाली ठाकरे हे सर्व  "शेतकरी संवाद यात्रा " काढणार आहेत . 

शेतकरी संवाद यात्रा चा सकाळचा  दौरा

ही यात्रा दिनांक  २२ ऑगस्ट २०२५ ला  केळापूर व घाटंजी भागातील अतिवृष्टी झालेल्या भागात    सकाळी ११.००वाजता  केळापूर येथे ,सकाळी ११.३०ला  मराठीवाकडी,सकाळी ११.४५ला  ढोकी रोड,दुपारी ला  १२.०० ला  टेंभीला व  सुसरी ला दुपारी १२.१५  सुन्ना येथे दुपारी १२.३० तसेच कोपा मांडवी येथे दुपारी १२.४५ तर वारा कवठा येथे दुपारी १.०० वाजता पोहचणार आहे त्यानंतर  पाटणबोरी ला दुपारी १.३० तर  पिंपळखुटी येथे दुपारी २.०० व  कोदोरी येथे ,दुपारी २.३० ला , रुढा येथे दुपारी २.४५ ला चनाका येथे दुपारी ३.०० येथे  घुबडी ला दुपारी ३.१५ व कारेगाव बंडलला दुपारी ३.३०,अर्ली ला दुपारी ३.४५ यानंतर घाटंजी तालुक्यात  गणेरी ला दुपारी ४.०० तर ठाणेगावला दुपारी ४.१५, भिमकुंड सगदा येथे दुपारी ४.३० व   मंगीयेथे दुपारी ४.४५,सावरगावला सायंकाळी ५.००ला त्यानंतर रामनगर येथे सायंकाळी ५.१५ तर  शरद येथे सायंकाळी ५.४५ व त्यानंतर  पारवा येथे सायंकाळी ६.०० व  कालेश्वर ला सायंकाळी ६.१५ ,जाबं येथे सायंकाळी ६.४५ त्यानंतर केळापूर तालुक्यातील  झुली दहेली तांडा येथे सायंकाळी ७.०० व पहापळ येथे संवाद यात्रेची संपत्ती रात्री ८ वाजता होईल 

या दौऱ्यात किशोरभाऊ तिवारी सह सर्व कार्यकर्ते शेतकऱ्यांची थेट भेट घेऊन अडचणी समजतील ,पूरग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसान प्रत्यक्ष पाहणी करतील ,शेतकऱ्यांच्या पिककर्जाच्या  समस्या व पीक विमा अडचणी जाणून घेणार,आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आधार देणार,पिक कर्ज वाटपाचा गोंधळ , मागील वर्षीच्या अतिवृष्टीची न मिळालेल्या नुकसान भरपाई तसेच  इतर प्रश्नांवर चर्चा करणार आहेत या दौऱ्यात संबंधित सरपंच, पोलीस पाटील, स्थानिक नेते व कार्यकर्ते उपस्थित राहणार असून, प्रत्येक गावातील शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन शासन दरबारी  मागण्या मांडल्या जाणार आहेत.

-------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment