Saturday, September 27, 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दमानिया यांची मित्राच्या सल्लागार पदी केलेली नियुक्ती रद्द करावी - किशोर तिवारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  दमानिया यांची मित्राच्या सल्लागार पदी केलेली  नियुक्ती रद्द  करावी - किशोर तिवारी 

 दिनांक -२८ सप्टेंबर २०२५

महाराष्ट्रात सर्वच राजकीय नेत्यांना शिव्या देणाऱ्या व चारित्र्य प्रमाणपत्र वाटणाऱ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृपापात्र अंजली दमानिया यांचे शेअर बाजारात काळा पैसा गोरा करण्याचे ,अवैध बांधकाम करण्याचे , लवादाचे अधिकारी पोलीस यांच्या दबाव टाकुन आदीवासी यांच्या शेकडो कोटींच्या जमीनी हडपण्याचे गंभीर आरोप असणारे वादग्रस्त पती अनिश दमानिया यांची अत्यंत गोपनीय,सवेंदनशील ,केंद्राच्या नीती आयोगाच्या समकक्ष अशा मित्रा (महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन) च्या  मानद सल्लागार पदी  करण्यात आलेली नियुक्ती संपुर्णपणे बेकायदेशीर असुन ,राजकीय हित संबंध व नैतिक विधी निर्देश याच्या विरोधात असुन ते या पदावर राहुन आपले पोटभरू धंदे सनदी अधिकाऱ्यांवर तसेच सरकारी गोपनीय माहीती सार्वजनिक करण्याचा धोका असल्याने त्यांच्या या पदावरून तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी केली आहे व आपण ह्या नियुक्तीला लोकायुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या दरबारी घेऊन जाणार असुन महाराष्ट्रात नामवंत आर्थिक सल्लागार असतांना अशा संवेदनशील पदावर सरकारवर व त्यांच्या मंत्र्यांवर गंभीर आरोप करणारे त्याच भ्रष्ट सरकारला कसा काय सल्ला देऊ शकतात असा सवाल किशोर तिवारी यांनी या वेळी केला . 

मित्रा काय आहे 

महाराष्ट्र सरकारने ११ नोव्हेंबर २०२२ रोजी विषेय आदेशाने नीतीआयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) ची स्थापना करण्यात आली आहे यावर मुख्यमंत्री अध्यक्ष ,अंजनली दमानिया यांनी भ्रष्टाचाराचे रणशिंग ज्यांच्या विरोधात फुंकले ते  दोन्ही उपमुख्यमंत्री सह महाराष्ट्राचे सर्वात जास्त भ्रष्टाचाराचे आरोप असणारे मंत्री ,अर्थ व नियोजन सचिव आहेत आता या सर्वाना सल्ला देण्यासाठी स्वतः आदीवासी व दलितांची शेती जमीन एमआयटी मार्फत हडपण्याचे आरोप असणाऱ्या तसेच  एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये संस्थात्मक इक्विटीचे प्रमुख असताना बाजारातील गैरव्यवहारात सहभागी असणाऱ्या त्याच बरोबर  ५ ऑक्टोबर २०१२ रोजी  १२५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (सुमारे ₹७५० कोटी) किमतीचे ६० हून अधिक बनावट संस्थात्मक ऑर्डर टाकुन  राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) वर अत्यंत गरीब चाकरमान्या निवेशकांचे हजारो कोटी बुडविण्याचा आरोप असणारे ,मुंबईत नियमबाहय बांधकाम करणारे ,अनिश दमानिया करण्यात आलेली नियुक्ती मुख्यमंत्री महारष्ट्र राज्य यांनी पदाचा दुरुपयोग असुन यावर लोकायुक्त यांचे आपण दाद मागणार आहोत . 

अंजली दमानिया यांच्या भ्रष्टाचार विरोधी लढा महाराष्ट्र सरकारने विकत घेतला 

अंजली दमानिया हे महाराष्ट्रातील एक प्रमुख भ्रष्टाचारविरोधी चळवळीतील आणि सिंचन घोटाळे कृषी घोटाळे उघड करण्यासाठी आणि पारदर्शकतेचा पुरस्कार करण्यासाठी त्यांनी  राष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले आहे पण त्यांची सक्रियता त्यांच्या पतीच्या व्यावसायिक संबंधात जुळली आहे ह्याचे पुरावे उपलब्ध आहेत त्यामुळे या नियुक्तीमुळे अंजली दमानिया यांच्या हितसंबंधांच्या संघर्षाबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. 

मित्रा ही महाराष्ट्र सरकारला जागतिक बँक, आशियाई विकास बँक, आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ आणि सीएसआर ट्रस्ट फंडांकडून विकास उपक्रमांसाठी ऑफ-बजेट संसाधने उभारण्यासाठी इनपुट प्रदान करणे, जसे की निष्क्रिय राज्य मालमत्तेचे मुद्रीकरण आणि सवलतीच्या दरात वित्तपुरवठा करणे तसेच स्थानिक स्तरावरील नियोजन वाढविण्यासाठी आणि विकासात्मक कार्यक्रमांची अंमलबजावणी सुधारण्यासाठी जिल्ह्यांना डेटा विश्लेषण समर्थन प्रदान करणे. याव्यतिरिक्त, मित्रा निकाल-आधारित रिअल-टाइम मूल्यांकनास समर्थन देईल आणि अंमलबजावणी कार्यक्षमता सुधारण्यासाठी अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींना समवर्ती अभिप्राय प्रदान करेल या सारख्या प्रमुख अत्यंत  गंभीर निर्णयामध्ये शेअर  बाजारात दलाल असणारा हित  संबंधांच्या वर कसा सल्ला देऊ शकतात असा सवाल किशोर तिवारी यांनी उपस्थित केला आहे . 

अंजली दमानिया हे देवाभाऊंच्या सुपारीवर काम करतात 

श्रद्धेय सत्यवचनी अंजलीमाता दमानिया यांनी २०१२ पासुन दररोज सकाळ दुपार संध्याकाळ शेकडो राजकीय नेते ,सामाजिक कार्यकर्ते ,त्यांचे सहकारी यांचेवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत त्यामुळे अनेकांची सत्तेमधील पदे ,राजकीय जीवन धुळीस मिळाले आहे मात्र हे सर्व देवेंद्र फडणवीस याना नको असणारी मंडळी होती आजपर्यंत श्रद्धेय सत्यवचनी अंजलीमाता दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस वा त्यांची पैसे खाण्यात गुंतलेली मित्र मंडळी यांचेवर चुकणंही आरोप केलेली नाही ते ५० टक्के कमिशन घेऊन सुरु असलेल्या हजारो कोटीच्या प्रकल्पावर बोलत नाही .मुंबई व विदर्भातील अनियंत्रित अडाणी राज बोलत नाहीत .वीज निर्मितीच्या क्षेत्रात सुरु असलेला लाखों कोटींचा भ्रष्टाचार त्यांना दिसत नाही इतके काय ते गिरीश महाजन ,मनोज कंबोज ,विकी कुकरेजा ,राम कदम यांच्यावरही बोलत नाहीत ह्या गोष्टीवरून ताई देवाभाऊची सुपारी घेऊन त्यांच्या पगारपटावर काम करतात असा होणारा आरोप त्यांचे व्यावसायिक पार्टनर व पती अनिश दमानिया यांची नियुक्तीमुळे होते ,ही गोष्ट सामाजिक जीवनात दररोज इतरांच्या घरावर निर्दोष कुटुंबियांवर करू नये हीच श्रद्धेय सत्यवचनी अंजलीमाता दमानिया यांना हात जोडून विनंती . 

===================================================================



No comments:

Post a Comment