दिनांक -१९ जुलै २०२०
Add caption |
सध्या ग्रेडर व जीन मालक यांची पणन विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन कट्टी व वाहनाचे काजं वाढूउन सुरु असलेली खुली लुट बंद करा असे विनंती शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांनी मोबाईल सांगीतलेली व्यथा सोबत जोडून केली आहे .सध्या अधिकाऱ्यांच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेली असुन शेतकऱ्यांची ओरड ऐकणारा कोणी नसुन . आता शेतकरी किती दिवस ही लूट सहन करणार असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे .
किशोर तिवारी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील बॊरगाव दाभाडी येथील जिनींग प्रेस मधील लुटीचा प्रकार एक ७१ वर्षीय बंजारा कापूस उत्पादक शेतकरी बलदेव परशुराम पवार यांच्या मोबाईल नंबर-९७६३३०३०७३ वरून आलेला संपुर्ण संवाद चौकशीसाठी पाठविला त्यांनी हाच संवाद पणन मंत्री व सचिव तसेच सहकार मंत्री व सचिव जिल्ह्याचे पालक मंत्री संजय राठोड या भागाचें खासदार बाळासाहेब धानोरकर तसेच आमदार डॉ संदीप धुर्वे तसेच बंजारा समाजाचे त्यातच शेतकऱ्यांचे कैवारी देवांनंद पवार याना पाठविली आहे .
या संवादामध्ये या ७१ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने जुलै महिन्यात कापसाची विकण्यासाठी नोंदणी पंचनामे टोकन घेणे यासाठी होत असलेला त्रास त्यानंतर विकण्यामध्ये होत असलेली सरकारमान्य लुट नाकर्ते लोक प्रतिनिधी पैसे खाणारे कर्मचारी व अधिकारी यांचा नंगानाच समोर मांडला आहे . असे प्रकार अख्ख्या महाराष्ट्रात होत आहेत मात्र लॉकबंदी व कोरोना अंगात आलेल्या प्रशासनाला शेतकऱ्यांची विनविणी ऐकू येत नाही मात्र सारा अन्याय शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करणारे मुक मान्यता देऊन का बसले आहे असा सवाल किशोर तिवारी यांनी केला आहे .
सहकार व पणन खात्याचे अधिकारी तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची धमकी देतात तसेच यापेक्षा पुर्वीचे सरकार बरे होते असे मत बलदेव पवार यांनी आपल्या संभाषणात म्हटले आहे , त्यांचा संपूर्ण संवाद दांभीक व जातीच्या नावावर मतदान घेऊन आपले दारूचे दुकान चालू ठेवण्यासाठी शक्ती खर्च करणारे लोक प्रतिनिधी तसेच एकदाची आली सत्ता आता अमाप संपत्ती जमवा सर्व कामासाठी वेगवेगळा दर निश्चित करण्यात गुंतलेल्या राजकीय नेत्याच्या डोळ्यात अंजन टाकणारा आहे .
किशोर तिवारी उदयाला बोरगाव दाभाडी येथे वादग्रस्त जिनांची व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सवांद साधणार जर कोरोना व कुलूपबंदीचे कारण समोर करून रोखल्यास सत्याग्रहाचा इशारा सुद्धा किशोर तिवारी यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment