महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली वैद्यकीय महाविद्यालया कोरोना योध्दांच्या कामाची दखल -किशोर तिवारी यांनी वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन कोरोना योध्दांचा सत्कार केला
दिनांक -२१ ऑगस्ट २०२०
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी कै वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयातील जी डॉक्टरांची ,आरोग्य सेविकांची ,सफाई कर्मचाऱ्यांनी मागील चार महीन्यात एकही दिवस रजा वा बदली न घेता आपलय प्राणांची पर्वा न करता सतत सेवा दिली व देत आहेत असे सौ छाया गौरी -इन्चार्ज सिस्टर आयसोलेशन ,नरेंद्र ब्राह्मणे -सफाई कामगार ऋषभ पवार- सफाई कामगार रजनी चपारिया- सफाई कामगार डॉ.राजेश प्रताप सिंह (अधिष्ठाता) डॉ. रवींद्र राठोड (वैद्यकीय अधीक्षक) डॉ.शेखर घोडेस्वार -सहयोगी प्राध्यापक औषधशास्त्र विभाग डॉक्टर चंद्रशेखर धुर्वे-सहाय्यक प्राध्यापक औषध शास्त्र विभाग डॉ. अरविंद कुडमेथे (वैद्यकीय अधिकारी, प्रमुख, अपघात विभाग) डॉ.चेतन जनबादे(निवासी वैद्यकीय अधिकारी) डॉ. अरयेशा शेख (साहयक प्राध्यापक )डॉ. विशाल धवणे(अपघात वैद्यकीय अधिकारी) डॉ. गोविंद शिंदे (रेसिडेंट मेडिसीन विभाग) यांच्या ऐतिहासिक कामाची दखल घेत त्यांनी या कोरोना योध्दांच्या अमूल्य योगदानामुळे शेकडो कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचले असुन किशोर तिवारी यांना प्रत्यक्ष भेटी देऊन षटकार करण्यास सांगितलें त्यानुसार किशोर तिवारी यांनी आपल्या पत्नी स्मिता तिवारी यांच्या सोबत वैद्यकीय महाविद्यालयात भेट देऊन कोरोना योध्दांचा सत्कार केला. हे डॉक्टर तसेच कर्मचारी हे सतत कोरोना आयसोलेशन मध्ये कार्यरत आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता तसेच कायम त्याच ठिकाणी करीत असल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी किशोर तिवारी यांनी या यवतमाळ जिल्ह्यातील कै वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयातील जी डॉक्टरांची ,आरोग्य सेविकांची ,सफाई कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीची चर्चा असुन ज्या कोरोना योध्दांच्या मी आज सत्कार केला त्यामध्ये माझे आदीवासी , अनुसुचित व भटक्या जमातीचे अत्यंत कठीण गरिबीची संघर्षाचा प्रवास करीत ही अभुतपूर्व देवाचे कांक्रीट आहेत मात्र मूठभर लोक त्यांच्या अडचणी न समजता उगाच आरोप करतात हे टाळले पाहीजेत असे आवर्जुन सांगीतले त्यावेळी कोरोनाचे भय व त्यामुळे कोरोनाग्रस्तांची मानसिक स्थिती पाहून सर्वानी संयम व विन्रमता न सोडण्याचा हे सुद्धा सांगीतले .
कोरोना ही महामारी सर्वांना नवीन आहे त्यातच याचे नियंत्रण नौकरशाही व पोलिसवाले करीत आहेत त्यामुळे आरोग्य सेवेत काम करणाऱ्या सर्वांना प्रचंड तणाव सहन करावा लागत आहे याला कमी बुद्धी व अल्प शिकलेल्या राजकारणी मंडळी कारणीभूत असल्यामुळे आपण आपला संयम व सेवेचा निर्धार सोडू नये असा सल्ला देत हाच आपला मुक्तीचा मार्ग असल्याचा निरोप किशोर तिवारी यांनी यावेळी दिला .
No comments:
Post a Comment