Monday, August 24, 2020

रोहित शेलटकर यांच्या ग्रँड मराठा फौंडेशन कडुन आदीवासी व आत्महत्याग्रस्त पाच हजार कुटुंबाना खवटीचे वाटप

रोहित शेलटकर यांच्या ग्रँड मराठा फौंडेशन कडुन आदीवासी व आत्महत्याग्रस्त पाच हजार  कुटुंबाना  खवटीचे वाटप 

यवतमाळ २४   ऑगस्ट २०२० 

बॉलिवूड चित्रपट  निर्माते व ग्रँड मराठा फौंडेशनचे  संचालक  रोहित शेलटकर यांच्या स्वयंसेवी  महाराष्ट्रातील पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात आधार  उद्धवाचा या प्रकल्पाचा पाचवा टप्पा सुरु करण्यासाठी पाच हजार आदीवासी कर्जबाजारी शेतकरी     व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या  कुटुंबियांना जीवनावश्यक खाद्यपदार्थां व किरणांच्या किटचे वितरण रविवार २३ ऑगस्ट रोजी पांढरकवडा येथील इंदिरा नगरातील प्राथमिक शाळेत केले . यावेळी ग्रँड मराठा फौंडेशनचे अध्यक्षा माधवीताई शेलटकर आधार उद्धवाचा या प्रकल्पाच्या स्मिता तिवारी ,मुंबईच्या  व ठाणे आदिवासी भागात मागील चार महिन्यापासून कोरोना संकटात गरिबांना आदिवासींना खावटी व मदतीचे वाटप करणारे ग्रँड मराठा फौंडेशनचे संचालक राजेशभाऊ तावडे आदिवासी नेते अंकित नैताम प्रमुखपणे  उपस्थित होते . 

पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात ग्रँड मराठा फौंडेशन शेतकरी विधवांच्या कुटुंबासाठी सतत मागील दहा वर्षांपासून मदत करीत असुन रोहित शेलटकर यांनी यापुर्वी या आत्महत्या  कुटुंबातील पहीली  ते दहावी (वयोगटातील) मुलांना पुस्तके वाटप करून तसेच या मुलांच्या शिक्षणाला कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही याची खात्री करुन घेण्यासाठी अतिरिक्त सहकार्य दिले आहे. 

 ग्रँड मराठा फाऊंडेशनचे संस्थापक श्री रोहित शेलटकर  विशेष व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारें दिलेल्या संदेशात म्हटले आहे की कोरोना या "(साथीचा रोग) सर्व देशभर सर्वच आर्थिक  संकट आहे  आता पाचमहिन्यांनंतर शेतकरी कंगाल झाला आहे त्यांनाच कोरोना काळात सर्वात जास्त फटका बसला आहे आणि कमीत कमी खावटी देऊन जगाला अन्न  देणाऱ्या पोशिंद्याला  कमीतकमी जीवनावश्यक वस्तूंवर तो जगला पाहिजे म्हून आज ग्रँड मराठा समोर आली आहे  मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात त्यांचा  सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी सुविधा व शिक्षणाच्या माध्यमातून  जास्तीती मदत व  सुविधा मिळाव्या  आणि उन्नतीसाठी वचनबद्ध आहोत असेही त्यांनी सांगीतले . 

यापुर्वी रोहित शेलटकर यानी शेकडो शेतकरी विधवांना तसेच त्यांचा पाल्याना मदत केली आहे व मागील एप्रिल पासून त्यांनी हजारो  कुटूंबांना मदतीचा हात समोर करून ग्रँड मराठा फॉउंडेशनने त्यांनी निर्माण केलेल्या पानिपत या सिनेमासारखं एक नवा दानशूरव कोरोना योद्धा खऱ्या अर्थाने होण्याचा विक्रम केला आहे 

ही रोगराई सर्व शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत आव्हानात्मक आहे आणि जीएमएफ त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना मूलभूत गरजा पुरवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. या विभागातील स्थानिक राजकीय पक्षांच्या पाठिंब्याने वितरण मोहीम राबविण्यात आली असून नागरिकांकडूनही त्यांना मोठा पाठिंबा मिळाला आहे. ग्रँड मराठा फाऊंडेशनच्या विश्वस्त श्रीमती माधवी शेलटकर विदर्भात  या कार्यक्रमाचे नेतृत्व करीत आहेत.

ग्रँड मराठा फाउंडेशन बद्दलः

ग्रँड मराठा फाउंडेशन, शेतकऱ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक सहाय्य पुरवते जे आधुनिक तंत्राच्या कार्यक्षम वितरणास योग्य किंमत देतात जेणेकरून स्वत: साठी उदरनिर्वाह चालविण्यामध्ये आणि शेतक debt्यांचे कर्ज व दारिद्र्याच्या या वर्तुळात मोडणारी शेतकर्‍यांना सक्षम बनविणे. विदर्भावर विशेष लक्ष केंद्रित करून, ग्रँड मराठा फाउंडेशन देखील शेतकरी मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी आणि शेती व ग्रामीण क्षेत्रात संलग्न उपक्रम सुरू करण्यासाठी आर्थिक मदत पुरवते ज्यामध्ये विधवा महिला आपले जीवन निर्वाह करू शकतील. त्यांनी शाळांमध्ये संगणकाच्या देणगीद्वारे ई-लर्निंगची ओळख आणि प्रोत्साहन दिले आहे. ग्रँड मराठा फाउंडेशनचे ध्येय आहे की शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना चांगल्या पद्धतीने जीवनमान मिळावे आणि कर्ज आणि दारिद्र्याच्या या दुष्ट वर्तुळाला तोडगावे. महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि नागपूर या भागात फाउंडेशन सक्रिय आहे आणि शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांचा सर्वांगीण विकास करीत आहेत. कार्यक्षेत्रातील अडचणी कमी करून आणि अधिक चांगले आयुष्य जगण्यास सक्षम बनवून शेतकरी भविष्यकाळात सज्ज  होईल यासाठी प्रयन्तशील आहे.  

=================================================

No comments:

Post a Comment