Wednesday, December 30, 2020

अतिवंचित जाती-जमातीसाठी एकात्मिक विकास कार्यक्रम तात्काळ सुरु -अतिमागास जाती-जमाती महासंघाची मागणी

अतिवंचित जाती-जमातीसाठी  एकात्मिक विकास कार्यक्रम तात्काळ सुरु -अतिमागास जाती-जमाती महासंघाची मागणी 

दिनांक ३० डिसेंबर २०२०


स्वातंत्र मिळाल्यापासुन व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील वंचित व वर्ण व्यवस्थेत विकासापासुन व जीवन जगण्याच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित राहीलेल्या समाजासाठी दिलेल्या आरक्षणाचा व विषेय सवलती व विकास कार्यापासुन असंघटित शिक्षणापासून दूर असलेला मागास जाती जमाती मधील मोठा वर्ग सतत वंचित राहला असल्यामुळे त्यांना अतिमागास जाती-जमातीच्या बिहार राज्याच्या धर्तीवर एकात्मिक  विकास कार्यक्रम व  वेगळे स्वतंत्र आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र्र राज्य अतिमागास जाती-जमाती महासंघाने एका ठरावाद्वारे मागणी पांढरकवडा येथील आयोजीत मेळाव्यात केली असुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची लवकरच भेट घेणार असल्याची माहीती अतिमागास जाती-जमाती महासंघाचे संयोजक ऍड रमेशचंद्र मोरे यांनी आज एका पत्रकाद्वारे दिली . मेळाव्याचे आयोजन आदीवासी नेते अंकित नैताम पुढाकाराने झाले व शेकडो मादगी मांग भोई वाल्मिकी बुरुड कैकाडी  जातीच्या कोलाम व पारधी समाजाच्या व  मसानजोगी  बंजारा भराडी  अतिवंचित  जाती जमाती कार्यकर्ते उपस्थित होते 

या अतिवंचित जाती- जमाती मेळाव्याचे उदघाटक कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी कोलामांच्या समस्या ,बुरुडांच्या मागण्या ,मादगी समाजावर होत असलेला अन्याय ,पारधी समाज कसा सरकारच्या उदासीनतेचा शिकार झाला आहे त्याच बरोबर बंजारा समाज ज्याला अनेक राज्यात अनुसूचित जमाती व जातीचा दर्जा असतांना महाराष्ट्रात सतत अन्याय कास होत आहे याची माहीती दिली व सध्याच्या आरक्षण पद्धतीमध्ये व मागास वर्गीयांच्या उपलब्ध सवलती व योजनांमध्ये मादगी मांग भोई वाल्मिकी बुरुड कैकाडी  जातीच्या तर आदीम जमातीमध्ये अती वंचित असलेल्या कोलाम व पारधी समाजाच्या तर भटक्या जमातीमधील मसानजोगी  बंजारा भराडी सारख्या अतिवंचित  जाती जमातीला वेगळे आरक्षण ,सवलती व एकात्मिक विकास कार्यक्रम दिल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगीतले व यासाठी रस्त्यावर येऊन आंदोलनाची आवश्यकता त्यांनी विशद केली त्यावेळी एकमुखी आवाजी ठरावाने त्यांना पाठींबा देण्यात आला .

पांढरकवडा येथील अतिवंचित मादगी मांग भोई वाल्मिकी बुरुड कैकाडी  जातीच्या तर आदीम जमातीमध्ये अती वंचित असलेल्या कोलाम व पारधी समाजाच्या तर भटक्या जमातीमधील मसानजोगी  बंजारा भराडी सारख्या अतिवंचित  जाती जमातीच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली .यावेळी कोलाम समाजाचे बाबुलाल मेश्राम ,मादगी समाजाचे  प्रभाकर लिक्केवार ,मसानजोगी समाजाचे बाबुराव कोंडावार ,भराडी समाजाचे रमेश शिंदे ,वाल्मिकी समाजाचे प्रेमभाऊ लेदरे ,कैकाडी समाजाचे रामराव जाधव यांनी आपल्या समस्या मांडल्या . अशोक मग्गीडवार यांनी सर्वांचे आभार मानले ,


==========================================================






No comments:

Post a Comment