Saturday, January 9, 2021

कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन-रा.स्व.संघ सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना किशोर तिवारी यांचे मध्यस्थीसाठी साकडे

कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन-रा.स्व.संघ सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना किशोर तिवारी यांचे  मध्यस्थीसाठी साकडे 

दिनांक - ९ जानेवारी २०२१ 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत यांना शेतकरी नेते व महाराष्ट्राच्या वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन चे राज्य मंत्री दर्जा प्राप्त अध्यक्ष किशोर तिवारी यांनी पुन्हा एक खुले पत्र लिहून कृषी सुधारणा कायदे -२०२०च्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मध्यस्थी करण्यासाठी नम्र  विनंती केली आहे आपल्या पत्रात किशोर तिवारी म्हटले आहे की ,

QUOTE

=================================================================

संदर्भ -२०२० /RSS /१७१६/                                                                                  दिनांक -९ जानेवारी २०२१

प्रति ,

 डॉ.मोहनजी भागवत,

परमपुज्य सरसंघचालक ,

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 

 संघ मुख्यालय ,महाल ,नागपुर 

संदर्भ - कृषी सुधारणा कायदे -२०२० च्याबाबत संघ परिवारातील " भारतीय किसान संघाची " भुमिका 

विषय -कृषी सुधारणा कायदे -२०२०च्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मध्यस्थी करण्यासाठी नम्र  निवेदन . 

सादर प्रणाम ,

मागील ४५ दिवसापासुन भारत सरकारच्या कृषी सुधारणा कायदे -२०२०  भारताच्या अन्न उत्पादन करणाऱ्या पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश येथील शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु आहे .केंद्र सरकारचे मंत्री अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या सुमारे ४० संघटनांशी नऊ वेळा चर्चा करूनही तोडगा निघत नसुन आता सरकार व शेतकरी संघटना आपल्या संघर्षाच्या भूमिकेत आल्या आहेत मागील ४५ दिवसापासुन भारताचे सन्मानीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी संघटना सोबत सरळ चर्चा केली नसुन मात्र हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असून त्यांचे उत्पन २०२२ पर्यंत दुपट्ट करणारे असा  दावा आपल्या मनकी  बात मध्ये केला आहे मात्र संघ परिवारातील " भारतीय किसान संघाची " भुमिका या कृषीसुधारणेच्या एकदम भिन्न आहे व त्यांनी सुद्धा राष्ट्रीय स्तरावर याचा विरोध केला त्यामुळेच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका महत्वाची झाली आहे . 

 मी महाराष्ट्राच्या शेतकरी मिशनचा सध्या अध्यक्ष आहे व मी वारंवार आपणास पत्र लिहुन अनेक विषयावर आपले लक्ष वेधन्याचा प्रयन्त केला मात्र हा सारा प्रपंच माध्यमांचा चर्चेचा व भाजप प्रवक्त्यांचा टिकेपुरता मर्यादीत राहीला मात्र मागील महीन्यात  संघाचे माजी प्रवक्ते, ज्येष्ठ विचारवंत माधव गोविंद तथा बाबूराव वैद्य याच्या निधनावेळी आपली भेट झाली असतांना आपणास चर्चेची वेळ मागीतली व आपणही निवांत चर्चेचे आश्वासन दिले मात्र अजुनही निरोप आला नसल्याने हे पत्र लिहीत आहे . 

कृषी हा भारताच्या शाश्वत संस्कृतीचा आहे आणी या आपल्या सनातन कृषीसंकृतीवर हा एकदा संकट आले आहे जर शेतकरी असेच संपविले जातील तर लवकरच ही आपली  कृषीसंकृती संपणार हा संघ परिवारातील " भारतीय किसान संघाची " भुमिका महत्वाची आहे . संघ परिवारातील कृषी क्षेत्रातील लोकांशी पंतप्रधान साधी चर्चा नाही त्यांचे आक्षेप ऐकुन घेत नाहीत अशा परिस्थितीमध्ये ज्या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना हे देशद्रोही राजकीय भ्रमित चीन व पाकीस्थान हस्तक असल्याचे म्हणत असताना आता आपल्या मध्यस्थीची गरज निर्माण झाली आहे कारण आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मौन इतिहास माफ करणार नाही या करीता विनविनी . 

आपला नम्र 

किशोर तिवारी

 सेल: +919422108846

 ईमेल: kishortiwari@gmail.com

 नागपूर.

====================================================

UNQUOTE

-------

आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर आपले मौन तोडतात का यावर सर्वांचे लक्ष लागले आहे 

---------------------------------------------------------------

1 comment:

  1. संघाने आजपर्यंत कधीही सामाजिक महत्त्वाच्या विषयावर भूमिका घेतल्याचे माझ्या स्मरणात नाही. शेती आणि शेतकरी हा विषय तर फार दूर.दुसरे असे की, या प्रश्नात मध्यस्थी करण्याची संघाची इच्छा होणेही अशक्य. त्यांचे सारे जीवन सत्तेच्या भरवशावर चालते. सरकारने त्यांना झेड सेक्युरिटी देऊन ठेवली आहे.आपण पत्र लिहिले हे ठीक आहे. पण फारशी अपेक्षा ठेवू नका.
    - शशिकांत ओहळे, अमरावती.

    ReplyDelete