Monday, January 10, 2022

स्व. डॉ. बद्रीदासजी टावरी यांचे प्रथम पुण्यतिथी निमित्त मोफत भव्य चिकित्सा शिबिर व लसीकरण व कोरोनाच्या तिसऱ्या लाटे बाबत जनजागृती ला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद- श्रीमती कमलाबाई ब. टावरी बहुउद्देशीय शिक्षण संस्था नागपूर चे आयोजन.

स्व. डॉ. बद्रीदासजी टावरी यांचे प्रथम पुण्यतिथी निमित्त मोफत भव्य चिकित्सा शिबिर व लसीकरण व कोरोनाच्या तिसऱ्या लाटे बाबत जनजागृती ला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद- श्रीमती कमलाबाई ब. टावरी बहुउद्देशीय शिक्षण संस्था नागपूर चे आयोजन

दि. ११ जानेवारी २०२२

दि. ०९ जानेवारी २०२२ रोजी घुईखेड येथे श्रीमती कमलाबाई ब. टावरी बहुउद्देशीय शिक्षण संस्था नागपूर यांचे आयोजन व ग्राम पंचायत घुईखेड, टिटवा, मांजरखेड दानापूर, निमगव्हान, जावरा, सातेफळ, पिंपळखुटा, कोपरा, येरड, सावंगा बु. जवळा, धोत्रा यांचे सहयोगाने श्रीमती कमलाबाई ब.टावरी इंग्लिश स्कूल घुईखेड येथे निशुल्क चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. 
स्व. डॉक्टर बद्रीदासजी टावरी यांनी यांनी घुईखेड व लगतच्या सर्व गावांचा आरोग्याची समस्या दूर होण्याचा माणस,त्यांची अविरत चालणारी समाजकार्य संकल्पना पूढे नेण्याचा उद्देशाने संस्था प्रमुख श्री कृष्णकुमारजी टावरी यांनी पुढाकार घेऊन या शिबिराचे नियोजन केले. 
श्रीमती कमलाबाई ब.टावरी बहू उद्देशीय शिक्षण संस्था नागपूर गेल्या 25 वर्षा पासुन समाज सेवेच्या माध्यमातून आज पर्यंत विविध कार्य पूर्ण करीत आलेले आहे. संस्थे ने आज पावेतो गावातील तसेच गावालगत असलेल्या खेडे गावातील तरुण- तरुणींना स्वयं रोजगार उपलब्ध व्हावा म्हणुन मोफत शिवणकला केंद्र, मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र, नोकरी विषयक मेळावा, निशुल्क डोळे तपासणी, भव्य स्त्री रोग निदान शिबीर, एक लाख वृक्ष लागवड, तसेच 2021 मध्ये कोरोना 19 संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भाव मुळे दुर्बल घटकातील नागरिकांना संस्थेने आयोजित समाजाचे देणे या कार्यक्रमा मध्ये  177 कुटुंब प्रमुख व्यक्तींना मानधन व धान्य व किराणा किट वाटप करून उल्लेखनीय कामगिरी संस्थेने केलेली आहे. 

हीच संस्थेची कामगिरी समोर नेताना आज निशुल्क चिकित्सा शिबिराचे आयोजन मध्ये मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप, अस्थीरोग तापासनी, स्त्री रोग तपासणी, मधूमेह व उच्चदाब तपासणी, लहान बाळाची तपासणी, सामान्य आजार तपासणी, रक्त तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात सेवा देण्यासाठी तज्ञ डॉक्टर यांचे उपस्थित होते या मंध्ये
स्त्री रोग तज्ञ
डॉ भारती टावरी, नागपूर ,डॉ नरेश रावलानी, अमरावती अस्थिरोग तज्ञ,डॉ.अनिकेत पोटे, अमरावती
सामान्य रोग तज्ञ ,डॉ.नरेश राठी, नागपूर ,डॉ.सुभाष पनपालिया,चांदुर रेल्वे डोळे तपासणी डॉ. सचिन यादव, नागपूर ,रक्त दान   जीवन ज्योती रक्तपेढी,नागपूर तसेच रक्त तपासणी करीता आयोर्गय विभाग सामान्य रूग्णालय, अमरावती हे उपस्थित होते.  या शिबिरा करिता गावातील व गावालगत असलेल्या नागरिकांनी  लाभ घेतला
या शिबिरा मध्ये प्रामुख्याने शासकीय यंत्रणेच्या  मार्गदर्शनाखाली  लसीकरण व कोरोना -19  संसर्ग जन्य रोगाचा प्रादुर्भाव तिसऱ्या लाटे विषयी जनजागृती करण्यात आली यावेळी श्रीमती कमलाबाई ब. टावरी बहू उद्देशीय शिक्षण संस्थेचे संस्थापक श्री. कृष्णकुमारजी टावरी, कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष श्री किशोर तिवारी ,  माजी आमदार श्री. अरुणभाऊ अडसर , मुख्य कार्यपालन अधिकारी (अमरावती जिल्हा ),उपसंचालक आरोग्य (अकोला ),जिल्हा आरोग्य अधिकारी (अमरावती ), जिल्हा शल्य चिकित्सक (अमरावती ), जिल्हाधिकारी अमरावती , मुख्य कार्यपालन अधिकारी (अमरावती जिल्हा ) हजर होते तर कार्यक्रमाचे व्यवस्थापन  श्रीमती कमलाबाई ब.टावरी बहू उद्देशीय शिक्षण संस्थेचे सचिव श्री निलेशजी राठी, शाळा व्यवस्थापक रुपेश भोयर यांचे मार्फत करण्यात आले. 
ग्राम पंचायच्या सहयोगाने हे शिबिर पार पडले या करिता सौ.वर्षालता हेमंत जाधव , सरपंच ग्राम पंचायत घुईखेड, सौ. काजलताई वानखेडे ,सरपंच ग्राम पंचायत टिटवा, श्री. मिलिंद गुजरकार,सरपंच ग्राम पंचायत जावरा, सौ.प्रतिभाताई कुंभालकर,सरपंच ग्राम पंचायत निमगव्हाण, श्री. श्रीकांत घोंगडे,सरपंच ग्राम पंचायत पिंपळखुंटा, श्री.आदीमुनी बेडले,सरपंच ग्राम पंचायत जवळा, श्री अरुणजी गंधे, श्री. मोहड,सरपंच ग्राम पंचायत, मांजरखेड दानापूर, श्री प्रशांत देशमुख,सरपंच ग्राम पंचायत येरड तसेच घुईखेड येथील प्राथमीक आरोग्य केंद्र येथील डॉ. मुंडे, सौ. डॉ. प्रियंका निकोसे व कर्मचारी यांनी सहकार्य केले. यावेळी माजी पंचायत समिती सभापती डॉ. हेमंत जाधव, श्री.अनिल वानखडे, श्री.मुरलीधर मुंधडा, श्री. रवींद्र जैन, श्री, प्रशांत दाऊतपुरे, सचिन गुलहाने, अफसर खान पठाण, अमोल बेंद्रे, अमोल खंडारे, शेखर कडुकर, त्रैलोक्य टावरी, श्याम कुमार टावरी हजर होते, कार्यक्रमाचे यशस्वी होणे करिता श्रीमती कमलाबाई ब. टावरी इंग्लिश स्कूल घुईखेड येथील सर्व कर्मचारी व संस्थेचे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले.
================================================

No comments:

Post a Comment