Saturday, January 8, 2022

शेतकरी मिशन अध्यक्ष किशोर तिवारी यवतमाळ येथील महीला पोलीस स्टेशन लोहारा येथे ९ जानेवारीला भेट देणार

शेतकरी मिशन अध्यक्ष किशोर तिवारी यवतमाळ येथील महीला पोलीस स्टेशन लोहारा येथे ९ जानेवारीला भेट देणार 

दिनांक ८ जानेवारी २०२२

यवतमाळ येथे  जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी लोहारा पोलीस स्टेशनची संपूर्ण जबाबदारी महिला कर्मचाऱ्यांना दिल्याची महाराष्ट्र सरकारने दाखल घेतली असुन कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशन अध्यक्ष किशोर तिवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या सूचनेनुसार ९ जानेवारी दुपारी ४ वाजता लोहार पोलीस स्टेशनला भेट देऊन  पोलीस निरीक्षक दीपमाला भेंडे सह पोलीस शिपाई ते वाहन चालक, बिट अंमलदार, पोलीस निरीक्षक सर्वांशी चर्चा करणार आहे . 

 महिला सक्षमीकरण याबाबत अनेकदा बोललं जातं, मात्र यवतमाळच्या पोलीस दलाने प्रत्यक्ष कृती करून एका पोलिस स्टेशनचे सर्व कामकाज महिलांच्या हाती देऊन नव्या पर्वाची सुरवात केली आहे. यवतमाळच्या लोहारा पोलीस स्टेशनमध्ये नव्या बदलाची सुरुवात झाली आहे. येथे पोलीस शिपाई ते वाहन चालक, बिट अंमलदार, पोलीस निरीक्षक अशी सर्वच महत्त्वाचे जबाबदारी आता लोहारा पोलीस स्टेशनच्या महिला अधिकारी कर्मचारी सक्षमपणे सांभाळत असून यामुळे यवतमाळ पोलीस दलात नव्या इतिहासाला सुरुवात झाली आहे याची दखल सुद्धा सरकारने घेतली आहे . 

सन २०१५ साली स्थापन झालेल्या लोहारा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील परिसरात साधारण ६० हजार लोकसंख्या आहे. या सर्वांसाठी लोहारा पोलीस ठाण्यात महिला आणि पुरुष मिळून साधारण ५० कर्मचारी कार्यरत होते. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी लोहारा पोलीस स्टेशनची संपूर्ण जबाबदारी महिला कर्मचाऱ्यांना दिल्याने महिला कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे व पुरुषांपेक्षाही जास्त चांगले काम करून दाखविण्यासाठी या सर्व  महिला कर्मचाऱ्यांनी संपूर्ण स्वातंत्र व सवलती सरकार देणार असल्याची माहीती किशोर तिवारी यावेळी दिली कारण पोलीस स्टेशनमध्ये सर्वच ही जबाबदारी सांभाळणे आव्हानात्मक आहे मात्र  आता आम्ही बिट मध्ये जाऊन तपास करू शकतो हा विश्वास महिला पोलिसांनी मत व्यक्त केले व त्याना  प्रोत्साहन मिळेल यासाठीच हि भेट आहे . 
बाभुळगाव ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करणार 
कोरोनाची तिसरी लाट  व त्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या व राज्य सरकार दिलेल्या सुचणे प्रमाणे केलेल्या तयारीचा प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी  कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशन अध्यक्ष किशोर तिवारी बाभुळगाव ग्रामीण रुग्णालयाला भेट देणार असुन त्यांच्या सोबत उपसंचालक आरोग्य अकोला व शल्य चिकित्सक यवतमाळ यांनी सुद्धा उपस्थित रहावे अशी सूचना दिल्या आहेत मात्र मस्तवाल अधिकारी दांडी मारण्याच्या सवयीमुळे येतात काय पहावेच लागेल . 
===============================================================

No comments:

Post a Comment