Monday, January 24, 2022

टिपेश्वर अभयारण्यातील पर्यटन सुरु करा किशोर तिवारी यांचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंना यांना साकडे

टिपेश्वर अभयारण्यातील पर्यटन सुरु करा  किशोर तिवारी  यांचे  पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंना यांना साकडे

दिनांक-२४ जानेवारी २०२२


सध्या  शाळा, महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात अटी शर्ती ठेऊन टिपेश्वर अभयारण्यातील पर्यटन यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो जिप्सी चालक, कर्मचारी  तसेच गाईड यांची होत असलेली उपासमारी टाळण्यासाठी त्वरीत सुरु करावी अशी  आग्रही मागणी शेती स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंना यांना केली आहे जर  मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकातील व्याघ्र प्रकल्प सुरु असताना ताडोबा पर्यटकांसाठी बंद का ? स्थानिक जिप्सी चालकांच्या रोजगाराचं काय ? असा सवाल किशोर तिवारी  यांनी सरकारला केलाय यापुर्वी अभयारण्यातील पर्यटन सुरु करण्यासाठी खासदार बाळू धानोकरांबरोबरच शिवसेने आमदार अंबादास दानवे यांनीही पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंना पत्र लिहिलं आहे आता शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी  पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्था बिघडू नये म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळं खुले करण्याची मागणी  या पत्रातून केली आहे व सनदी अधीकारी जर या आठवड्यात तोडगा काढुन टिपेश्वर अभयारण्यातील पर्यटन सुरु न केल्यास टिपेश्वर मेन गेट वरून अभयारण्यात प्रवेश करून सनदशील मार्गाने सत्त्याग्रह करण्याची घोषणा किशोर तिवारी यांनी केली आहे . 

मागील दोन वर्षापासून यवतमाळ जिल्ह्यातील या भागातील आर्थीक स्थिती जेमतेम झाली असुन शेकडो शेतकरी आत्महत्या करीत आहेत आता त्यामध्ये  टिपेश्वर अभयारण्यातील पर्यटन यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो जिप्सी चालक, कर्मचारी  तसेच गाईड यांच्यावर हीच पाळी आहे यावर प्रशासन बघ्याच्या भुमिकेत असुन वातानुकुल कक्षात बसुन कोरोना महामारीचे नियंत्रण करीत आहेत  ज्यावेळी समाजाच्या दबावाला   शाळा, महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतल्या जातो त्याचवेळी  राज्यात अटी शर्ती ठेऊन टिपेश्वर अभयारण्यातील पर्यटन यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो जिप्सी चालक, कर्मचारी  तसेच गाईड यांची होत असलेली उपासमारी टाळण्यासाठी का पाऊले उचलत नाहीत असा सवाल  किशोर तिवारी यांनी सरकारला केला आहे . 

मागील आठवड्यात टिपेश्वर अभयारण्यातील पर्यटन सुरु करण्याच्या मागणीसाठी आज जिप्सी चालक तसेच गाईड यांनी शेती स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष किशोर तिवारी यांना निवेदन देऊन टिपेश्वरचे पर्यटन सुरु करण्याची मागणी केली होती . गेल्या दोन वर्षापासून टिपेश्वर चे अभयारण्य बंद, चालु करण्यात येत असल्यामुळे जिप्सी चालक तसेच गाईड्स यांच्या वर उपासमारीची पाळी आली  आहे. विशेष येथे कार्यरत सर्वच जिप्सी चालक तसेच गाईड्सने कोरोना लसीचे दोन डोज घेतले आहे. वास्तविक पाहता गावात सर्वच ठिकाणी मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. टिपेश्वर अभयारण्यात मात्र बाहेरच्या गर्दीच्या तुलनेत मोजकेच नागरीक पर्यटनासाठी येत असतात. असे असतांना पुन्हा येथील पर्यटन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे येथील जीप्सी चालक तसेच गाईड्सवर उपासमारीची पाळी आली आहे. याव्यतिरीक्त परीसरातील हॉटेल सुध्दा ग्राहक नसल्याने अडचणीत आले आहे. यासंदर्भात आज जीप्सी चालक तसेच गाईड यांनी किशोर तिवारी यांची भेट घेऊन त्यांचेकडे सरकारकडे पाठपुरावा करुन टिपेश्वर अभयारण्य सुरु करण्याची मागणी केली होती यावेळीप्रविन बोलकुंटवार, सतिष जिडेवार, मंगेश मैदपवार, सलमान खान, जावेद शेख, नरेंद्र गेडाम, चंद्रकांत मडावी, संदिप मेश्राम, अश्विन बाक्कमवार, साहील शेख, रिजवान शेख, सुरज सिडाम, सागर यंबडवार, गजानन बुरेवार, गजानन जिइडेवार, पवन चितकुंटलावार, श्रीकांत गड्डमवार, शंकर मरसकोल्हे, महेंद्र आत्राम, राजु मरसकोल्हे, त्रिशुल तोडारनाम, सागर मडावी, क्रिष्णा आडे, बजरंग कुडमेथे, नागेश्वर मेश्राम, मुजुर शेख, शाहरुख खान, रमेश गंगशेटीवार, सुहास शिरपुरकर, इरफान शेख अमोल मडावी उपस्थित होते. 

=========================================================================

No comments:

Post a Comment