Wednesday, September 7, 2022

विदर्भात मागील तीन दिवसात आणखी ७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या-कीशोर तिवारी १३ सप्टेंबरला राज्यपाल,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार

विदर्भात मागील तीन दिवसात आणखी ७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या-कीशोर तिवारी १३ सप्टेंबरला राज्यपाल,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार 

दिनांक ११ सप्टेंबर २०२२

एकीकडे महाराष्ट्र सरकारने नापीकी पुरबुडी मुळे झालेल्या नुकसानीची वाढीव मोबदला दिला असुन आता मुख्यमंत्री किसान योजनेची घोषणा सुद्धा केली आहे मात्र विदर्भातील शेतकऱ्यांच्या अडचणीत कमी होत नसुन मागील तीन दिवसात ज्या 
 सात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची  दुर्देवी घटना समोर आल्या आहेत त्यांची नावे अशी  
 १. सुधिर गोलर रा.पांढरकवडा ता.मारेगाव जिल्हा .यवतमाळ 
२. रतनलाल धूर्वे रा.नारदू ता.धारनी जिल्हा अमरावती 
३. प्रविण मोरे रा.लोणबहेळ ता.आर्णी जिल्हा .यवतमाळ 
४.गुणवंत मडावी रा. अंबोडा ता.देवळी जिल्हा . वर्धा 
५. रोशन माहेकर रा.महादेवपुरा ता.जिल्हा अमरावती
६.सोविंदा राऊत रा.नवेगाव बांध ता. जिल्हा गोंदिया
७.मारोती नाहगमकर रा.घोसरी ता.पोंभूर्णा जिल्हा चंद्रपूर

 असुन विदर्भात यावर्षी १०६० शेतकऱ्यांच्या तर मागील १३ दिवसात २६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुर्देवी घटना समोर आल्या असुन यामध्ये मागील सात  दिवसात १४ आत्महत्या समोर आल्या असुन तसेच एकट्या यवतमाळ जिल्ह्याचा मारेगाव तालुक्यात ८ शतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत त्यांची यादीच विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी  सरकारला सादर केली आहे. 

पश्चिम विदर्भाचे शेतकरी  आत्महत्यांचे लोण पुर्व विदर्भाच्या धान पट्ट्यात पोहचले -सत्तारूढ व विरोधक लोक प्रतिनिधींनी शेतकरी आत्महत्यांच्या गंभीर प्रश्न्नावर पाठ फिरविली 

पश्चिम विदर्भातील कॊरडवाहू कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत आता पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकरीही मोठ्या प्रमाणात  आत्महत्या करीत आहेत ,काँग्रेस राज्य असतांना शेतकरी आत्महत्यांचा बाजार करणारे भाजपचे नेते व भाजपाचे सरकार असतांना सरकारवर आसुड ओढणारे नेते सध्या या आत्महत्यांवर मौन धारण करून आहेत मात्र मागील पाच वर्षात  दोन वेळा विक्रमी कर्जमाफी ,प्रत्येक वर्षी देण्यात यावरी  नुकसान भरपाई ,पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना ,पंतप्रधान सिचन योजना ,पंतप्रधान पीक विमा योजना ,वीज सवलत ,अन्न सुरक्षा ,आरोग्य सुरक्षा ,शिक्षण सवलत या सर्व योजना असतांना मोठ्या प्रमाणात शेतकरी व शेतकऱ्यांच्या पाठोपाठ आता त्यांचे कुटुंबीय सुद्धा आत्महत्या करीत आहेत,ग्रामीण विदर्भ तसेच मराठवाड्यात काय बिघडले आहे यावर सरकार व प्रशासकीय स्तरावर कोणतीही चर्चा व उपाययोजना होत नाही समस्यांचे जाण नसणारे सनदी अधिकारी वातानुकूल खोलीत बसुन फुकट वाटप योजना ,कागदावर माफी सवलती घोषीत करून मूळ प्रश्न बाजूला ठेवत असल्यामुळे निरपराथ शेतकऱ्यांचे बळी पडत आहेत असा किशोर तिवारी यांनी केला आहे . सद्या शेतकऱ्यांच्या पाठोपाठ आता त्यांचे कुटुंबीय सुद्धा आत्महत्या करीत आहेत सततची नापीकी, निसर्गाचा प्रकोप ,लागवडी खर्चात तसेच घरगुती ,आरोग्य,शिक्षण ,वीजबिल यामध्ये झालेली प्रचंड वाढ त्याच बरोबर उत्पादनात आलेली प्रचंड घट , वारंवार दीलेल्या कर्जमाफीमुळे वंचित शेतकऱ्यांच्या होत असलेल्या यातना ,अपुरे पीककर्ज ,मायक्रोफायनान्स कंपन्यांची राजरोसपणे चाललेली लुट यामुळे ग्रामीण विदर्भात जगणे कठीण झाले आहे .राज्यांतील सध्याच्या महामारीचा तसेच राजकीय परिस्थितीचा फायदा सर्व स्तरावरील अधिकारी घेत असुन कधी उदासीनतेनी कळस गाठला असल्याचे चित्र आहे .येत्या १३ सप्टेंबरला राज्यपाल ,मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन एकदा मारेगाव तालुक्यात भेट देण्याची विनंती करणार असल्याची माहिती किशोर तिवारी यांनी दिली 

महाराष्ट्राला  शेतकरी आत्महत्या मुक्त करण्यासाठी मुळ प्रश्न्नावर तोडगा काढण्याचे आवाहन 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या मुक्त करणार अशी घोषणा केली आहे तसेच वाढीव मोबदल ,मुख्यमंत्री शेतकरी सन्मान योजना घोषीत केल्यामुळे त्यांना विदर्भ मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या विषयी चिंता दिसली याचे स्वागत  किशोर तिवारी यांनी केले मात्र कृषी समस्यांचे मूळ कारण यामध्ये 
१.लागवडीचा खर्च ,शेतीमालाचा भाव ,जमीन व पाण्याचे पुनर्जीवन ,उत्पादकता .बियांचे स्वातंत्र्य 
२.पीक पद्धती व अन्न ,डाळी ,तेलबीया या पिकांचे नगदी पिकांच्या ठिकाणी नियोजन व त्यासाठी अनुदान 
३.सहज मुबलक पतपुरवठा धोरण ,सिबिल व आरबीआय चे शेतकरी विरोधी धोरण   
४. नुकसान भरपाई शेतकरी यांना वाचविणारी पीकविमा योजना 
५. प्रशासकीय ,राजकीय ,सामाजिक भ्रष्टाचाराचे ग्रामीण भागातून निर्मुलन 
काम सुरु करावे अशी मागणी किशोर तिवारी केली असुन जोपर्यन्त लागवडी खर्च कमी होत नाही ,नवीन विकसित तंत्र ,जमिनीचे आरोग्य ,पाण्याचे नियोजन व त्याचे आरोग्य दुरुस्त होत नाही तोपर्यंत उत्पादकता वाढणार नाही त्यावर सर्वात पहिले काम करण्याचे शेतकरी मिशनने सुचविले आहे .पीक पद्धती व अन्न ,डाळी ,तेलबीया या पिकांचे नगदी पिकाच्या ठिकाणी नियोजन व त्यासाठी अनुदान यावर तात्काळ निर्णय घेण्याची मागणी करीत सहज मुबलक पंचवार्षिक पतपुरवडा देणारे  धोरण  तसेच सततची नापीकी पुरबुडी दुष्काळ यासाठी नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांच्या हिताची असणे गरजेचे झाले आहे यावर सुधारणा करून शेतकऱ्यांचे प्राण वाचवणारी पीक विमा योजनातात्काळ लागू करण्याची सूचना  केली आहे . 
सध्या सुरु असलेला अनियंत्रित प्रशासकीय ,राजकीय ,सामाजिक भ्रष्टाचारामुळे ग्रामीण विदर्भातील आर्थिक ,मानसिक ,शारीरिक ,अध्यात्मिक ,सामाजिक आरोग्य पूर्णपणे बिघडले असुन गावापासून दिल्ली -मुंबई पर्यंत लोकप्रतिनिधी व सर्वच स्तराचे अधिकारी -कर्मचारी सरकारी पैशाची लूट करत आहेत त्यामुळे आर्थिक ,मानसिक ,शारीरिक ,आध्यत्मिक ,सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत जर यावर तात्काळ नियंत्रण झाले नाही तर आज आत्महत्या करणारे युवा शेतकरी ग्रामीण जनता या तिजोरीच्या लुटीच्या भागीदारांचे मुडदे पाडतील असा इशारा किशोर तिवारी यांनी  दिला आहे . 
===============================================================

No comments:

Post a Comment