Sunday, May 3, 2020

मले कोरोना झाला नव्हता माझा अंतिम संस्कार करा-मयत धर्मा माधव कुरवते याची यवतमाळच्या शवगृहातून समाजाला विनंती

मले  कोरोना झाला नव्हता माझा अंतिम संस्कार करा-मयत धर्मा माधव कुरवते याची यवतमाळच्या शवगृहातून समाजाला विनंती
दिनांक -४ मे २०२०
भारत सरकारच्या जात धर्म वस्ती पाहून कोरोनाची टेस्ट करणाऱ्या मिशनने पॉसिटीव्ह कोरोनाग्रस्त   जास्त
 दाखविल्यामुळे  रेडझोनमध्ये आलेल्या  यवतमाळ जिल्ह्यातील  केळापूर तालुक्यात ज्या ठिकाणी एकही कोरोनाची पॉसिटीव्ह केस नाही तेथील ताडउमरी  आदीवासी युवक धर्मा माधव कुरवते याची प्रकृती सध्या सरकारने आपली सरकारी दारूची दुकाने बंद केल्यामुळे अवैद्य विषारी दारूचा महापूर सध्या अबकारी व पोलीस विभागामार्फत आला आहे कारण  अबकारी व पोलीस विभागाला याशिवाय पैशे खाण्याचा कोणताही मार्ग शिल्लक राहीला नसल्यामुळे झुंझार येथे हीच अवैद्य दारू जास्त डोसल्यामुळे आजारी पडला त्याला पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात सहा दिवसापुर्वी आणण्यात आले मात्र आपल्या नेहमीच्या सवयी प्रमाणे त्याला यवतमाळच्या शासकीय कै व . ना . महाविद्यालयात रेफर करण्यात आले मात्र त्याच्यावर कोणताही इलाज न करता व त्याची पूवीचा दारू पिण्याचा इतिहास न बघता यवतमाळ येथे खाजगी बाहेर मोठे डॉक्टर ते या ठिकाणी फुकटचा पगार घेतात त्यांनी न पाहताच याचे सॅम्पल कोरोनासाठी घ्या व पाठवा ज्योत[ जोपर्यंत रीपोर्ट येत नाही तोपर्यंत विलगीकरणाचा वॉर्ड मध्ये कोरोना ग्रस्तांचा सोबत ठेवा असा आदेश दिला मात्र सर्व कोरोनाग्रस्तांमध्ये त्याचा एकाच दिवसात उपचाराविना मृत्यु झाला मात्र त्याचे शव जोपर्यंत रीपोर्ट येणार नाही तोपर्यन्त देता येणार नाही असा निरोप धर्माच्या बापाला देण्यात आला व शव बांधुन वेगळा ठेवण्यात आला व मग  प्रशासन व   सध्या गल्ली गल्लीत फिरत असलेले कोरोना योद्धा कामाला लागले .मयत धर्माचा कोरोना मिशनचा वादग्रस्त रीपोर्ट येण्यापुर्वी धर्मा व त्याचा बाप माधव मागील दहा दिवसात कोणा कोणा भेटले याचा शोध सुरु झाला व या सगळ्यांना नव्याने लाखो रुपये खर्च करून ४०० खाटाच्या खोल्यामध्ये ठेवण्याची तयारी सुरु झाली .  पांढरकवडा परिसरातले सगळे कोरोना योद्धा ज्यांना ज्यांना विलगीकरणामध्ये राहावयाचे त्यांना आपआपल्यापरीने  कोरोनाची भीती दाखविण्यात गुंतले या दरम्यान दररोज रीपोर्ट आला का माझ्या मुलाचा शव द्या अशी विनंती घेऊन माधव कुरवते यवतमाळला १५०० रुपये कर्ज काढून ऑटो लावून गेला मात्र त्याला सतत दोन दिवस गेला व रीपोर्ट आला नाही असे सांगुन परत पाठवून देण्यात आले . या दरम्यान पांढरकवडा येथे ४०० खाटाच्या व्यवस्थेत कमीत कमीत ४०० तरी आना असा व ठेवा असा आग्रह वजा दबाब वरून सुरु झाल्याने ४०० लोकांची जबरीने ओळख करून आपआपल्या बॅग भरून तयार राहण्याचा निरोप देण्यात आला मात्र मिशनचा कोरोना रीपोर्ट मयताचे एका धर्माच्या लोकांचे नसल्यामुळे निगेटिव्ह पाठविण्यात आला मात्र या दरम्यान पोटभरू कोरोनायोद्धांनी या ४०० लोकांना झोपु दिले नाही मग ज्या गावात सरकारी दारूची दुकाने बंद केल्यामुळे अवैद्य विषारी दारू धर्मा डोसली होती तिथल्या लोकांना तसेच त्याचा गावाच्या ताड उमरी येथील जनतेला पांढरकवड्याचा एका झोलाजाप आयुवेदिक डॉक्टरने मयत निगेटिव्ह असला तरी चार दिवस त्याचे शव  तेथे ठेवल्यामुळे पॉसिटीव्ह झाली असेल व गावात अंतिम संस्कार करणे घातक असल्याचा सल्ला दीला व लगेच ताडउमरी गावाकरण्यांनी पोलीस पाटील सरपंच यांच्या मार्फत कळविले की आम्ही आदीवासी धर्मा कुरवते   याचे शव गावात येऊ देणार नाही व तशी सूचना माधव कुरवते याना दिली मी पहिलेच दोन वेळा पैसे लाऊन यवतमाळला जाऊन आलो आता सरकारनेच काय ते करावे असे तहसीलदाराला सांगितले कोरोना योद्धा या तहसीलदाराने मेडीकल कॉलेजच्या डिनला तात्काळ कळविलें मात्र मला कोरोना झाला नव्हता मी अवैद्य विषारी दारू पिल्याने मेल्याचे आपल्या शवातून समाजाला सांगत होता आता तो मेडीकल कॉलेजच्या शवागृहात माझी हाक कोण ऐकते याची वाट पाहत आहे ,
असाच प्रकार एका हार्ट फेल होऊन मरण पावलेल्या जरंग येथे भाऊ व वागदा बंजारा तांड्यावर राहणाऱ्या मुंबईत हून आलेल्या युवकाच्या शवाला गावकऱ्यांनी नाकारलेमुळे शेवटी  पोलिसांनी  अंतिम संस्कार यवतमाळला केले व अख्या जगात हे प्रकरण गाजले तेंव्हा भारत सरकारने जागतिक  आरोग्य संघटनेचा म्हणजे

डब्ल्यूएचओचा हवाला देत  जो कोरोना बाधीत मानवाचा शव हेमोरॅजिक फिव्हर (जसे की इबोला, मार्बर्ग) आणि कॉलरा वगळता मृतदेह सामान्यत: संसर्गजन्य नसतो शवविच्छेदन करताना अयोग्यरित्या हाताळल्यान्यास सूचनांचे पालन केल्यास त्या शवामधून  कोरोना सारख्या साथीच्या इतर रोगाचा प्रसार होत नाही  म्हणून ज्यांना संसर्गजन्य रोगाने मृत्यू झाला आहे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जावेत,कारण जगात कोविड -१९ पासून मेलेल्या व्यक्तींच्या मृतदेहाच्या संसर्गामुळे एखाद्या व्यक्तीस लागण झाल्याचा पुरावा नाही.तसेच  शवगृहात स्थानांतरित होण्यापूर्वी शरीराचे निर्जंतुकीकरण करण्याची आवश्यकता नाही. कोविड -१९ पासून मरण पावलेल्या लोकांचे दफन किंवा अंत्यसंस्कार केले जाऊ शकतात.असे डब्ल्यूएचओने असेही नमूद केले आहे असा आदेश दिला असतांना कवडीची माहीती नसणाऱ्या फक्त पैसे खाण्यात गुंतलेल्या मेडीकल कॉलेजच्या दिन सांगा अशी ओरड धर्माची आत्मा करीत आहे मात्र आदीवासी सेवक आदीवासी मंत्री आमदार धर्माच्या आत्म्याचा आवाज ऐका अशी विनंती अख्या यवतमाळमध्ये लोकांना मागील चार दिवसापासून ऐकू येत आहे मात्र सर्व आदिवासी सेवक घरात कोरोटाईन झाल्यामुळे कसे ऐकणार कारण राजा आंधळा झाला आहे तर प्रशासनाने डोळ्याला पट्टी बांधली आहे कोणीही जास्त बोललं तर पोलीसवाले दंडे मारतील बरे



========================================================================================================== 

No comments:

Post a Comment