भाजपाचे महाविकास सरकार आधाडी विरोधी अपयश आंदोलन थोतांड - किशोर तिवारी
दिनांक -२२ मे २०२०
प्रेसनोट साठी या लिंकवर क्लीक करा
======================
=====================
व्हिडिओ साठी या लिंकवर क्लीक करा
====================
====================
अख्खा भारत व महाराष्ट्र कोरोना या महामारीशी लढत असतांना घरात लपलेले भाजपनेते एकदम केंद्राचे शून्य नियोजनामुळे आलेल्या आर्थिक संकटाचे खापर चक्कमहाराष्ट्र सरकारवर फोडून उध्दव ठाकरे मागील दोन महीने हातावर हात ठेऊन बसले असल्याचा आरोप करीत आज सुरु केलेले "महाराष्ट्र बचाव " आंदोलन व महाराष्ट्राचे नैरायग्रस्त विरोधी नेते यांनी केलेलं आरोप बिनबुडाचे "'जे खोटे बोला दाबून बोला "या मोदींच्या वाक्याचे पालन करणारा असुन या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी उभे राहण्याचा राष्ट्रीय सोडून केंद्राचे पॅकेज रोखण्याचे व कसेतरी भाजपचे सरकार राज्यात आणण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप शेतकरी व आदिवासी नेते किशोर तिवारी यांनी केला आहे .
भाजप हा नेहमीच भांडवलदारांचा पक्ष म्हणुन ओळख असणारा जातीयवादी लोकांचा पक्ष आहे. शेतकरी गरीब आणि आदीवासी यांच्यावर पुतण्या मावशीचे प्रेम करणारा मुठभर दांभीक लोकांचा वादग्रस्त समुह असल्याचा अनुभव नेहमी सामान्य जनतेला येतो. मात्र काही वाट चुकलेले स्वार्थी आदीवासी दलीत व बहुजन समाजाचे पोटभरू नेते त्यांची चाकरी करण्यात गुंतले असुन आपले नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ओरडून ओरडून खोटे बोलण्याच्या पद्धतीने ज्या मागण्या केंद्राच्या अधिकारात येतात. त्या मागण्या राज्य सरकारला असल्याचा टोमणा किशोर तिवारी यांनी मारला आहे .
सध्या कोरोना आला असा ओरड करीत वातानुकूल शयनकक्षात मागील दोन महिन्यापासून भाजप नेते झोप काढत आहेत. घरामधील दारूचा खोका रिकामा झाला तर आढावा बैठकीचा दौरा काढुन बंद असलेले दारूचे वा बिअर बार उघडुन पोलिसांसमोर दारूचा खोका आपल्या वातानुकूल वाहनात टाकत आहेत. मात्र तरीही दारू कमी पडत असल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन ढासळले असल्यामुळे दररोज प्रेस नोट काढुन राज्य सरकारच्या केलेल्या कामाचे आपणच केल्याचे सोंग करीत आपली पाठ आपणच धोपटून घेत आहेत. तर ज्या अत्यंत गरजेच्या शेतकरी गरीब आदिवासी यांच्या केंद्राने पूर्ण करणाऱ्या मागण्या बेशरमेने राज्य सरकारकडे करीत आहेत. असा आरोप पुराव्यासह किशोर तिवारी यांनी केला आहे .
सर्वच राज्यात केंद्र सरकार आपल्या पणन संस्थेमार्फत कापुस तूर धान गहु हरभरा मक्का विकत घेते. मात्र यावर्षी सि सि आई व नाफेडने प्रचंड अडचणी व जाचक अति लादुन खरेदी वारंवार बंद पाडली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः वारंवार हस्तक्षेप करून बंद पडलेल्या खरेद्या सुरु केल्या. मात्र यातही भाजप नेते आपल्या वातानुकूल कशात बसुन मीच केले अशा प्रेस नोट काढत आहे सध्या दररोज खरेदीच्या गाड्यांची संख्या १०० ते २०० वर नेण्याचे आदेश मुख्यमंत्रयानी दिले आहेत. FAQ कापसाचा विषय केंद्राकडे तसेच तूर हरभरा मक्का केंद्र सरकार नाफेड मार्फत शेतकऱ्यांचा झळ करीत आहे. मात्र भाजप नेते दिल्ल्लीला न बोलता इकडे राज्य सरकारला सांगत आहे हा काय मूर्खपणा आहे असाही सवाल किशोर तिवारी केला आहे .
शेतीसाठी लागणारा पीककर्जाचा पुरवडा केंद्र सरकारची आरबीआई करते. यावर्षी अफलातुन कोरोनाचे संकट आले आहे. शेतकरी उपाशी मरत असताना भारत सरकारने रामदेवबाबा, निरव मोदी, चोकशी, माल्या यांचे हजारो कोटीचे कर्ज माफ केले. तसेच आपल्या पोसणाऱ्या बळीराजाचे करावे अशी मागणी हे भाजप दांभिक नेते का करीत नाहीत असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत .
मागील पाच वर्षात भाजपच्या याच नेत्यांनी सरकारमध्ये मंत्री असतांना आदिवास्यांना खावटी दिली नाही. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खावटी द्या असा आदेश देत असतांना शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारची खावटी आपणच आपल्या घरातुन देत असल्याचा दावा करणे म्हणजे मानसिक विकारांचे लक्षण असल्याचा दावा किशोर तिवारी यांनी ठोकला आहे.
सध्या सर्व गरीबांना केंद्राने फक्त ५ किलो तांदूळ न देता तूर डाळ तेल साखर गहु चहा मीठ मिरची मसाले तिखट द्यावे त्याचबरोबर भाजप आपल्या मूठभर व्यापाऱ्यांना ४ लाख कोटीची सवलत दिली आहे. त्याच प्रमाणे देशातील शेतकऱ्यांना कमीत कमी ४ लाख कोटीचे पॅकेज द्यावे यासाठी शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादीचे खासदार सोनिया गांधी शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात करीत आहेत. मात्र भाजप राज्यातील नितीन गडकरी प्रकाश जावडेकर पीयूष गोयल सह आशिष शेलारमामा देवेंद फडणवीस शकुनी मामा चूप का याचे उत्तर घरात लपलेले भाजपचे नेते प्रेस नोट काढून निश्चित देतील असा विश्वास किशोर तिवारी यांनी व्यक्त केला आहे
=======================================================
ते खोटे आणि हा तिवारी खरा का? कशावरुन. आणि जर भाजप मुठभरांचा असता तर केंद्र आणि राज्यात एवढे लोकप्रतिनिधी निवडून आणू शकला नसता. असल्या सुमार बातम्या टाकून जनतेची दिशाभूल करु नका ही विनंती.
ReplyDelete- एक महाराष्ट्रीयन.