आधार उद्धवच्या मोहीमेला वाढता पाठींबा : मुंबईच्या रोहीत शेलाटकर यांच्या ग्रँड मराठा फॉऊंडेशन तर्फे ६०० कुटुंबाना आधार
दिनांक- २३ मे २०२०
आदिवासी बहुल यवतमाळ जिल्ह्यातील झरी केळापुर घाटंजी राळेगाव तालुक्यातील १३ हजारावर गरजू कुटूंबियांना आभा प्रकल्पाच्या वतीने 'आधार उद्धवाचा' या संकल्पनेतून जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले असुन याला मोहीमेला सुरवातीला २००० फूड किट देणारे पारसी रेल्वे कर्मचारी खुशरु पोचा नंतर अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे नागरीक सुरेश यांनी १५०० फूड किट दिल्यानंतर आता अनेक संस्था व्यापारी संघटना कर्मचारी संघटना आता समोर आले असुन मुंबईच्या कोकणात परत जाणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना आधार देणाऱ्या मागील १० वर्षापासुन विदर्भाच्या विधवांच्या कल्याणाचे प्रकल्प राबविणारे दानशुर इंग्लंडचे नागरीक रोहित शेलाटकर यांनी आपल्या ग्रँड मराठा ट्रस्ट माध्यमाने मदतीचा समोर करून ६०० कुटुंबाना फूड किट देऊन आधार दिला आहे . यापुर्वी रोहित शेलाटकर यांनी शेकडो शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाना आर्थिक मदत दिली आहे त्यांना शेतकरी विधवा संघटनेकडून विदर्भ शेतकरी मित्र हा पुरस्कार देऊन २०१० मध्ये सन्मानित करण्यात आले आहे .
रोहित शेलाटकर यांनी पानीपत हा चित्रपट निर्माण करून संपूर्ण जगाला मराठ्यांचा इतिहास दाखविला आहे .त्यांनी दक्षिणेकडुन जस असलेल्या लाखो मजुरांना अन्न देणाऱ्या गुरुद्वारा व मदत केंद्रांना भरीव नादात दिली आहे .
राज्य सध्या चौथ्या लॉक डाऊन च्या टप्प्यात आले असून कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र परिश्रम घेतांना दिसत आहे. मागील दोन महिन्यांपासून लागू असलेल्या संचारबंदी मुळे छोटे व्यवसायिक तसेच रोजमजुरदार लोकांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. हाताला काम मिळत नसल्यामुळे पोटाची गरज भागवण्यासाठी कोणाची तरी मदत मिळणार काय....? याच आशेवर अनेकजण तग धरून आहे. केळापुर तालुक्यातील कोणताही रोजमजुर, गरजू कुटूंबियांची उपासमार होणार नाही यासाठी शेतकरी स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या 'आधार उद्धवाचा' या संकल्पनेतून जवळपास १० हजार कुटूंबियांना जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले आहेत. आभा प्रकल्पाच्या संयोजिका स्मिता तिवारी, माजी नगरसेवक अंकित नैताम यांच्या विशेष नियोजनात मागील दोन महिन्यांपासून संपूर्ण पांढरकवडा शहर तसेच तालुक्यातील विविध पोडांवर राहत असलेल्या आदिवासी समाजातील गरजू कुटुंबीयांना घरपोच जाऊन जीवनावश्यक किटचे वाटप केले. याचा लाभ अंदाजे ५० हजार कुटुंबातील व्यक्तींना झाला असल्याची माहिती स्मिता तिवारी यांनी दिली. आभा प्रकल्पाच्या या समाजोपयोगी कार्यात माजी नगरसेवक अंकित नैताम, संतोष नैताम, नंदू जयस्वाल, भीमराव नैताम, मनोज चव्हाण, सुरेश तलमले, गोलू जयस्वाल, संतोष चामलवार, रामराव साळूंके, गणेश कोल्हे, सुधीर सुबूगडे, पिंटू मोरे, रवि कोरेवार, गणेश कांबळे, बाबू जैनेकर, बबलु धुर्वे, विशाल तुपट, पवन नैताम, सतिष सुबूगडे, सुजल गेडाम, आशू अंबादे, साहिल अंबादे, चंदन जैनेकर, शुभम नागपूरे, आशुतोष दोडेवार, प्रदिप कोसरे, अमन नांदेकर आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.
No comments:
Post a Comment