Wednesday, May 6, 2020

कोरोना लॉकडाऊन मध्ये आदीवासी विभागाने आदिवास्यांना वाऱ्यावर -मुख्यमंत्री आदेशाला व माजी आदिवासी मंत्र्यांसह आमदारांच्या विनंतीला केराची टोपली -किशोर तिवारी 
दिनांक -६ मे २०२०
महाराष्ट्राचे कोरोना संकटातही माझ्या दुर्गम भागाच्या आदीवासी पाड्यावर व आदीम कोलाम नाईकवाडा आंध समाजाच्या पोडावर वस्तीवर मान्सुन पुर्वी खावटी व सर्व जीवनाव्यक सर्व वस्तु घरपोच द्या असे आदेश मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी दिल्यावर त्यांचं बरोबर माजी मंत्री शिवाजीराव मोघे प्रा वसंतराव पुरके  डॉ  अशोक उईके व आमदार डॉ संदीप धुर्वे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासींचे कोरोना लॉकडाऊन होत असलेले हाल रोजमजुरी नसल्यामुळे   सरकारने फक्त ५ किलो तांदुळ वाटत असल्यामुळे तसेच हजारो आदिवासी कुटुंबाना शिधावाटप पत्रिका नसल्यामुळे उपासमार होत असलेली टाळण्याची वारंवार केली विनंती आदीवासी सचिव आदिवासी आयुक्त यांनी चक्क  केराची टोपली झाल्याचा आदिवासी चळवळीचे कार्यकर्ते शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी याना  मारेगाव तालुक्यातील रोहपट पेंढरी झारी तालुक्यातील पांढरवानी दुभाटी  लांडगी केळापुर तालुक्यातही चीकलंदरा  जिरामीरा घोनसी भाडउमरी  बोथ पहापळ  राळेगाव तालुक्यातील देवधरी खैरगाव कासार घाटंजी तालुक्यातील लिंगापोड पारवा टिटवी  वासरी तरोडा चिकलवर्धा कोलाम पोडावर भेटी दिल्यावर  आला असून अन्न वाटपाच्या प्रचंड तक्रारी येत असून आदीवासी विकास विभागाचा एकही अधीकारी त्यांची चोकशी करण्यास आला नाही तसेच प्रशासनाचे अधिकारीही भेटीच्या वेळी दिसले असे आदिवास्यांनी सांगीतले . 
पांढरकवडा येथे आई ए एस अधिकारी प्रकल्प अधिकारी म्हणुन  नियुक्त करण्यात आला आहे मात्र आजारी असल्यामुळें त्यांनी स्वतःला कोरोटाईन घेतले असल्याने सारे रान मोकळे असुन आदिवासी सचिव साधा फोनही उचलण्यास तयार नसल्याची तक्रार आमदार संदीप धुर्वे यांनी केली असे या अहवालात भेटले आहे लांडगी कोलांम पोडसह अनेक ठिकाणी फुकटचा केंद्र सरकारचा तांदुळ मिळाला नसल्याची तक्रार किशोर तिवारी यांना कोलामांनी केली तर अनेक गावात फुकट तांदुळावर ५ ते ५० रुपये कोरोना फी घेण्यात आल्याची तक्रार देण्यात आली .अनेक कोलाम पोडावर या दरम्यान कोलामांचे मृत्यु झाले मात्र त्याची माहिती घेण्यास आरोग्य वा आदिवासी विभागाचा एकही अधिकारी आला नसल्याचे सांगितल्याचे किशोर तिवारी यांनी सांगीतले .निवडणुकीच्या समाजाचा ठेका घेणारे आजी माजी लोक प्रतिनिधी या संकट समयी आले कारण  भेटीचे व सनसनाटी दौऱ्याचे फोटो प्रेस नोट दाखविल्यावर एकही नेता आला नसल्याचे सांगितल्याचे किशोर तिवारी याना आदिवासी महिलांनी कॅमेऱ्यावर सांगीतले असे किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या  अहवालात भेटले आहे . 
मारेगाव तालुक्यातील पेंढरी येथील एक हजार वस्तीच्या कोलाम पोडावर किशोर तिवारी यांना महिलांनी फक्त तांदुळांनी जगायचे कसे असा सवाल केला भाजी तेल डाळ तिखट मीठ आदी वस्तु क्या घेणार असा सवाल केला किशोर तिवारी यांनी आदिवासी सचिव आदीवासी आयुक्त आदीवासी अति आयुक्त अमरावती प्रकल्प अधिकारी याना पेंढारी येथुन फोन केला एकानेही फोन उचलला नाही तेंव्हा जुनाच सोटा हाणणारा तिवारी असतातर मस्तवाल अधिकारी फोन उचले असते टोमणा एका बाईने किशोर तिवारी याना मारला त्यावेळी किशोर तिवारी यांनी आपला भैया प्रत्येक गावात पोडावर गरजु गरीबांना सर्व वस्तू असणारी किट वाटप करत असल्याची मोहन जाधव या भाजप नेत्याची विडिओ क्लिप दाखविली तेव्हा एकही पोडावर किट मिळाली असल्याची सांगण्यात आले तेव्हा नेत्यांनी खाऊन टाकले असेल असा निरोप एका कोलामाने यावेळी दिला एकीकडे आमच्या जेवणात मटकी आहे आम्ही डाळही देता भाजीत रसा असतो दहा हजार लोकांना टीपीन वाटतो अशी जाहिरात करणारे नेते या आदीवासी मतांवर येतात त्यांनाच विसरतात खोटे दावे करतात कां असा सवाल किशोर तिवारी यांनी यावेळी केला . 
================













No comments:

Post a Comment