Sunday, October 18, 2020

महाराष्ट्रात ८० टक्के उभी पिके परतीच्या पाऊसाने खल्लास -केंद्राने तात्काळ १ लाख कोटींचे मदतीचे पॅकेज द्यावे -किशोर तिवारी

 महाराष्ट्रात ८० टक्के उभी पिके परतीच्या पाऊसाने खल्लास -केंद्राने तात्काळ १ लाख कोटींचे मदतीचे पॅकेज द्यावे -किशोर तिवारी 
१८ ऑक्टोबर २०२०

परतीच्या रट्ट्या ढगफुगीच्या अभुतपुर्व पाऊसाने   अख्ख्या महाराष्ट्रातील १४० लाख हेक्टर वरील सर्व हातात आलेल्या पिकांपैकी सुमारे १२० लाख हेक्टरवरील सोयाबीन धान मक्का कापुस ज्वारी  तुरी ऊस बागायतीची पिके संपूर्ण नष्ट झाली असुन हे संकट कमीतकमी १५० लाख कोटीच्या नुकसानीचे असुन ८० लाखावर शेतकऱ्यांना याचा फटका बसला असुन या अभूतपूर्व वातावरण बदलामुळे आलेल्या ऐतिहासिक संकटामुळे महाराष्ट्राची कृषी व ग्रामिण आर्थिक व्यवस्था कोलमडली असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा दौरा तात्काळ कमीतकमी १ लाख कोटीचे विषेय पॅकेज महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना दयावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे महाराष्ट्राच्या शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे . 
जर अशी अभूतपूर्व नभूतो नभविष्याती १२० लाख हेक्टरवरील पिके निवडणूक असलेल्या बिहारमध्ये  नष्ट झाली असती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी व कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी डझनावर दौरे करून मदतीचे पॅकेज घोषित केली असती मात्र आज महाराष्ट्रात निवडणूक नाही तसेच भाजपाचे सरकार सुद्धा नाही म्हणूनच केंद्राची आमच्यावर वक्रदृष्टी आहे का असा सवाल किशोर तिवारी यांनी आपल्या निवेदनात केला आहे . 
सध्या अप्रिलपासून महाराष्ट्रात कोरोनाचा कहर व केंद्राचा अचानक केलेला विचारहीन लॉकडाउनमुळे राज्याची आवक शून्य झाली असुन  राज्य प्रचंड आर्थिक संकटात आहे अशा परीस्ठीतीमध्ये केंद्र सरकार मदतीचे पॅकेज देणार अशी अपेक्षा होती मात्र केंद्राने भोपळा दिला . पंतप्रधान कोविड केअर निधीमध्ये महाराष्ट्राने ९० टक्के निधी दिला मात्र त्याच महाराष्ट्राला वरचेवर मोदींनी सोडले असा आरोपही किशोर तिवारी यांनी केला . 
ज्यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २० लाख कोटीच्या पॅकेजची फोडणी केली त्यात शेतकऱ्यांना उद्योगासारखी कर्जमाफी  देतील मात्र त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले वरून सरकारी बँकांनी यावर्षी फक्त लक्ष्याच्या ३० टक्के पीककर्ज वाटप केले असल्यामुळे आता या अवकाळी अभूतपूर्व कृषी संकटावर मत करण्यासाठी महाराष्ट्राच्या आत्महत्या करीत असलेल्या शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी संपुर्ण कृषीकर्ज माफी व कमीतकमी १ लाख कोटीचे मदतीचे पॅकेज द्यावे व महाराष्ट्राच्या विरोधीपक्ष नेते देवेद्न फडणवीस यामध्येही  न करता ही घोषणा करण्यासाठी नितीन गडकरी  जावडेकर पियुष गोयल या केंद्रीयमंत्र्याच्या मदतीने करून घ्यावी मात्र अशा गंभीर प्रश्न्नावर केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांना संकटाची तीव्रता  ठेवण्यासाठी टाळावे असे कळकळीचे आवाहन किशोर तिवारी यांनी यावेळी केले आहे 
=======================================================

















No comments:

Post a Comment