महाराष्ट्रातील कंत्राटदारांच्या होत असलेल्या आत्महत्या रोखा-१ लाख कोटी रुपयांपेक्षा थकबाकी देण्यासाठी नालायक महायुती सरकारच्या मंत्री ,आमदार व खासदार यांनी कंत्राट देण्यासाठी घेतलेले ३० टक्के कमीशन परत करण्याची किशोर तिवारी यांची मागणी
दिनांक -८ सप्टेंबर २०२५
५० हजार कोटी कमीशन घेणाऱ्यांमध्ये प्रमुख वाटा तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथांच्या व देवाभाऊचे संकटमोचक गिरीश महाजन व सनातनी भ्रष्ट दादांचा आहे त्याच बरोबर सर्व तात्कालीन आमदार खासदार यांनी सुद्धा घटनात्मक अधिकाराने पैसे घेतले आता मात्र हे सर्व मंत्री ,आमदार व खासदार असहाय्य झाले आहेत कारण महाराष्ट्र सरकार प्रचंड आर्थीक संकटात व मार्च २०२६ मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षात महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात राज्याचे कर्ज १०लाख कोटी रुपयांचे वर होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील अंदाजे १३ कोटी नागरिकांपैकी प्रत्येकाच्या डोक्यावर कमीत कमी ८० हजार रुपयांचे कर्ज राहणार आहे ,ही महाराष्ट्र निर्मिती पासून आजवरची सर्वात जास्त आर्थिक विपन्नावस्था आहे ,असे किशोर तिवारी सरकारी आकड्यांचा आधार घेत म्हटले आहे
८ ते १० दिवसांत बैठक लावून १ लाख कोटीचे पेमेंट्स देणार हा देवाभाऊंचा दावा धांदात खोटा
या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवार, दि. ३० जून रोजीअर्थ तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ५७ हजार ५०९ कोटी ७१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या ठेवल्या त्या पुर्णपणे नियमांची पायमल्ली असुन या मुख्यसचिवांसह अर्थ सचिवांनाही हरकत घेतली आहे सध्या नौकरदारांचे पगार देण्यासाठी कर्ज घेण्याची अवस्था झाली आहे त्यावेळी महाराष्ट्रातील सर्व सरकारी कंत्राटदारांची यंदा दिवाळी चांगली जाईल हा देवाभाऊंचा दावा धांदात खोटा असुन फक्त भाजपच्या सर्व कंत्राटदार मंत्री ,आमदार यांची देयके देण्यात येतील व यासाठी आपले राज्यकर्ते आत्महत्या केलेल्या कंत्राटदारांच्या टाळूवरील लोणी खातील असा दावा किशोर तिवारी यांनी केला आहे
देवाभाऊ शेकडो कोटींच्या जाहीराती थांबवून कंत्राटदारांच्या आत्मह्त्या रोखा
२ लाख कोटींची कंत्राट देतांना भाजप मंत्री संकटमोचक तर एकनाथांनी घरातच व दादांनी आपल्या शेटजींना देण्यासाठी आग्रह धरला आता या सर्व लबाड लोकप्रतिनिधींचे जवळचे कंत्राटदार आत्महत्या करीत त्यांना वाचविणे आपला राजधर्म आहे असा दावा किशोर तिवारी यांनी केला आहे .
No comments:
Post a Comment