Thursday, September 18, 2025

यवतमाळ जिल्ह्यात सतत अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कापसाची प्रचंड नापीकी - किशोर तिवारी यांचा १९ सप्टेंबरला पाहणी यात्रा

यवतमाळ जिल्ह्यात सतत अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कापसाची प्रचंड नापीकी - किशोर तिवारी यांचा  १९ सप्टेंबरला  पाहणी  यात्रा 


दिनांक -१८ सप्टेंबर २०२५

यवतमाळ जिल्ह्यात सतत तीन महिन्यापासुन होत असलेल्या 
अतिवृष्टीमुळे सोयाबीन १०० टक्के तर कापसाचे ७० टक्के पिके बुडाली आहेत  केळापूर व घाटंजी भागातील अतिवृष्टी झालेल्या आज सुद्धा पाणी साचले आहे सर्व नाले हे नदीमध्ये रूपांतरित झाले आहे .सुरवातीला जुलै महिन्यात नापिकीचा पहिला पंचनामा करण्यात आला आमदार खासदार मंत्री यांनी सुद्धा फोटो काढले तर काँग्रेसच्या नेत्यांनीही पाण्यात उभे राहून आपले फोटो समाज माध्यमात वायरल केले सर्वाना वाटले की नुकसान  भरपाई मिळणार मात्र ऑगस्ट सप्टेंबर मध्ये तर पाऊसाने कहर केला मात्र आता मात्र कोणताही नेता डोंगा घेऊन यात नसुन संपूर्ण प्रशासन देवाभाऊ यांची ओवाळणी करण्यात गुंतले आहेत व लाचार निराश शेतकरी आत्महत्या करण्यात गुंतले आहे. अशा बिकट परिस्थिती मध्ये शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी येत्या १९ सप्टेंबरला वाघाडी नदीच्या पात्रातील घाटंजी तालुक्यात वगारा टाकळी , गणेरी,  ठाणेगाव, भिमकुंड, सगदा ,  मंगी ,सावरगावला , रामनगर  पारवा येथे शेतात जाऊन पाहणी करणार आहेत . 
या दौऱ्यात किशोरभाऊ तिवारी सह ऑगस्टला शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी,अंकित नैताम, मोरेश्वर वातिले ,प्रेमभाऊ चव्हाण,सुनील राऊत ,रुपेश भाऊ क्यातमवार ,शिवारेड्डी पाटील ,अभय कट्टेवार ,मोहन ममीद्वार ,अजय राजूरकर ,निखिल मेश्राम ,माणिक पेंदोर , शंकरराव अंधारे ,शेतकरी विधवा संघटनेच्या अपर्णा मालीकर, मोनाली ठाकरे हे सर्व  राहनार  आहेत . हे सर्व कार्यकर्ते शेतकऱ्यांची शेतात  थेट भेट घेऊन अडचणी समजतील ,पूरग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसान प्रत्यक्ष पाहणी करतील ,शेतकऱ्यांच्या पिककर्जाच्या  समस्या व पीक विमा अडचणी जाणून घेणार,आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आधार देणार,पिक कर्ज वाटपाचा गोंधळ, मागील वर्षीच्या अतिवृष्टीची न मिळालेल्या नुकसान भरपाई तसेच  इतर प्रश्नांवर चर्चा करणार आहेत या दौऱ्यात संबंधित सरपंच, पोलीस पाटील, स्थानिक नेते व कार्यकर्ते उपस्थित राहणार असून, प्रत्येक गावातील शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन शासन दरबारी  मागण्या मांडल्या जाणार आहेत.
सध्या आयाती निर्याती धोरण ,पत पुरवडा धोरण ,पीक विमा धोरण ,सरकारचे सरळ अनुदान विरोधी धोरण ,चीन कडुन कृषी खतांची निर्यात , युरीया व कीटक सह तण  नाशकांचा पुरवडा ,बियाणे , कृषी माल प्रक्रिया विरुद्ध धोरण यामुळे शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न बाजूला पडले असुन महायुती सरकार फक्त जाती जमाती मध्ये तसेच हिंदू मुसलमान करण्यात व्यस्त आहे या विरोधात हा दौरा असल्याची माहिती आदिवासी नेते अंकित नैताम यांनी दिली . 
---------------------------------

No comments:

Post a Comment