अंजली दमानिया यांचा बोलता धनी गुजराथ लॉबीचा लाडका -किशोर तिवारी
दिनांक -२५ सप्टेंबर २०२५
ही तर २०१२ मध्ये बिनशर्त माफी मागितलेल्या अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या आरोपांची पुनरावृत्ती
२०१२ मध्ये सामाजीक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नितीन गडकरी आरोप करतांना वीरेंद्र दत्तात्रय म्हैसकर यांच्या आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड (पूर्वी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, आयडियल रोड बिल्डर्स) ही १९९८ मध्ये स्थापन झालेल्या मराठी माणसाच्या एक भारतीय महामार्ग बांधकाम कंपनीचा उल्लेख भरपूर प्रमाणात केला होता मात्र तात्कालीन काँग्रेस सरकारने इडी सिबिआई त्याच बरोबर महाराष्ट्रातील आघाडी सरकारने चौकशी लाऊन कोणतेही आरोप सिद्ध करू शकली नव्हती आज अंजलीताईने वीरेंद्र दत्तात्रय म्हैसकर या मराठी माणसाने अख्या जगात रस्ते बांधकाम क्षेत्रात जे काम केले आहे त्याचा पाढा वाचला मात्र या प्रगतीमध्ये तात्कालीन पंतप्रधान मनमोहन सरकार यांचे अभूतपूर्व योगदान होते आजही २०२५ यामध्ये वीरेंद्र दत्तात्रय म्हैसकर यांच्या कंपन्या धरून नितीन गडकरी यांच्या मुलांवर आरोप करण्यात आले आहेत हे आरोप करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी त्यावेळी न्यायालयात बिनशर्त माफी मागितली होती .
भांडुपच्या साईनगर मधील चाळीचा नितीन गडकरी यांच्या काडीमात्र संबंध नाही
मुंबईत जुन्या चाळी यांचे एसआरऐ मार्फत नव्या इमारतीमध्ये रूपांतर होत आहे त्यामध्ये भ्रष्टाचार अन्याय अनियमितपणा होत आहे ही गोष्ट जगजाहीर आहे मात्र भांडुप मधील साईनगर चाळीत नितीन गडकरी यांचा सरळ हस्तक्षेप कसा झाला हे अंजलीताई यांनी सिद्ध करावे कारण नगरप्रशासन एकनाथ शिंदे यांचे आवडते खाते आहे व नितीन गडकरी यांच्या कोणत्याही कार्यकर्त्याचे काम होऊ नये असा गुजरात लॉबीच्या आदेशाची २०१४ पासून काटेकोर अंबलबजावणी होत आहे यापुर्वी एकनाथ खडसे ,विनोद तावडे वा सुधीर मुनगंटीवार यांनी चुकुन नितीन गडकरी यांची सांगितलेली कामे केली या कारणाने त्यांना त्यांची जागा देवाभाऊने दाखविली आहे .महाराष्ट्रातील नगर प्रशासन विभागात भ्रष्टाचाराने कळस गाठला असुन मंगल लोढा असो वा सुनील राऊत असो सर्वांना नगदी पैसे द्यावे लागतात ,जेव्हा पासुन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत अंजली दमानीया याना व्हीआयपी वागणूकआहे व सर्व सनदी अधिकारी मॅडम व त्यांच्या नवऱ्याला सलाम ठोकतात .आतातर देवा भाऊने मोठ्या ठेक्यांची कृपा करणे सुरु केले आहे .
बीओटी व टीओटी ही केंद्र सरकारचे १९९५ पासूनचे धोरण
सध्या संपुर्ण जगात टोल आकारून रस्ते निर्माण करण्याचे धोरण १९९५ पासुन राबविले जात आहे व आयआरबी टोल चे रस्ते सर्वात जास्त काँग्रेस शासित राज्यात तसेच गुजराथमध्ये दिले आहेत .आपण सार्वजनिक केलेल्या कागदांच्या प्रति घेऊन कोर्टात न जाता ,पत्रकार परिषद घेऊन उच्च न्यायालयाच्या समकक्ष असणाऱ्या लवादाच्या निर्णय व निविदा प्रक्रियेवर भ्रष्टाचाराचे आरोप करणे .सेबी इडी सिबिआई यांच्या सारख्या संस्था असतांना किरीट सोम्मय्या सारखे तक्रारी दाखल करून यावे मग तुमचा खरा चेहेरा जगाला दाखवु असा इशारा किशोर तिवारी आईनी यावेळी दिला .
===============================================================
No comments:
Post a Comment