Thursday, August 5, 2021

हटवांजरी शेतकरी आत्महत्येची सरकारकडून गंभीर दखल-महाराष्ट्रातील सर्व भूमिअभिलेख कार्यालयातील गोरखधंद्य समुळ नष्ट करणार -किशोर तिवारी

हटवांजरी शेतकरी आत्महत्येची सरकारकडून गंभीर दखल-महाराष्ट्रातील सर्व भूमिअभिलेख कार्यालयातील गोरखधंद्य समुळ नष्ट करणार -किशोर तिवारी 

दिनांक ५ ऑगस्ट २०२१

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील हटवांजरी येथील बहुचर्चित देवराव फरताडे या शेतकरी आत्महत्याची  घटना कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष तथा राज्यमंत्री चा दर्जा असलेले किशोर तिवारी यांनी घेतल्यावर अख्ख्या महाराष्ट्रातून भूमिअभिलेख कार्यालयातील सुरु असलेला राजरोस भ्र्ष्टाचार व अभूतपूर्व सावळा गोंधळ आणी प्रचंड गोरखधंद्याचा तक्रारीचा पाऊसच पडला असुन आता महसूल विभागाने या विभागाचा सर्व कारभार पारदर्शक करून संपुन संगणीकरण व व ऑन लाईन पद्धतीने करून जनतेला या सनातनी भ्र्ष्ट संकटापासून सुटका होईल तसेच या विभागात मागील २० वर्षांपासून कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या संपत्तीची सुद्धा सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती किशोर तिवारी यांनी आज दिली . 

कालच गेल्या आठवड्याभरा पासून बहुचर्चित असलेल्या हटवांजरी येथील शेतकरी आत्महत्या प्रकरणी अखेर मारेगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.यात मृतकाच्या विधवा पत्नीच्या तक्रारी वरून चक्क 3 आरोपीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.यात भूमिअभिलेख कार्यालयातील एका भुमापका सह दोन पोट हिस्सेदाराचा समावेश आहे.यात कोमल तुमस्कर (37), वासुदेव कृष्णा एकरे (71),राजु नामदेव एकरे (40) रा.हिवरा मजरा असे आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे मात्र या निष्पाप आत्महत्येला उपसंचालक ,जिल्हा भूमिलेख अधीक्षक ,मारेगाव येथील भूमिलेख अधीक्षकसंपूर्णपणे जबाबदार असून या शेतकरी आत्महत्येची सरकारचा आदेश असतांना महसूल अधिकाऱ्यांनी तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी जो बेजबाबदारपणा दाखवीला त्या सर्वांना निलंबित करण्याची शिफारश किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या  कडे केली आहे . 

प्राप्त माहिती नुसार मृतकाची मूळ शेती एका प्रकल्पात भूसंपादित झाली.व मिळालेल्या मोबदल्यातून मृतकानी मार्डी नजीक हिवरा मजरा येथे गट न.69/4 पैकी 1 हे 30 आर शेतजमीन खरेदी केली.शेताचा कायदेशीर सात बारा मृतकाच्या नावे झाला.दरम्यान मोजणी शिटमध्ये येथील भुमापकाने पोट हिस्सेदारांच्या संगणमताने घोळ केला होता.23/2/2020 ला पहिल्या मोजणीत तीन हिस्से तर दिनांक 13/8/2020 ला दुसऱ्या मोजणीत पाच हिस्से तर यामध्ये मृतकाच्या वाटयास 1 हे 30 आर ऐवजी  केवळ 0 हे 40 आर इतकेच क्षेत्र मोजणी शीट मध्ये दर्शविण्यात आल्याने मृतकाला पूर्ण शेत जमीनीचा ताबा मीळाला नव्हता.तर उर्वरित क्षेत्रात पोट हिस्सेदाराने कब्जा केला होता.

मृतकाने मृत्यु पूर्वी वारंवार न्यायाची मागणी भूमिअभिलेख कार्यालया कडे केली.मात्र पिडीत शेतकऱ्यांच्या मागणी कडे दुर्लक्ष करण्यात आले होते. दरम्यान न्याय न मिळाल्यास सहकुटुंब उपोषण करण्याचा इशारा दिला होता.तसेच उपोषणास अडथळा केल्यास आत्महत्या करण्याचा इशारा ही वरिष्ठाकडे पाठविलेल्या एका तक्रारीतून पिडीत शेतकऱ्यांने दिला होता. मात्र वरिष्ठानी या प्रकरणाची दखल घेतली होती.परंतु येथील कार्यालय प्रमुखाने कर्तव्याची सिमा ओलांडून वरिष्ठानच्या आदेशाला ही केराची टोपली दाखवली.या बाबीकडे गांभीर्याने घेतले नसल्याने अखेर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांने अखेर 27 जुलै रोजी विष प्राशन करून आपली जिवन यात्रा संपवली.

मृतक शेतकऱ्याची पत्नी मनीषा फरताडे यांनी 29 जुलै रोजी दिलेल्या तक्रारी वरून 3 ऑगस्ट च्या रात्री उशिरा परंत या प्रकरणी शेतकऱ्यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या आरोपिवर 306,34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला मात्र  ठाणेदार जगदीश मंडलवार यांनी मूळ आरोपी यांना सोडून दिले असुन त्यांचा संपूर्ण तपास चुकीच्या दिशेने असुन त्यांना मारेगाव येथुन तात्काळ कंट्रोल रूमला स्थानांतर  वा सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी किशोर तिवारी केली आहे . 

शेतकरी आत्महत्याची घटना कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष तथा राज्यमंत्री चा दर्जा असलेले किशोर तिवारी यांना कळल्यावर त्यांनी विलंब न करता 2 ऑगस्ट रोजी थेट हटवांजरी येथील शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटूंबाला भेट दिली. व मृतकाच्या पत्नी व आई कडून सर्व आपबीती जाणून घेतली. 3 ऑगस्ट रोजी पांढरकवडा येथील कार्यालयात सन्मानाने पाचारण करून मृतकाच्या पत्नी,आई,मुलांना साडी-चोडी कपडे व दहा हजार चा नगदी  देऊन दोन मुलींचे पालकत्व स्वीकारले.तसेच भविष्यात आधार उधवाचा प्रकल्पात अंतर्गत या आत्महत्या ग्रस्त कुटूंबाचे सबलीकरण करण्यात येणार आहे.

===================================================================

1 comment: