शेतकरी आत्महत्या प्रशासन पूर्णपणे उदासीन - शिबला येथील आत्महत्याग्रस्त लघु पुसराम शेतकरी मिशनचे अध्यक्ष १० ऑगस्टला भेट देणार
दिनांक ९ ऑगस्ट २०२१
यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील हटवांजरी येथील बहुचर्चित देवराव फरताडे या शेतकरी आत्महत्याची घटना स्थळी किशोर तिवारी यांनी भेट घेतल्यावर त्याठिकाणी सुद्धा त्यांच्या भेटी पर्यंत साधा तलसीलदार सुद्धा पोहचला नव्हता आता ३ ऑगस्ट शिबला तालुका झरी येथील आदीवासी युवक शेतकरी लघु पुसराम यांनी ३ ऑगस्टला कीटकनाशक घेऊन आत्महत्या केली मात्र याठिकाणी सुद्धा ९ ऑगस्ट पर्यंत जिल्ह्याधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट दिली नाही व आत्महत्येची खरी वस्तुस्थिती जाणली नाही उपविभागीय त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्याने हे काम तहसीलदारला तर तहसीलदाराने मंडळ अधिकाऱ्याला तर मंडळ अधिकाऱ्याने पटवाऱ्याला सोपवून दिल्यानंतर कोतवालाच्या रीपोर्ट घेऊन पाठविला असल्याचे माहीती लघु पुसराम यांचे बंधु मंगल पुसराम यांनी दिली मात्र पाटण पोलीस स्टेशन च्या ठाणेदाराने हे काम करण्याचे उत्तरदायित्व पोलीस पाटील यांच्याकडे दिल्याचे मंगल पुसराम यांनी सांगीतले .
ह्या घटनेची गंभीर दखल घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष तथा राज्यमंत्री चा दर्जा असलेले किशोर तिवारी यांना शिबला येथे भेट देण्याचे आदेश दिले आहेत . किशोर तिवारी १० ऑगस्टला शिबला येथे भेट देणार असुन अंतिम रिपोर्ट् मुख्यमंत्र्याना देणार आहेत . मिळालेल्या माहितीनुसार लघु पुसराम यांचेवर महेंद्र फायनान्स व त्यांच्या कुटुंबावर गटाच्या माध्यमातून ३ मिक्रोफायनास कंपन्यांचे कर्ज आहे व त्यांनी जबरन वसुली सुरु केल्याने लघु पुसराम यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्याचे कुटुंबीय करीत आहेत . सध्या सर्व प्रशासकीय अधिकारी गौण खनिज रेती मुरूम आदी यांची अवैध विक्री करण्याचा धंदा रोजरोसपणे करीत असुन कोणीही अधिकारी कोणलाही घाबरत नाही अशी लाचारी जनतेमध्ये दिसत आहे तर पोलीसवाले २४ तास गाईची तस्करी गावड्डी दारू वरळी मटका नाहीतर अन्नसुरक्षा योजनेचे धान्य तेलंगाणा मध्ये विकण्याचा व्यवसाय करतात असा आरोप आदीवासी समाजाच्या समाज सेवक रजनीताई तोडसाम यांनी केला आहे व या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाहीतर आंदोलनाचा इशारा दिला आहे .
===================================================================
No comments:
Post a Comment