Sunday, August 15, 2021

रस्ते कंत्राटदारांकडुन सक्तीच्या वसुलीमध्ये भाजपा आघाडीवर -शिवसेना नेते किशोर तिवारी नितीन गडकरींना यांना यादीच देणार

रस्ते कंत्राटदारांकडुन सक्तीच्या वसुलीमध्ये भाजपा आघाडीवर -शिवसेना नेते किशोर तिवारी नितीन गडकरींना यांना यादीच देणार 

दिनांक -१६ ऑगस्ट २०२१


नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील शिवसेना कार्यकर्तेच टक्केवारी मिळावी यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथळे आणतात हे पत्र  महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना लिहिलेले  पत्र माध्यमांमध्ये सार्वजनिक केले व त्याला भरपुर प्रसिद्धी मिळावी याची व्यवस्था केली सगळा प्रकार सध्या, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना भाजपशी संबंध तोडल्यानंतर ज्याप्रकारे भाजपचे सर्व प्रवक्ते राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेला सोनिया सेना किंवा शिवसेना किंवा उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात असलेल्या महाविकास आघाडी सरकार हे  महावसुली सरकार बोलताना थकत नाहीत त्याचाच एक प्रकार असुन अख्ख्या भारतात भाजप शेकडो लोकप्रतिनिधी व पदाधिकारी एक तर त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर ठेके घेतात वा जोपर्यंत कामाच्या आधी टक्केवावी मिळाल्याशिवाय काम सुरु करू देत नाहीत अशा सर्व  भाजप शेकडो लोकप्रतिनिधी व पदाधिकारी जे वसुली करतात वा टोल चालवत आहेत त्यांची यादीच जशी नितीन गडकरी यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना बदनाम करण्यासाठी पत्र सार्वचनिक केले आपणही करणार अशी माहीती शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी आज दिली . 

२०१४ ते २०१९ कळत नितीन गडकरींनीच  महामहिम पंतप्रधानजींना पत्र लिहिले होते, पण त्या वेळी त्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी कमिशन गोळा करून गुंडांचा वापर करून रस्त्यांचे बांधकाम थांबवणाऱ्या भाजप खासदार आणि आमदारांची यादी दिली होती, पण यावेळी त्यांनी लिहिलेले पत्र सार्वजनिक करून जसे राज्य स्तरावरील नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात करतात  तसे  वाटते व हा प्रकार टाळला गेला असता  कारण मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे सर्व नेते शिवसेनेत नितीन गडकरींचा  आदर करतातवाशीम येथील पोटभरू भाजप  व शिवसेनेच्या खासदार विरोधी व स्थानीय भाजपा  आमदार वादाला  शिवसेनेची बदनामी साधन करून आपल्याला दिलेल्या अपुऱ्या माहितीच्या आधारे हे सर्व घडल्याचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे . 

किशोर तिवारी यांनी म्हटले आहे "मी तुम्हाला 1975 पासून ओळखतो, आम्ही बराच काळ एकत्र काम केले आणि  तुम्हाला भारत सरकारचे नेतृत्व मिळावे अशी मागणी  नेहमीच करत आलो आहे त्यामुळेच मी २०१२ ते २०१९ पर्यंत भाजप सोबत काम केले माझ्या या मागणीमुळे आपणास भाजपमध्ये त्रास झाला त्रागा सहन करावा लागला मात्र मला तुमच्या कार्यशैली व पक्षाच्या तळागाळातील  कार्यकर्ते व वर्षातील ३६५ दिवस २४ तास काम करतांना पाहिले आहे व यासाठीच पुज्यनीय बाळासाहेब ठाकरे यांनी रोडकरी व माननीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी भारत सरकारच्या ग्रामीण व राष्ट्रीय रस्त्यांचे चाळे विणण्यासाठी स्पेशल टास्कफोर्स वर नियुक्त करून प्रमाणीत केले होते मात्र आपल्या पत्रामुळे एका मागील २८ वर्षांपासून खासदार असलेल्या व संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांना दिलेल्या शेतकरी नेत्याच्या एका उच्चं विद्याविभूषित तुम्हाला उद्धवजी नंतर मान  देणाऱ्या महिलेचा एकतर्फी बाजु एकूण मांडून लिहलेल्या पत्राने अनादर झाला आहे . 

आपल्या २०१४ नंतर केंद्रीय रस्ते विकास मंत्री झाल्यानंतर भाजपाच्या नेत्यांच्या नातेवाईकांच्या कंपन्यांनी सर्व कंत्राट  व  सबकॉन्टॅक्ट व अनेक ठिकाणी रस्ते गुणवत्ता सोडून निकृष्ट दर्जाचे असल्याचा  वाद निर्माण झाला  होता यामध्ये  दिवाळखोर कंपनी वा कोणताही अनुभव नसतानाफक्त  भाजपाचे कार्यकर्ते आणि खासदार आमदार  याना पोसण्यासाठी देण्यात आले आहे यामुळे राष्ट्रीय रस्ते निर्माण प्राधिकरण ३ लाख कोटीच्या कर्जत आहे  असा आरोपच किशोर तिवारी यांनी केला आहे . 

आजकाल सर्व राजकीय पक्षात ठेकेदार आणि व्यापारी दलाल प्रमुख झाले आहेत  जिथे सत्ता आहे तिथे हे दरोडेखोर  भ्रष्ट अधिकारी याना सोबत  लुटत आहेत  आपण  मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे सोबत घेऊन  महाराष्ट्राच्या राजकारणाचे पितामह  शरद पवार जी यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान सुरू करावे अशी  महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे .  

आज गडकरी यांच्या पत्रावरून असे दिसते की फक्त काही पक्षाचे कार्यकर्ते चोर आहेत आणि तुमच्या आजूबाजूला भाजप किंवा आमदार एकदम धुतल्या तांदळा सारखे आहेत त्यांनी  सर्व भारतीय चोरांची नवे घेऊन केली असती तर बरे झाले असते आज देश विकण्याच्या राष्ट्रीय बघुन  महात्मा गांधींनीही विचार केला नसता की एक वेळ येईल की सर्व मंत्री, खासदार, आमदार, कंत्राटदार, टोलवाले आणि कमिशन खोर  असतील असा टोलाही शेवटी किशोर तिवारी यांनी लगावला आहे 

=================================================================================================================================================


No comments:

Post a Comment